औरंगाबाद : केंद्रीय विद्यालय (केव्हीएस) Kendriya Vidyalaya आज ३० जून रोजी केव्हीएस प्रवेश २०२१ इयत्ता पहिली साठीची दुसरी यादी जाहीर करणार आहे. ऑनलाईन नोंदणी केलेल्यांना केव्हीएसच्या अधिकृत संकेतस्थळ kvsonlineadmission.kvs.gov.in वर ऑनलाईन यादी पाहता येऊ शकते. प्रवेशासाठी पहिली यादी २३ जून रोजी जाहीर करण्यात आली होती. निवड यादीत पात्र उमेदवारांचा प्रवेश केवळ सेवा आवश्यकता श्रेणीतून (एक आणि दोन) आरटीईनुसार होईल. जागा रिक्त राहिल्यावर तिसरी यादी ता.५ जुलै २०२१ रोजी जाहीर केली जाणार आहे. बिगर आरक्षित जागांसाठी प्राथमिक सेवा श्रेणीनुसार उमेदवारांच्या शेवटच्या निवड यादीची घोषणा २ जुलै ते ६ जुलै २०२१ पर्यंत होईल. पालकांना पुढे दिलेल्या सोप्या टप्प्यानुसार लिस्ट पाहता येऊ शकते.kendriya vidyalaya admission 2021 class 1 second list today release
कशा पद्धतीने केव्हीएस प्रवेश २०२१ साठी दुसऱ्या यादी पाहावी?
सर्वप्रथम संबंधित केव्हीएसच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे. About KVS वर क्लिक करा आणि सूचनावर जा. विद्यालयाची निवड करा, जिथे तुम्ही अर्ज करता. सर्चवर क्लिक करा आणि विद्यालयाचे तपशील स्क्रिनवर येईल. विद्यालयाच्या संकेतस्थळाच्या अॅडमिशन डिटेल्स लिंकवर क्लिक करा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.