महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल किंवा CET सेल ने MHT CET 2021 परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी केले आहेत.
सोलापूर : महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल (Maharashtra Common Entrance Test Cell) किंवा CET सेल ने MHT CET 2021 परीक्षेसाठी प्रवेशपत्र (Hall ticket) जारी केले आहेत. सेलने PCM किंवा अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेसाठी (Engineering entrance exam) MHT CET 2021 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी केले आहे. ज्या उमेदवारांनी या प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी केली आहे, ते cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाइटवर हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात. सेलने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, महाराष्ट्र MHT CET 2021 परीक्षा ही 20 सप्टेंबर 2021 ते 1 ऑक्टोबर 2021 या कालावधीत घेण्यात येईल. दरवर्षी पाच लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी यूजी प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी करतात.
असे करा प्रवेशपत्र डाउनलोड
पीसीएम प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org ला भेट द्या. त्यानंतर तुमच्या समोर नवीन विंडो ओपन होईल, त्या विंडोवर येथे दिलेल्या थेट लिंकवर क्लिक करा आणि नंतर MHT CET - Engineering Admission Window वर क्लिक करा. त्यानंतर MHT CET 2021 PCM ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी लिंक नवीन विंडोवर उघडेल. त्यानंतर नवीन विंडोमध्ये अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करा आणि लॉग इनवर क्लिक करा. त्यानंतर तुमचे लॉग इन अकाउंट लॉग इन विंडोवरून डाउनलोड करा. त्याची प्रिंट काढा आणि भविष्यासाठी ठेवा.
उमेदवारांनी लक्षात घ्यावे की, प्रवेशपत्रात परीक्षा केंद्राची तसेच वाटप केलेल्या स्लॉटची माहिती आहे. प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या तपशिलांचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि त्यानुसार परीक्षा केंद्रावर पोहोचा, असा सल्ला उमेदवारांना देण्यात आला आहे. हॉल तिकिटावर COVID-19 मार्गदर्शक सूचनांसह इतर सूचना देखील छापल्या जातील. उमेदवारांनी त्या देखील काळजीपूर्वक वाचून काटेकोरपणे पालन करावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.