SSC-Exam 
एज्युकेशन जॉब्स

SSC-HSC Exam Timetable: दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा मंगळवारपासून होणार सुरू

सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता. १५ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा मंगळवारपासून (ता. १६) सुरू होत आहे. दहावीच्या परीक्षेसाठी २८ हजार ९७६ विद्यार्थ्यांनी, तर बारावीच्या परीक्षेसाठी ५६ हजार ८४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये घेण्यात येणारी दहावीची पुरवणी परीक्षा १६ ते ३० जुलै आणि बारावीची पुरवणी परीक्षा १६ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे.

पुरवणी परीक्षेसाठी सकाळच्या सत्रात साडे दहा वाजता, तर दुपारच्या सत्रात अडीच वाजता परीक्षार्थ्याने परीक्षा दालनात उपस्थित राहणे आवश्यक आहे. परीक्षा दालनात सकाळच्या सत्रात अकरा वाजता, तसेच दुपारच्या सत्रात तीन वाजता प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येणार आहे. फेब्रुवारी-मार्चच्या परीक्षेप्रमाणेच जुलै-ऑगस्टच्या पुरवणी परीक्षेमध्येही पेपरच्या दिलेल्या वेळेनंतर दहा मिनिटे वेळ वाढून देण्यात आली आहे.

पुरवणी परीक्षेमध्ये प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन व श्रेणी परीक्षांचे ऑनलाइन पद्धतीने गुण भरून घेण्यात येणार आहेत. याबाबतची लिंक व सविस्तर सूचना विभागीय मंडळांमार्फत सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना दिली आहे, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे. मंडळामार्फत प्रसिद्ध आणि छपाई केलेले वेळापत्रकच ग्राह्य धरावे, अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, अशी सूचनाही राज्य मंडळाने दिली आहे.

दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी :

तपशील : दहावी : बारावी

मुले : २०,३७० : ३६,५९०

मुली : ८,६०५ : २०,२५०

तृतीयपंथी :०१ : ०५

एकूण : २८,९७६ : ५६,८४५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindenburg Research : हिंडेनबर्गचा नवा धमाका! स्विस बँकेतील ३१० दशलक्ष डॉलर गोठवले; अदानींचा संबंधाचाही केला दावा

Mumbai Police: मुंबई पोलिसांची जिगरबाज कामगिरी; समुद्रात बुडणाऱ्या दोघांना वाचवलं अन्...

Latest Marathi News Updates : संपूर्ण अंबरनाथ शहरात केमिकल गॅसचा पसरला धूर

Audi Car Accident : मुलाच्या 'कार'नाम्याचा बावनकुळेंना फटका; सीताबर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याचे 'संकेत'

Vande Bharat Railway : 'वंदे भारत'ची चाचणी यशस्वी; हुबळी-मिरज मार्गावर धावली रेल्वे, PM मोदींच्या हस्ते कधी उद्घाटन?

SCROLL FOR NEXT