JEE Main 2022 Paper 2 Result  esakal
एज्युकेशन जॉब्स

JEE Main Paper 2 Result : JEE Main पेपर 2 चा निकाल जाहीर, 'असा' चेक करा Result

JEE मुख्य पेपर 2 चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

JEE मुख्य पेपर 2 चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.

JEE Main 2022 Paper 2 Result : JEE मुख्य 2022 पेपर 2 चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं (National Testing Agency NTA) हा निकाल जाहीर केला असून उमेदवार आता त्यांचा JEE Mains निकाल ऑनलाइन डाउनलोड करू शकतात. निकाल डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटला jeemain.nta.nic.in भेट द्यावी लागणार आहे. JEE पेपर 2 च्या निकालाची लिंक अधिकृत वेबसाइटवर सक्रिय केली गेली आहे.

JEE मेन पेपर 2 चा निकाल जाहीर झाल्यानंतर, उमेदवारांना आता JoSAA काऊंसलिंगमध्ये (JoSAA Counselling) सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. काऊंसलिंगनंतर निवडले जाणारे उमेदवार देशातील सर्व आयआयटी आणि एनआयटीमधील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकतील. त्याच वेळी, एजन्सीनं (JoSAA) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीसह (IIT) देशातील इतर संस्थांमध्ये प्रवेशासाठी काऊंसलिंग वेळापत्रक जारी केलंय. वेळापत्रकानुसार, JoSAA काऊंसलिंग 12 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

निकाल कसा तपासायचा?

  • 1. jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाइट वर जा.

  • 2. होम पेजवर दिलेल्या JEE मेन 2022 पेपर 2 स्कोअर कार्ड लिंकवर क्लिक करा.

  • 3. नोंदणी क्रमांक आणि इतर माहिती सबमिट करा.

  • 4. आता तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर निकाल उपलब्ध होईल.

  • 5. निकाल तपासा.

  • 6. आवश्यक असल्यास तुम्ही निकालाची प्रिंटही काढू शकता.

जेईई मेन सेशन 1 चा निकाल 11 जुलैला जाहीर

दरम्यान, 11 जुलै 2022 रोजी जेईई मेन 2022 सत्र 1 चा निकाल जारी करण्यात आला होता. 14 विद्यार्थ्यांना सत्र 1 च्या परीक्षेत 100 टक्के गुण मिळाले होते. ही परीक्षा 23 जून 2022 ते 29 जून 2022 दरम्यान भारत आणि परदेशातील 500 हून अधिक केंद्रांवर घेण्यात आली. NTA नुसार, दोन्ही सत्र परीक्षांसाठी 1026799 विद्यार्थ्यांनी JEE मेन 2022 साठी नोंदणी केली होती, तर 905590 विद्यार्थी दोन्ही सत्र परीक्षेला बसले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Nashik Vidhan Sabha Election: ओझरला रात्री साडेदहापर्यंत मतदान; सुरगाणा, त्र्यंबकेश्‍वर व इगतपुरीच्या मतपेट्या मध्यरात्री जमा

IND vs AUS : स्टंपकडे जाणारा चेंडू लाबुशेनने रोखला, सिराज चांगलाच चिडला; कोहलीने तर बेल्सच उडवल्या..काय हा प्रकार

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

Sanjay Raut: ...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT