help each other sakal
एज्युकेशन जॉब्स

एकमेका सहाय्य करू...

सकाळ वृत्तसेवा

- प्रांजल गुंदेशा, संस्थापक, द इंटेलिजन्स प्लस

वेगाने होणारी तांत्रिक प्रगती, वाढते जागतिकीकरण आणि गुंतागुंतीची सामाजिक आव्हाने असलेल्या या युगात एकमेकांना प्रभावीपणे सहाय्य, सहकार्य करण्याची क्षमता असणं हे मुलं आणि मोठ्यांसाठी महत्त्वाचं कौशल्य ठरतं आहे. असं म्हटलं जातं की, ‘तुम्हाला थोडंच अंतर धावायचं असेल, तर तुम्ही ते एकट्याने धावू शकता; पण जर तुम्हाला लांब पल्ला गाठायचा असेल, ‘रिले’ करणं कधीही उपयुक्त ठरतं.’ त्यामुळेच सहकार्याची भावना असणं महत्त्वाचं आहे. सहकार्यातून काय साध्य केलं जाऊ शकतं? ते पाहूया!

कल्पनांची देवाण-घेवाण

मॅकिन्से अँड कंपनीला एका संशोधनातून असं आढळून आलं आहे की, वैविध्यपूर्ण आणि सर्वसमावेशक टीम असलेल्या संस्था त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा ३५ टक्के अधिक काम करत असतात. त्या मोठ्या जोमाने कार्यरत राहतात.

गुणवत्तापूर्ण शिक्षण

ज्या शैक्षणिक संस्था त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी प्रकल्पावर आधारित शिक्षण, समवयस्कांची शिकवणी यांसारखी विविध प्रारूपे (मॉडेल) शिक्षणात वापरतात, त्यांचे विद्यार्थ्यी व्यग्र राहतात आणि अधिक यशही मिळवतात. ज्या शाळा असे प्रारूप राबवतात त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत सतत बदल होतात आणि त्याचे चांगले परिणामही दिसून येतात.

निर्णयक्षमतेत वाढ

एमआयटी स्लोअन मॅनेजमेंट रिव्ह्यूमध्ये असं आढळून आलं आहे की, एकाच व्यक्तीने एखाद्या समस्येवर काम करण्यापेक्षा सर्वांनी एकत्रितपणे आपले ज्ञान, अनुभव आणि भिन्न दृष्टिकोन वापरला, तर जटिल समस्यांचे निराकरणही सहज होऊ शकते.

लवचिकता

लिनक्स आणि अपाचेसारख्या कंपन्यांच्या सॉफ्टवेअर प्रकल्पांमध्ये हजारो लोक योगदान देतात. त्यामुळे कार्यपद्धतीत लवचिकता येते. सॉफ्टवेअरमध्ये सतत सुधारणा होतात, ते अपडेट होते. हे सहयोगी मॉडेल केवळ नवोन्मेषाला पूरक ठरतं असं नाही, तर यामुळे सामूहिक काम होते आणि अनेक कुशल व्यक्तींच्या योगदानामुळे गुणवत्ता वाढते.

आपत्ती व्यवस्थापन

नैसर्गिक अथवा मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी आपत्कालीन सेवा देणाऱ्या संस्था, समाजातील विविध गट यांच्यात सहकार्याची भावना असणे महत्त्वाचे आहे. असे झाले तरच आपत्ती व्यवस्थापन जलद व उत्तम होऊ शकते.

संपर्कयंत्रणा

जेव्हा लहान संस्था एकत्र येऊन एखादे कार्य हाती घेतात, त्या वेळी सामूहिक संपर्कयंत्रणा तयार होते. याचा फायदा त्यांनाच होतो आणि हा त्यांचा ‘यूएसपी’ ठरू शकतो.

एखाद्या प्रकल्पावर काम करण्यासाठी तुम्ही उत्साह दाखवलात, तर ते तुमच्यासाठी आणि संस्थेसाठीही ‘गेम चेंजर’ ठरू शकतं.

तुम्ही आपले स्वारस्य खालील प्रकारे व्यक्त करू शकता -

  • ‘माझा विश्वास आहे की, आमची कौशल्ये एकत्र आल्यास काम अधिक उत्तम होऊ शकते. यासाठी आम्ही कसे सहकार्य करू शकतो?’

  • ‘तुमचा दृष्टिकोन प्रभावी आहे. मला तुमच्यासोबत काम करायला आवडेल.’

  • या प्रकल्पात भरपूर क्षमता आहे. मला यात योगदान द्यायला आवडेल.’

  • ‘माझ्याकडे काही कल्पना आहेत, त्या तुम्ही करत असलेल्या गोष्टींना पूरक ठरू शकतात. आपण एकत्र काम करू शकतो का?’

  • ‘आपण एकत्र आल्यास आपल्या कल्पना अधिक व्यापक करू शकतो. चला, त्यासाठी सहकार्य करूया आणि हा प्रकल्प यशस्वी करूया.’

  • ‘आमच्या वैविध्यपूर्ण कौशल्यांसह, आम्ही हा प्रकल्प सर्व बाजूंनी हाताळू शकतो आणि त्यामुळे यश नक्कीच मिळेल. यासाठी आपण एक टीम म्हणून काम करूया का?’

  • ‘आपण एकत्रितपणे सर्व आव्हानांवर मात करू शकतो आणि त्यातून बाजारपेठेचे नेतृत्वही करू शकतो. यासाठी चला एकत्र येऊया.’

अशा प्रकारे तुम्ही समोरच्याला नवा प्रस्ताव देऊ शकता. प्रकल्पांमध्ये सहभाग नोंदवण्याबाबत विचारू शकता किंवा स्वतः पुढाकारही घेऊ शकता. अशा प्रकारची नवनवीन माहिती मिळवण्यासाठी इंस्टाग्रामवर pranjal_gundesha या पेजला आणि यू-ट्यूबवर TheIntelligencePlus या चॅनेलला फॉलो करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT