Amazon seasonal employment sakal
एज्युकेशन जॉब्स

Job Opportunity : सणासुदीमुळे ई-कॉमर्समध्ये लाखो रोजगारांची निर्मिती; ॲमेझॉनमध्ये एक लाखाहून अधिक नोकऱ्या

ॲमेझॉन इंडियाने दिल्ली एनसीआर, गुवाहटी आणि पाटणा येथे तीन नवी फुलफिलमेंट सेंटर सुरू केल्याची घोषणा केली आहे.  

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आगामी सणासुदीच्या काळावर लक्ष केंद्रित करत ई-कॉमर्स कंपन्यांनी हंगामी कर्मचारी भरती करण्यासह आपले वाहतूक जाळे तसेच गोदामांची संख्या वाढविण्यावर भर दिला आहे. त्यामुळे देशात लाखो हंगामी नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत.

ॲमेझॉन इंडियाने दिल्ली एनसीआर, गुवाहटी आणि पाटणा येथे तीन नवी फुलफिलमेंट सेंटर सुरू केल्याची घोषणा केली आहे.  यामुळे उत्तर आणि पूर्व भारतातील घरपोच वस्तू देण्याचा वेग वाढणार आहे. यातील गुंतवणुकीमुळे या राज्यांतील २.५ लाखांहून अधिक विक्रेत्यांना होणार आहे.

या भागातील आर्थिक उलाढाल वाढण्यासह अधिक रोजगारांची निर्मिती होण्यास चालना मिळेल, असे कंपनीने म्हटले आहे. आसामचे मुख्यमंत्री डॉ. हेमंता बिस्वा सर्मा यांनीही ‘ॲमेझॉन’च्या या उपक्रमामुळे अर्थव्यवस्थेलाही फायदा होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. सध्या देशात कंपनीची १९ राज्यांत २००० केंद्रे असून, जलद वाहतूकीसाठी भारतीय रेल्वे व टपाल खात्याशी भागीदारी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elcid Investments Share Price: जुलै महिन्यात ३ रुपयांना असलेल्या शेअरची किंमत २ लाख ३६ हजार; MRF चं रेकॉर्ड मोडलं

Sports Bulletin 29th October : न्यूझीलंडविरूद्धच्या वन-डे मालिकेत भारतीय महिला संघाची बाजी ते स्मृती माधनाचे विक्रमी शतक

INDW vs NZW: Smriti Mandhana चे विक्रमी शतक अन् भारताने सामन्यासह जिंकली मालिका

Rahul Gandhi: ''अदानींच्या एकाधिकारशाहीला सरकारचे संरक्षण'', राहुल गांधींचा गंभीर आरोप

Government Jobs: पेपरफुटीच्या कायद्यामुळे महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षांवरचं विघ्न टळलं, एक लाख उमेदवारांची निर्विघ्न भरती

SCROLL FOR NEXT