Air India Job : एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड AI Airport Services Limited (पूर्वी एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड म्हणून ओळख) यांनी देशातील सहाय्यक, अधिकारी आणि व्यवस्थापक या पदांवरील भरतीसाठी अधिसूचना आपल्या संकेतस्थळावर airindia.in जारी केली आहे. यासाठी उमेदवार 1 जून 2021 पर्यंत अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून मॅनेजर फायनान्सची 4 पदे, ऑफिसर अकाउंटची 7 पदे आणि सहाय्यक खात्यांची 4 पदे भरली जाणार आहेत. या पदांवरील व्यवस्थापकाला महिन्याला 50,000, एका अधिकाऱ्याला 32,200 तर सहाय्यकास 21,300 रुपयांपर्यंत पगार मिळणार आहेत. (Job Opportunity In AI Airport Services Limited Education News)
एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड यांनी देशातील सहाय्यक, अधिकारी आणि व्यवस्थापक या पदांवरील भरतीसाठी अधिसूचना आपल्या संकेतस्थळावर airindia.in जारी केली आहे.
मॅनेजरपदासाठी अर्ज करणारा उमेदवार भारतीय चार्टर्ड अकाउंन्टट्स ऑफ इंडियाचा चार्टर्ड अकाउंन्टट किंवा भारतीय कॉस्ट अकाउंन्टट्स ऑफ इंडियाचा कॉस्ट अकाउंन्टट असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया किंवा इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट्स ऑफ इंडियाचे सदस्य असावेत.
अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना इंटर चार्टर्ड अकाउंन्टट / इंटर कॉस्ट आणि मॅनेजमेंट अकाउंटन्सी किंवा एमबीए फायनान्स, एमएस-ऑफिस ऑपरेशन्सची पदवी असणे आवश्यक आहे. अकाउंन्टट आणि वित्त कामांमध्ये शिक्षण घेतल्यानंतर 3 वर्ष किंवा त्याहून अधिक अनुभव असणे आवश्यक आहे.
सहाय्यक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 + 2 + 3 पॅटर्न अंतर्गत पदवी प्राप्त केली पाहिजे. अकाउंन्टट आणि वित्त कार्यालयात 1 वर्ष किंवा अधिक अनुभव असावा. याशिवाय ईएसआयसी, पीएफ, कल्याण निधी, व्यावसायिक कर, जीएसटी आणि बिलिंग इत्यादींचा उपयुक्त अनुभव असावा.
Job Opportunity In AI Airport Services Limited Education News
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.