inspiring story of harshada shewale and suraj shewale become ca education pune  Sakal
एज्युकेशन जॉब्स

Motivational Story : चुलत बहीण भावाने 'पाहिलेले स्वप्न' CA होऊन आणले प्रत्यक्षात

चार्टर्ड आकौंटंटस् अर्थात सीएच्या अंतिम परीक्षेत शेवाळेवाडी येथील हर्षदा संजय शेवाळे आणि सुरज श्याम शेवाळे या चुलत बहिण-भावानं यश मिळवले

कृष्णकांत कोबल

मांजरी : चार्टर्ड आकौंटंटस् अर्थात सीएच्या अंतिम परीक्षेत शेवाळेवाडी येथील हर्षदा संजय शेवाळे आणि सुरज श्याम शेवाळे या चुलत बहिण-भावानं यश मिळवले आहे. आठवीत शिकत असताना पाहिलेले स्वप्न त्यानिमित्ताने पूर्ण झाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला आहे.

सधन परिस्थिती असताना अनेक कुटुंबातील मुले वेगळ्या आव्हानात्मक शिक्षणाकडे वळताना फारशी दिसत नाहीत. मात्र, शेवाळे बहीण भावाने स्वतःच सीए होण्याचे धाडसी स्वप्न पाहून त्याला मूर्त स्वरूप आणण्यात यश मिळविले आहे. त्यांच्या या यशाचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर व माजी आमदार जगन्नाथ शेवाळे यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ व नातेवाईकांनी कौतुक केले आहे.

हर्षदा व सुरज शेवाळे यांनी इंग्रजी माध्यमातून वाणिज्य शाखेची पदवी प्राप्त करून सीए परिक्षेसाठीचा अभ्यास केला. कोरोना, कुटुंबातील तीन सदस्यांचे आजारपण आणि त्यानंतर त्यांचे झालेले निधन आदी बाबींमुळे त्यांना यापूर्वी एक-दोन गुणांनी दोन वेळा अपयशाला सामोरे जावे लागले होते.

मात्र, त्यांनी सीए व्हायची महत्वाकांक्षा सतत उराशी बाळगली. अपयशाने खचून न जाता प्रबळ इच्छाशक्ती ठेवून पुन्हा जोमाने आणि आत्मविश्वासाने अभ्यास केला. खासगी शिकवणी, पालकांकडून मिळणारे मार्गदर्शन व दररोज सुमारे १४ तासांचा अभ्यास करून अखेर तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी यश मिळविले. हर्षदा शेवाळे हिने ४१८ तर सुरज शेवाळे याने ४२४ गुण मिळविले आहेत.

आपण शालेय जीवनात असताना स्वतःहून ठरवलेले ध्येय आज पूर्ण होताना मोठा आनंद होत असल्याचे हर्षदा व सूरजने सांगितले. हर्षदा म्हणाली, "माझा चुलत भाऊ सूरज आणि मी शाळेपासून एकत्र शिकत आहोत. आम्ही आयपीसीसी आणि सीएच्या अंतिम परीक्षेसाठी एकत्रच अभ्यास केला.

वडिलांनी आम्हांला अभ्यास करण्यासाठी वेळेबाबत व मोबाईल पासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. तो आम्ही शेवटपर्यंत पाळला. आमची अभ्यास करण्याची पद्धत सोपी होती.

आम्ही एकमेकाला अभ्यासात मदत करायचो पण जास्तीत जास्त एकमेकाच्या अभ्यासाची समिक्षा करायचो. पालक संजय शेवाळे, श्याम शेवाळे, भारती शेवाळे, मोहिनी शेवाळे यांनीही आमच्या बरोबर आमच्यासाठी स्वतःची दैनंदिनी बदलली होती.'

सूरज म्हणाला, "जेव्हा आम्ही प्रश्नपत्रिका सोडवायचे तेव्हा आम्ही एकमेकांची उत्तरे तपासायचो. आत्मविश्वास कमी व्हायचा तेव्हा वडील, आई, चुलते, भाऊ आणि कुटुंबातील सर्वजण आम्हाला प्रोत्साहन द्यायचे. त्यानंतर पुन्हा चेतना घेऊन आम्ही दोघेही अभ्यासात सक्रीय व्हायचो."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT