Education : कोठेही काम करताना सुरक्षा महत्त्वाची असते. राहात असलेल्या घरापासून काम करत असलेल्या ठिकाणापर्यंत सुरक्षा सांभाळणे गरजेचे आहे. या सर्व सुरक्षेचे ज्ञान आपणास विविध अभ्यासक्रमांतून मिळते. कंपनीत सेफ्टी ऑफिसर, फायर ऑफिसर यांच्याकडूनही मिळते. फायर व सेफ्टीमधील विविध अभ्यासक्रम आणि त्यातील संधी, याबाबत माहिती घेऊ.
सर्टिफिकेट कोर्स इन फायर इंजिनिअरिंग अॅण्ड सेफ्टी मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम एक वर्षाचा आहे. यात अग्निसुरक्षेच्या शिक्षणाबरोबरच प्राथमिक प्रात्यक्षिकाचेही प्रशिक्षण दिले जाते. या अभ्यासक्रमानंतर फायरमन, सेफ्टी सुपरवायझर या पदावर नोकरी मिळू शकते. यासाठी विद्यार्थ्यांची पात्रता १० वी पास, १२ वी पास/नापास असावी लागते. या कोर्सला जनशिक्षण संस्थान मनुष्यबळ विकास मंत्रालय नवी दिल्ली (जे. एस. एस.)ची मान्यता आहे.
पोस्ट एच. एस. सी. डिप्लोमा इन फायर सर्व्हिस इंजिनिअरिंग हा डिप्लोमा १२ वी, एम. सी. व्ही. सी., आय. टी. आयनंतर दोन वर्षांचा असून, या अभ्यासक्रमामध्ये फायरसंबंधी प्रात्यक्षिकांबरोबर अद्ययावत शिक्षण दिले जाते. या कोर्सनंतर फायर सबऑफिसर/इन्चार्ज या पदावर नोकरी मिळू शकते. या कोर्सला महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन (एम. एस. बी. टी. ई.) ची मान्यता आहे.
बी. एस्सी. किंवा कोणतीही इंजिनिअरिंग पदवी हा अभ्यासक्रम करता येतो. ज्याला इंडस्ट्रीमध्ये भरपूर मागणी आहे. फॅक्टरी अॅक्टनुसार या कोर्सचा सेफ्टी ऑफिसर म्हणून नेमणूक होण्यास उपयोग होतो. या कोर्सला महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन (एम.एस.बी.टी.ई.) ची मान्यता आहे. अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रात मागणी आहे. अभ्यासक्रमानुसार फायरमन, सेफ्टी सुपरवायझरपासून फायरसेफ्टी ऑफिसर/इन्चार्ज/मॅनेजर या पदापर्यंत नेमणूक होऊ शकते.
महाराष्ट्रात कोल्हापूर, पुणे, मुंबई, रत्नागिरी, नाशिक, तसेच कर्नाटक व गुजरात या राज्यांतसुद्धा अशा नोकरीची संधी, मोठमोठे कारखाने, विमानतळ, उद्योग समूह, बंदरे, फाईव्ह स्टार हॉटेल, अशा ठिकाणी खासगी स्वरूपात अग्निशामक दलाची व्यवस्था केलेली असते, शिवाय सहकारी कारखान्यांमध्ये सुरक्षा अधिकारी, स्टेट फायर डिपार्टमेंट आहेत. देशामध्ये व परदेशात नोकरीच्या भरपूर संधी आहेत.
महाराष्ट्रातील विविध संस्थेतून प्रशिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी जिंदाल, रेमंड, दास ऑफसेट, सहारा सिटी, टोसीटोरामॉन्टी, महिंद्रा, चाकण पुणे, भारती शिपयार्ड, वेस्टकोस्ट पेपर मिल, टाटा पुणे, जनरल मोटर्स, हिंदुस्थान युनिलिव्हर, फिनोलेक्स रत्नागिरी आदींसह नामांकित क्षेत्रात कार्यरत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.