LinkedIn Jobs Alerts  esakal
एज्युकेशन जॉब्स

LinkedIn Jobs Alerts: फ्रेशर आहात आणि चांगली नोकरी हवीय तर हे करायलाच हवं; LinkedIn नेच दिलाय लाखमोलाचा सल्ला

LinkedIn Learning Courses for jobs: पदवीधरांना लिंक्‍डइनकडून मोफत लर्निंग कोर्सेस् देण्यात आले आहेत

सकाळ डिजिटल टीम

LinkedIn Jobs Alerts: शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात असणाऱ्या नवीन पदवीधारकांसाठी लिंक्‍डइन (LinkedIn) या जगातील सर्वात मोठ्या व्‍यावसायिक नेटवर्कने काही नव्या संधी जाहीर केल्या आहेत. नोकरीच्या नव्या संधी, उद्योग व्यवसाय, कार्य व कौशल्‍यांबाबत नवीन डेटा लिंक्‍डइनने सादर केला आहे.

डिजाइन, एनालिटिक्स, प्रोग्रामिंग सॉफ्टवेयर इंजीनियर, सिस्टम इंजीनियर आणि प्रोग्रामिंग हेड या पदांसाठी भविष्यात अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. LinkedIn च्या करिअर स्टार्टर 2024 अहवालानुसार, युटिलिटीज हा पदवीधर पदवी असलेल्या व्यावसायिकांसाठी सर्वात वेगाने वाढणारा उद्योग आहे.

नवीन पदवीधरांना नियुक्त करणारे इतर शीर्ष उद्योगांमध्ये तेल, वायू आणि खाणकाम, रिअल इस्टेट, उपकरणे भाड्याने देणे सेवा आणि ग्राहक सेवा यांचा समावेश आहे. याशी संबंधित अभ्यासक्रम करणाऱ्यांना लवकरच नोकऱ्या मिळणार हे उघड आहे.

शैक्षणिक पार्श्वभूमीची पर्वा न करता विविध नोकऱ्यांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचे अहवालात म्हटले आहे. समाज आणि सोशल वर्क , लॉ, मार्केटींग आणि मीडिया आणि कम्युनिकेशन यासारख्या क्षेत्रात पदवीधर पदवीधारकांसाठी भरपूर संधी उपलब्ध आहेत. डिजिटल प्लॅटफॉर्मच्या आगमनाने, या क्षेत्रातील नोकऱ्या शोधणे सोपे झाले आहे आणि नवीन संधी देखील निर्माण होत आहेत.

निराजिता बॅनर्जी, (LinkedIn Career Expert & India Senior Managing Editor) लिंक्डइन करिअर तज्ञ आणि भारताच्या वरिष्ठ व्यवस्थापकीय संपादक म्हणाल्या, 'नोकरीच्या बाजारपेठेत विशेषतः करिअरच्या सुरुवातीला प्रवेश करणे कठीण असू शकते.

इंडस्ट्री ट्रेंड आणि इन-डिमांड नोकऱ्यांबद्दल जवळ राहणे आणि सुरुवातीला स्पष्ट न वाटणाऱ्या भूमिकांचा शोध घेणे तुमचे पर्याय विस्तृत करू शकतात. आता पारंपारिक अभ्यासापेक्षा वेगळे अभ्यासक्रम करणे आवश्यक झाले आहे, जे करिअर सुरू करण्यासाठी अधिक उपयुक्त ठरू शकतात.

लिंक्‍डइनच्‍या करिअर स्‍टार्टर २०२४ अहवालानुसार युटिलिटीज हा बॅचलर्स पदवी असलेल्‍या तरूण व्‍यावसायिकांसाठी झपाट्याने विकसित होत असलेला उद्योग आहे. नवीन पदवीधरांना कामावर घेणारे इतर अव्‍वल उद्योग आहेत ऑईल, गॅस अँड मायनिंग, रिअल इस्‍टेट, इक्विपमेंअ रेण्‍टल सर्विसेस् आणि कंझ्युमर सर्विसेस्. तसेच, बॅचलर्स पदवी नसलेल्‍यांसाठी शिक्षण, तंत्रज्ञान व माहिती आणि मीडिया क्षेत्रांत भरपूर संधी आहेत.

लिंक्‍डइनच्‍या रिपोर्टमधून विविध शैक्षणिक पात्रता असलेल्‍या व्‍यावसायिकांसाठी वैविध्‍यपूर्ण टॉप रोजगार निदर्शनास येतात. बॅचलर्स पदवीधारक सॉफ्टवेअर इंजीनिअर, सिस्‍टम इंजीनिअर आणि प्रोग्रामिंग अॅनालिस्‍ट अशा पदांना एक्‍स्‍प्‍लोअर करू शकतात.

शैक्षणिक पार्श्‍वभूमी कोणतीही असो विविध रोजगार कार्यांमध्‍ये झपाट्याने वाढ होत आहे. कम्‍युनिटी अँड सोशल सर्विसेस्, लीगल, मार्केटिंग आणि मीडिया अँड कम्‍युनिकेशन अशा क्षेत्रांमधील बॅचलर्स पदवीधारकांसाठी अनेक संधी उपलब्‍ध आहेत. बॅचलर्स पदवी नसलेल्‍या व्‍यक्‍तींसाठी देखील शिक्षण, मानवी संसाधन, मार्केटिंग आणि मीडिया अँड कम्‍युनिकेशन या क्षेत्रांमध्‍ये अनेक रोजगार संधी आहेत.

रोजगार शोधण्‍यास सुरूवात करणाऱ्या व्‍यक्‍तींसाठी लिंक्‍डइनकडून दिल्या गेलेल्या टिप्स

तुमची चांगले इंप्रेशन पाडण्‍यासाठी तुमच्‍या लिंक्‍डइन प्रोफाइलवर तुमची कौशल्‍ये दाखवा. लिंक्‍डइन तुम्‍ही सूचीबद्ध केलेल्‍या कौशल्‍यांचा वापर करत संबंधित रोजगाराबाबत माहिती देईल, ज्‍याबाबत कदाचित तुम्‍हाला पूर्वी माहित नसेल.

लिंक्‍डइनच्‍या ओपन टू वर्क फिचर (Open to Work feature) सह नवीन रोजगार संधींप्रती रूची दाखवा. आणि संबंधित ट्रेण्‍ड्सप्रती तुमचे स्‍वत:चे कन्‍टेन्‍ट पोस्‍ट करा.

तंत्रज्ञानाव्‍यतिरिक्‍त वाढते उद्योग उदयास आलेल्‍या AI दरम्‍यान प्रोग्रामिंग कौशल्‍यांची आवश्‍यकता असलेल्‍या पदांसाठी नियुक्‍ती करत आहेत. नोकरीचा शोध घेत असताना करिअरला कलाटणीला देणारे यासारखे ट्रेण्‍ड्स लक्षात ठेवा, ज्‍यामुळे तुम्‍हाला अनेक संधी मिळतील.

तुमच्‍या कौशल्‍यांशी संबंधित लिंक्‍डइन ग्रुप्‍समध्‍ये सामील व्‍हा. हा नेटवर्क करण्‍याचा आणि उपलब्‍ध असलेल्‍या व्‍यापक संधींबाबत जाणून घेण्‍याचा उत्तम मार्ग आहे.

पदवीधरांना लिंक्‍डइन ३० जून २०२४ पर्यंत मोफत लिंक्‍डइन लर्निंग कोर्सेस् देण्यात आले आहेत.

● Job hunting for college grads

● Turning an internship into a job

● Professional networking for career starters

● 30-Minute Resume Refresh

● Mastering common interview questions

● Negotiating Your Compensation Package

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT