Karnataka High Court esakal
एज्युकेशन जॉब्स

Board Exam : परीक्षेवरील स्थगिती उठवली, आता पाचवी ते अकरावीची बोर्ड परीक्षा घेण्यास High Court ची परवानगी

उच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपीठाच्या एकल सदस्यीय पीठाने इयत्ता पाचवी, आठवी, नववी आणि ११ वीच्या बोर्डाची परीक्षा रद्द केल्या होत्या.

सकाळ डिजिटल टीम

११ मार्चपासून बोर्डाची परीक्षा घेण्यासाठी शिक्षण विभागाने सर्व प्रकारची तयारी केली आहे. या टप्प्यावर एक सदस्यीय खंडपीठाने शिक्षण विभागाचे परिपत्रक रद्द केल्याने परीक्षा घेण्यात अनेक अडचणी येणार आहेत.

बंगळूर : महत्त्वपूर्ण घडामोडीत उच्च न्यायालयाच्या (High Court) विभागीय पीठाने गुरुवारी इयत्ता पाचवी, आठवी, नववी आणि ११ वीच्या बोर्डाच्या परीक्षा (Board Exam घेण्यास परवानगी दिली. बुधवारीच उच्च न्यायालयाच्या एक सदस्यीय पीठाने या वर्गांच्या बोर्ड परीक्षा घेण्यास स्थगिती दिली होती.

बुधवारी उच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपीठाच्या एकल सदस्यीय पीठाने इयत्ता पाचवी, आठवी, नववी आणि ११ वीच्या बोर्डाची परीक्षा रद्द केल्या होत्या. या आदेशाला आव्हान देणाऱ्या सरकारने दाखल केलेल्या अपिलावर सुनावणी झाली. या पार्श्वभूमीवर सोमवारपासून बोर्डाच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहेत.

सन २०२३-२४ पासून सरकारने (Government School) कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाद्वारे इयत्ता पाचवी, आठवी, नववी, अकरावी विद्यार्थ्यांसाठी बोर्ड परीक्षा घेण्याचा आदेश जारी केला होता. सरकारच्या या आदेशाला आव्हान देत विनाअनुदानित शाळांच्या संघटनेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाच्या एकल सदस्यीय खंडपीठाने बोर्ड परीक्षा रद्द केली होती. मात्र, राज्य सरकारने या आदेशाविरोधात अपील दाखल केले.

११ मार्चपासून बोर्डाची परीक्षा घेण्यासाठी शिक्षण विभागाने सर्व प्रकारची तयारी केली आहे. या टप्प्यावर एक सदस्यीय खंडपीठाने शिक्षण विभागाचे परिपत्रक रद्द केल्याने परीक्षा घेण्यात अनेक अडचणी येणार आहेत. त्यामुळे या अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यात यावी. एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाच्या आदेशाला स्थगिती द्यावी. परीक्षेचे वेळापत्रक तयार आहे, अशी विनंती याचिकेत केली होती. त्यावर खंडपीठ अस्तित्वात नाही. त्यामुळे आज दुसरे खंडपीठ स्थापन करून सुनावणी घेण्याची व्यवस्था केली जाईल, असे मुख्य न्यायमूर्तींनी उत्तर दिले होते. त्यानुसार तातडीने सुनावणी घेऊन परीक्षेवरील स्थगिती उठविली.

नववी आणि ११ वीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्ड परीक्षा घेतल्याने विद्यार्थी गांभीर्याने अभ्यास करतील. तसे दिसून आले आहे.

-मधु बंगारप्पा, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT