Intel 
एज्युकेशन जॉब्स

Intel देणार कर्मचाऱ्यांना झटका! हजारोंच्या नोकऱ्यांवर येणार गदा; जाणून घ्या कारण

कंपनीच्या कुठल्या विभागात आणि किती कर्मचाऱ्यांची कपात होईल जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पर्सनल कॉम्प्युटर आणि लॅपटॉप निर्मिती क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या इंटेल कॉर्पोरेशननं (Intel Corp) कर्मचारी कपात करण्याची योजना आखली आहे. त्यानुसार, याच महिन्यात हजारोंच्या नोकऱ्यांवर गदा येण्याची शक्यता आहे. कंपनीच्या विविध विभागात ही कर्मचारी कपात होणार आहे. (Intel is planning to lay off thousands of employees report says)

पर्सनल कॉम्प्युटरच्या (PC) क्षेत्रात आर्थिक मंदी सुरु असल्यानं कॉम्प्युटरची प्रोसेसर चीप बनवणाऱ्या इंटेल कॉर्पोरेशन या प्रसिद्ध अमेरिकन कंपनीनं मोठी कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, ही वार्षिक कर्मचारी कपात केली जाणार असून याच महिन्यापासून ती लागू होईल. यामध्ये कंपनीतील सेल्स आणि मार्केटिंग ग्रुपमध्ये सुमारे २० टक्के कर्मचारी कपात केली जाणार आहे. यांसह इतर काही विभागातील कर्मचारी कपातही केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. इंटेल कॉर्पोरेशनकडे जुलै महिन्याच्या आकडेवारीनुसार, १ लाख १३ हजार ७०० कर्मचारी काम करत आहेत. कर्मचारी कपातीच्या या बातम्यांवर कंपनीनं अद्याप कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नाही.

दरम्यान, या दशकातील सर्वात मोठी महागाई आणि कोविड लॉकडाऊननंतर सुरु झालेली कार्यालये आणि शाळा यांमुळं लोक आता पर्सनल कॉम्प्युटरचा वापर कमी करत आहेत. त्याचबरोबर इंटेल कंपनी देखील कोविडमुळं आणि युक्रेन-रशिया युद्धाच्या स्थितीमुळं मागणी मंदावल्यानं मोठ्या दबावात काम करत असल्याचंही सांगितलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांचा ३१६५१ मतांनी विजयी

Shweta Mahale Won Chikhli Assembly Election 2024: चिखली विधानसभेत काँग्रेस विरुद्धच्या थरारक सामन्यात भाजपच्या श्वेता महाले विजयी!

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Tanaji Sawant won Tuljapur Assembly Election Result 2024 : राणाजगजितसिंह पाटील यांच्या पदरी 'जीत', तुळजापूरमध्ये कमळ फुलले

Miraj Assembly Election 2024 Results : मिरज मतदारसंघात सुरेश खाडेंनी ठाकरे गटाच्या तानाजी सातपुतेंवर 44,706 मतांच्या फरकाने केली मात

SCROLL FOR NEXT