Latur 12th Exam Result 2024 esakal
एज्युकेशन जॉब्स

Latur 12th Exam Result : लातूर विभागाचा पॅटर्नचं वेगळा! यंदाही मुली ठरल्या अव्वल, विभागाचा 92.36 टक्के निकाल

निकालाची परंपरा कायम ठेवत यंदाही मुलींनी लातूर विभागात (Latur Division) बाजी मारली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मागील वर्षी लातूर विभागाचा निकाल ९०.३७ टक्के इतका जाहीर झाला होता, अशी माहिती लातूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग यांनी दिली.

लातूर : हजारो विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे लक्ष ज्या निकालाकडे लागले होते, त्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Maharashtra Education Board) इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल (Latur 12th Exam Result) आज मंगळवारी (ता. २१) ऑनलाईन पद्धतीने अखेर जाहीर झाला. लातूर विभागाचा निकाल ९२.३६ टक्के इतका लागला असून मागील वर्षाच्या तुलनेत यंदाचा निकाल २ टक्क्यांनी वाढला आहे.

निकालाची परंपरा कायम ठेवत यंदाही मुलींनी लातूर विभागात (Latur Division) बाजी मारली आहे. राज्य मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च महिन्यात बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. लातूर विभागातील लातूर, नांदेड आणि धाराशिव या तीन जिल्ह्यातील ९२ हजार ९३६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यातील ९१ हजार ५२८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी ८४ हजार ५४१ अर्थात ९२.३६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून राज्याच्या एकूण निकालात लातूर विभाग हा सातव्या स्थानी आहे.

मागील वर्षी लातूर विभागाचा निकाल ९०.३७ टक्के इतका जाहीर झाला होता, अशी माहिती लातूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग यांनी दिली. विज्ञान शाखेच्या ५०,६६५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी ५०,३३५ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. यातील ४९,२२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेच्या ३०,१४३ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी २९,३३४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील २४,६७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

वाणिज्य शाखेच्या नोंदणी केलेल्या ८,३६५ विद्यार्थ्यांपैकी ८,२८० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील ७,६४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. व्यवसाय अभ्यासक्रमाच्या ३,३१९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ३,१५१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील २,६३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. आयटीआय शाखेच्या ४४० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी ४३८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील ३१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

परीक्षेला एकूण ५०,३६९ मुले तर ४१,१५९ मुली प्रविष्ट झाल्या होत्या. यातील ४५,३१३ मुले तर ३९,२२८ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. ९५.३० टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण होऊन त्यांनी मुलांच्या पुढे पाऊल टाकले आहे. परीक्षेत ८९.९६ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. यात एकूण प्राविण्यासह प्रथम श्रेणी १२ हजार १६९ विद्यार्थी झळकले आहेत. तर प्रथम श्रेणीत ३५,०५५, द्वितीय श्रेणीत ३१,५०९ आणि उत्तीर्ण श्रेणीत ५,८०८ विद्यार्थी चमकले आहेत.

जिल्हा परीक्षेस बसलेले उत्तीर्ण टक्केवारी

  • लातूर ३५५८९ ३३५६३ ९४.३०

  • नांदेड ४०१८३ ३६६१३ ९१.११

  • धाराशिव १५७५६ १४३६५ ९१.१७

  • एकूण ९१५२८ ८५५४१ ९२.३६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT