Jee Main 2022 Exam Date Postponed esakal
एज्युकेशन जॉब्स

JEE Main परीक्षा ढकलली पुढं; NTA कडून नवं वेळापत्रक जाहीर

सकाळ डिजिटल टीम

JEE Main परीक्षेच्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची माहितीय.

JEE Main परीक्षेच्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची माहितीय. जेईई मुख्य परीक्षा पुढं ढकलण्यात आली असून नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं (NTA) यासंदर्भात नोटीस जारी करून ही माहिती दिलीय. त्यानुसार, जेईई मेनच्या पहिल्या सत्राची म्हणजेच, एप्रिल 2022 ची परीक्षा पुढं ढकलण्यात आलीय. JEE मेन परीक्षा पुढं ढकलण्याच्या सूचनेसह NTA ने परीक्षेच्या (National Testing Agency) नवीन तारखा देखील जाहीर केल्या आहेत. दरम्यान, जेईई मेन परीक्षेच्या तारखा 5 दिवसांनी वाढवण्यात आल्या आहेत.

पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार, JEE Main April 2022 ची परीक्षा 16, 17, 18, 19, 20 आणि 21 एप्रिल 2022 रोजी होणार होती. मात्र, आता ही परीक्षा 21 एप्रिलपासून सुरू होणार आहे. NTA ने जारी केलेल्या नोटिसनुसार, JEE मुख्य परीक्षेच्या नवीन तारखा 21, 24, 25, 29 एप्रिल 2022 आणि 1 आणि 4 मे 2022 आहेत.

JEE Main अॅडमिट कार्ड कधी येणार?

जेईई मेनच्या पहिल्या सत्राच्या परीक्षेची प्रवेशपत्र एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात जारी केली जाणार आहेत, तर परीक्षेचं शहर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जारी केलं जाईल. नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं जेईई मेनच्या अधिकृत वेबसाइटवर jeemain.nta.nic.in जारी केलेल्या नोटीसमध्ये ही माहिती दिलीय. दरम्यान, विद्यार्थ्यांनी जेईई मेनची तारीख बदलण्याचं आवाहन केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं एनटीएचं म्हणणे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

SCROLL FOR NEXT