Post Office Recruitment esakal
एज्युकेशन जॉब्स

Post Office Recruitment : पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, ३० हजारपेक्षा अधिक पदांची होणार बंपर भरती

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी.

धनश्री भावसार-बगाडे

Indian Post Office Recruitment 2023 :

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. भारतीय टपाल विभागाने देशातील विविघ मंडळांमध्ये ग्रामीण डाक सेवकांच्या पदांसाठी बंपर भरती करण्यात येणार आहे. सर्व मंडळांमध्ये एकूण ३०,०४१ पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी दि. ३ ऑगस्टपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइटद्वारा दि. २३ ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकतो.

देशात कुठेकुठे होणार पद भरती?

महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, मिझोराम, आंध्रप्रदेश, हरियाणा, पंजाब, आसाम आदी राज्यांतील रिक्त पदांंवर भरती होणार आहे.

पदांची नावे

भरती अधिसूचनेनुसार

  • शाखा पोस्ट मास्तर

  • सहाय्यक शाखा पोस्ट मास्तर

  • डाक सेवक

शैक्षणिक पात्रता

  • या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार किमान १० वी पास असणे आवश्यक आहे.

  • शालेय काळात गणित, इंग्रजीसह स्थानिक भाषांचा अभ्यास आवश्यक आहे.

  • संगणकाचे बेसिक ज्ञान असणे आवश्यक

  • सायकल चालवता येणे आवश्यक

  • अर्जासाठी किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ४० वर्षे आहे.

  • अनुसूचित जाती, जमाती (SC/ST) च्या उमेदवारांना कमाल वय ५ वर्षांची सूट मिळेल. आणि इतर मागास वर्गियांना ३ वर्षांची सूट मिळेल.

अशी आहे निवड प्रक्रिया

  • कोणतीही लेखी परीक्षा नाही.

  • १० तील गुणांच्या आधारे निवड

  • सादर अर्जांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार होणार.

  • उच्च शैक्षणिक पात्रता असणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे प्राधान्य नाही.

वेतन

शाखा पोस्ट मास्तर - १२,००० ते २९,३८० रुपये प्रति महिना

सहाय्यक शाखा पोस्ट मास्तर - १०,००० ते २४,४७० रुपये प्रति महिना

अर्ज कसा करावा?

  • अधिकृत वेबसाइटद्वारे ग्रामीण डाक सेवक पदांसाठी अर्ज करू शकतात.

  • अर्जाच्या लिंकवर क्लिक करा.

  • त्यात आपले नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी टाकून नोंदणी करावी.

  • उर्वरीत अर्ज भरा

  • सर्वसाधारण श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्जाचे शुल्क १०० रुपये आहे.

  • SC, ST, दिव्यांग, महिला यांना अर्ज शुल्क नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole: काँग्रेससाठी उद्या निर्णायक दिवस; दिल्लीतल्या CECच्या बैठकीनंतर नाना पटोले स्पष्टच बोलले

IND A vs AFG A : अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी भारताच्या गोलंदाजांना बदड बदड बदडले... ट्वेंटी-२०त दोनशेपार पोहोचले

IND vs NZ: 'Virat Kohli जर देशांतर्गत सामना खेळला असता तर...'; दुसऱ्या कसोटीतील अपयशानंतर अनिल कुंबळे स्पष्टच बोलला

MNS Candidates List: एकेकाळी विश्वासू सहकारी असलेल्या धंगेकरांविरोधात राज ठाकरेंनी दिला 'हा' उमेदवार

Latest Maharashtra News Updates Live : पक्षाने दिलेल्या उमेदवाराचं काम करणार- सुधीर साळवी

SCROLL FOR NEXT