- के. रवींद्र
भारतीय स्थापत्य (आर्किटेक्चर) हे समृद्ध इतिहास आणि वैविध्यपूर्ण संस्कृती, विविध शैली, परंपरा आणि प्रभाव यांचे आकर्षक मिश्रण आहे. आर्किटेक्चर ही इमारती आणि इतर भौतिक संरचनांची बांधणी करण्यासाठी कला आणि विज्ञान आहे. बारावीनंतर आर्किटेक्चर कोर्सला प्रवेश मिळविण्यासाठी नॅशनल अॅप्टिट्यूड टेस्ट आर्किटेक्चर (NATA/नाटा) किंवा जेईई-पेपर-२ दोन्हींपैकी एक प्रवेश परीक्षा देणे आवश्यक आहे.
‘नाटा’ ही राष्ट्रीय स्तरीय प्रवेश परीक्षा भारतातील विविध सहभागी महाविद्यालयांमध्ये आर्किटेक्चर पदवी ५ वर्ष अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर (COA)द्वारे आयोजित केली जाते. महाराष्ट्रात ७१ महाविद्यालांमध्ये ही प्रवेश प्रक्रिया राबविली जाते.
परीक्षा वेळापत्रक
जेईई मेन - सत्र १ - २४ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२४ दरम्यान असेल तर सत्र २ची परीक्षा १ ते १५ एप्रिल २०२४ दरम्यान होईल.
पात्रता
बारावी उत्तीर्ण व किमान सायन्स विद्याशाखेतून फिजिक्स व केमिस्ट्रीमध्ये किमान ५० टक्के व मॅथमॅटिक्समध्ये ५० टक्के असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा नाही
परीक्षा पॅटर्न
एकूण १२५ प्रश्न
एकूण २०० गुण
गुणांकन पद्धत प्रश्न १ किंवा २ किंवा ३ गुणांचे
वेळ १८० मिनिटे
ऑनलाइन परीक्षा पद्धती
परीक्षेचा अभ्यासक्रम
डायग्रामटिक रिझनिंग : आकृत्या आणि परिस्थितींद्वारे विद्यार्थ्यांची तर्कशक्तीची चाचणी घेतली जाईल.
न्यूमेरिल रिझनिंग : विद्यार्थ्यांची गणितीय क्षमता तपासण्यासाठी
इनडकटिव्ह रिझनिंग : पॅटर्नचे निरीक्षण करून डेटाचे विश्लेषण करण्याची क्षमता
सिच्युएशनल जजमेंट : समस्या सोडवण्याची क्षमता चाचणी
लॉजिकल रिझनिंग : अनुक्रम किंवा आकार आणि प्रतिमा यांच्यातील संबंध ओळखण्याची क्षमता
अॅबस्ट्रॅक्ट रिझनिंग : सामान्य ज्ञान आणि विशिष्ट प्रश्न देऊन ते सोडविण्याची क्षमता तपासली जाईल.
जेईई पेपर-२
ही परीक्षा बी-आर्च आणि बी-प्लॅन अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाते. ड्रॉइंगचा भाग वगळता ही परीक्षा संगणक आधारित चाचणी ऑनलाइन घेतली जाईल.
मुख्य पेपर-२ चे दोन भाग आहेत, पेपर २-A जो बी-आर्चसाठी आहे आणि पेपर २-B बी-प्लॅनसाठी आहे. आर्च पेपरमध्ये गणित, सामान्य अभियोग्यता आणि रेखाचित्र विभागातील प्रश्न विचारले जातात. पेपर २-B मध्ये गणित, सामान्य योग्यता आणि नियोजन या विषयावर प्रश्न आहेत.
एकूण गुण - बी-आर्च/बीप्लॅन - ४००
एकूण प्रश्न बी-आर्च - ८२ प्रश्न
बी-प्लॅन - १०५ प्रश्न
जेईई पेपर-२ - गुणांकन योजना -
प्रत्येक योग्य उत्तरासाठी ४ गुण
प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १ वजा
प्रयत्न न केलेल्या प्रश्नांसाठी कोणतेही गुण नाहीत
‘एमसीक्यू’ नसलेल्या प्रश्नांसाठी निगेटिव्ह मार्किंग नाही
जेईई पेपर २ - परीक्षेचा कालावधी
बी-टेक/बी-आर्च/बी/प्लॅनिंगसाठी ३ तास
बी-आर्च आणि बी-प्लॅनिंग दोन्हीसाठी ३.५ तास
जेईई पेपर-२ - परीक्षेची पद्धत -
संगणित आधारित चाचणी (CBT)
बी-आर्चमध्ये ड्रॉइंग विभागासाठी पेन आणि पेपर-आधारित चाचणी (पीबीटी).
महत्त्वाच्या लिंक -
https://www.nata.in
https://jeemain.nta.nic.in
https://vidyarthimitra.org/news
(लेखक विद्यार्थी मित्र www.VidyarthiMitra.orgचे संस्थापक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.