जर तुम्ही B.Tech किंवा BE पदवी घेतली असेल तर तुमच्यासाठी नोकरीची उत्तम संधी चालून आली आहे.
सोलापूर : जर तुम्ही B.Tech किंवा BE पदवी घेतली असेल तर तुमच्यासाठी नोकरीची उत्तम संधी चालून आली आहे. कोल इंडिया लिमिटेड (CIL) ने (Coal India Limited) व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांसाठी अर्ज मागविले आहेत. या अंतर्गत CIL एकूण 588 पदांची भरती करणार आहे. या पदांसाठी बीटेक, एमटेक, बीई, बीएस्सी अभियांत्रिकी पदवी प्राप्त यासाठी पात्र असणार आहेत. त्यामुळे ही पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेद्वारे खाण, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग आणि जिओलॉजी विभागात नेमणुका केल्या जातील. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाईट coalindia.in ला भेट देऊन लॉगइन करावे लागेल.
या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 10 ऑगस्ट, सकाळी 10 वाजता सुरू करण्यात आली होती आणि शुल्कासह ऑनलाइन सबमिट करण्याची अंतिम तारीख 9 सप्टेंबर रोजी दुपारी 11.59 पर्यंत आहे. सीआयएलने जारी केलेल्या निवेदनात, उमेदवारांनी आगाऊ अर्ज भरण्यास आणि शेवटच्या दिवसापर्यंत प्रतीक्षा करू नये, असे आवाहन केले आहे.
असा करा अर्ज
मॅनेजमेंट ट्रेनीच्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना प्रथम coalindia.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर होम पेजवरील "करिअर विथ CILC' या लिंकवर क्लिक करा. यानंतर "जॉब इन कोल इंडिया'वर क्लिक करा. त्यानंतर सर्व तपशील भरा आणि सर्व कागदपत्रे अपलोड करा. मग उमेदवार अर्जाचा प्रिंटआउट घेऊ शकतात आणि भविष्यातील संदर्भासाठी ठेवू शकतात.
हे असेल शुल्क
सामान्य, ओबीसी, ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांना अर्जाच्या स्वरूपात जीएसटीसह 1180 रुपयांची रक्कम भरावी लागेल, तर एससी, एसटी, पीडब्ल्यूडी श्रेणीतील उमेदवारांना सूट दिली जाईल. या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
निवड प्रक्रिया
कोल इंडियाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार उमेदवारांची निवड गेट परीक्षेच्या आधारे केली जाईल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.