k ravindra writes about Preparation for JEE Advanced 2023 education  sakal
एज्युकेशन जॉब्स

JEE Advanced 2023 : तयारी जेईई ॲडव्हान्सची...!

जेईई ॲडव्हान्स-२०२३ ही परीक्षा ४ जून २०२३ ला घेतली जाईल.

सकाळ वृत्तसेवा

- के. रवींद्र

जेईई ॲडव्हान्स-२०२३ ही परीक्षा ४ जून २०२३ ला घेतली जाईल. भारतीय तंत्रज्ञान संस्था (IITs), खरगपूर, कानपूर, मद्रास, गुवाहाटी, दिल्ली, मुंबई, रूरकी, या सात पैकी एकाद्वारे विभागीय दरवर्षी रोटेशनल पद्धतीने विभागीय समन्वयद्वारे घेतली जाणारी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आहे. संयुक्त प्रवेश मंडळाच्या (जेएबी) मार्गदर्शनाखाली आयोजित केली जाते.

उमेदवारांना अभियांत्रिकी आणि आर्किटेक्चर अभ्यासक्रमांना बॅचलर इंटिग्रेटेड मास्टर किंवा बॅचलर मास्टरच्या ड्युअल डिग्री कोर्समध्ये प्रवेश दिला जातो. जेईई ॲडव्हान्स-२०२३ परीक्षा केंद्रावर आधारित ऑनलाइन (CBT) पद्धतीने घेतली जाते.

जेईई अॅडव्हान्स परीक्षेत पेपर-१ आणि पेपर-२ हे दोन अनिवार्य असतील. प्रत्येक पेपरसाठी ३ तासांचा कालावधी आहे.

उमेदवार जेईई ॲडव्हान्स-२०२३साठी पात्रता निकष, नोंदणी, परीक्षा नमुना अभ्यासक्रम आणि महत्त्वाच्या अपडेट्स असे ः

पात्रता निकष

  • जेईई (मुख्य) २०२३च्या बीई/बीटेक पेपरमध्ये (सर्व श्रेणींसह) शीर्ष २,५०,००० यशस्वी उमेदवारांपैकी असावा.

  • उमेदवारांचा जन्म १ ऑक्टोबर १९९८ रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा. अनुसुचित जाती, जमाती, पीडब्ल्यूडी उमेदवारांना वयात पाच वर्षांची सूट आहे. म्हणजेच या उमेदवारांचा जन्म १ ऑक्टोबर १९९३ रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा.

  • उमेदवार सलग दोन वर्षांत जास्तीत जास्त दोन वेळा जेईई (ॲडव्हान्स)चा प्रयत्न करू शकतो.

  • उमेदवाराने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह २०२२ किंवा २०२३ मध्ये प्रथमच बारावी (किंवा समतुल्य) परीक्षा दिली असावी.

परीक्षा नमुना

परीक्षा ऑनलाइन (Computer Based test -CBT) मोडद्वारे घेतली जाते, पेपर १ आणि पेपर २ दोन्हीमध्ये ३ भाग असतील.

पेपर १

सेक्शन १ : (एकूण प्रश्न - ६, गुण - १८)

प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्याय, योग्य उत्तरासाठी ३ गुण, अयोग्य उत्तरासाठी एक गुण वजा होणार आहे.

सेक्शन २ : (एकूण प्रश्न - ६, एकूण गुण - २४)

प्रत्येक प्रश्नासाठी उत्तरांचे चार पर्याय. योग्य पर्याय निवडल्या चार गुण मिळतील. अयोग्य उत्तराला दोन गुण वजा होईल.

सेक्शन ३ : (एकूण प्रश्न - ६, एकूण गुण - २४)

प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला न्युमरिकल व्हॅल्यू. योग्य पर्याय निवडल्यास चार गुण मिळतील. यात नकारात्मक मूल्यांकन नाही.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

१. दहावीचे प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र

२. बारावी (किंवा समकक्ष परीक्षा) प्रमाणपत्र

३. जातीचे प्रमाणपत्र

४. अतिरिक्त जातीचे प्रमाणपत्र (पर्यायी)

५. PwD प्रमाणपत्र (पर्यायी)

६. लेखक विनंती पत्र (पर्यायी)

७. डीएस प्रमाणपत्र (पर्यायी)

८. OCI कार्ड/PIO कार्ड (पर्यायी)

महत्त्वाच्या तारखा ः १. ऑनलाइन नोंदणी ः रविवार ३० एप्रिल ते गुरुवार ४ मे २०२३

२. परीक्षा ः रविवार ४ जून २०२३

महत्त्वाच्या लिंक ः https://jeeadv.ac.in, https://vidyarthimitra.org/news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT