मुंबई : भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) नियुक्तीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (सामान्य) या पदांवर ही भरती होणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट licindia.in द्वारे फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. हेही वाचा - दुधदुभते मुबलक हवे....मग हे नक्कीच वाचा
भरती तपशील
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया १५ जानेवारीपासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०२३ आहे. सहाय्यक प्रशासकीय अधिकारी पदाच्या ३०० जागांवर भरती होणार आहे.
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
भारतीय आयुर्विमा महामंडळात सहाय्यक प्रशासकीय अधिकारी पदासाठी अर्ज करणारे उमेदवार पदवीधर असावेत.
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय २१ वर्षे आणि कमाल वय ३० वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
अर्ज शुल्क
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या या भरतीसाठी अर्ज करणार्या उमेदवारांना अर्ज फी म्हणून ७०० रुपये भरावे लागतील. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ८५ रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
परीक्षा नमुना आणि पगार
उमेदवारांची निवड तीन टप्प्यांत होईल. LIC AAO 2023ची प्राथमिक परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची असेल आणि ती ऑनलाइन घेतली जाईल. यानंतर उमेदवाराला मुख्य परीक्षेला बसावे लागेल.
मुख्य परीक्षेतील यशस्वी उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना ५३ हजार ६०० रुपये पगार दिला जाईल. याशिवाय इतर सुविधाही उपलब्ध होणार आहेत.
भरतीच्या महत्त्वाच्या तारखा
ऑनलाइन नोंदणी आणि अर्ज शुल्क जमा करण्याची सुरुवातीची तारीख - 15.01.2023
ऑनलाइन नोंदणी आणि अर्ज शुल्क जमा करण्याची सुरुवातीची तारीख - 31.01.2023
परीक्षेच्या 7 ते 10 दिवस आधी परीक्षेसाठी प्रवेशपत्र
ऑनलाइन परीक्षेच्या तारखा (पूर्व परीक्षा) 17.02.2023 ते 20.02.2023
ऑनलाइन परीक्षेच्या तारखा (मुख्य परीक्षा) 18.03.2023
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.