Maharashtra Board 10th Result 2024  esakal
एज्युकेशन जॉब्स

Maharashtra Board 10th Result 2024 : दहावीतही कोकणचीच बाजी, यंदाचा निकाल १.९८ टक्के वाढला, जाणून घ्या संपूर्ण रिझल्ट

Maharashtra Board 10th Result 2024 : महाराष्ट्रात यंदा दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे.

मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal

Maharashtra Board 10th Result 2024 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकतीच इयत्ता दहावीच्या निकालाची एकूण टक्केवारी जाहीर केली आहे. यंदा दहावीचा एकूण निकाल ९५.८१ टक्के लागला आहे.

यावर्षी दहावीच्या निकालात १.९८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्यातील तब्बल १५ लाख ४९ हजार ३२६ विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२४ मध्ये घेतलेली दहावीची परीक्षा दिली. त्यातील १४ लाख ८४ हजार ४४१ म्हणजेच ९५.८१ टक्के विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.

राज्यात कोकण विभागातील ९९.०१ टक्के असे सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर यंदा नागपूर विभागाचा ९४.७३.टक्के असा सर्वात कमी निकाल लागला आहे. राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळामार्फत १ ते २६ मार्च दरम्यान दहावीची लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी राज्यातील २३ हजार २७२ माध्यमिक शाळांमधून एकूण १५ लाख ६० हजार १६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

त्यातील १५ लाख ४९ हजार ३२६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. सर्व विभागीय मंडळातून ९७.२१ टक्के (नियमित) विद्यार्थिंनी उत्तीर्ण झाल्या असून ९४.५६टक्के विद्यार्थी उत्तीर्ण आहेत. मुलांच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थिनींच्या निकालाची टक्केवारी २.६५ ने अधिक आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यात नऊ विभागीय मंडळातून २५ हजार ३२७ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील ५१.१६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर खासगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी २५ हजार ८९४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्याची उत्तीर्णतेची टक्केवारी ८०.४२ टक्के आहे. तर नऊ हजार ७८ दिव्यांग विद्यार्थ्यांनीपैकी आठ हजार ४६५ विद्यार्थी (९३.२५ टक्के) उत्तीर्ण झाले. राज्यात दहावीची परीक्षा मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, कन्नड, सिंधी आणि तेलगू यांसह आठ माध्यमात घेण्यात आली.

दहावीच्या निकालाची वैशिष्ट्ये:

  • दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी : ९३.२५ टक्के

  • १०० टक्के निकाल असणाऱ्या विषयांची संख्या : १८

  • १०० टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या : ९,३८२

  • १०० टक्के गुण असणारे विद्यार्थी : १८७

  • निकाल राखीव ठेवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या : १७

नियमित विद्यार्थ्यांची आकडेवारी :

  • तपशील : मुले  : मुली : एकूण

  • नोंदणी केलेले : ८,५९,४७८ : ७,४९,९११ : १६,०९,४४५

  • परीक्षा दिलेले : ८,२१,२६७ : ७,२८,०५९ : १५,४९,३२६

  • उत्तीर्ण झालेले : ७,७६,६३० : ७,०७,८११ : १४,८४,४४१

  • उत्तीर्णतेची टक्केवारी : ९४.५६ टक्के : ९७.२१ टक्के  : ९५.८१ टक्के

विभागीय मंडळनिहाय उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी :

विभागीय मंडळ : परीक्षा दिलेले : उत्तीर्ण झालेले : उत्तीर्णतेची टक्केवारी

  • पुणे : २,६२,९४९ : २,५३,६०० : ९६.४४ टक्के

  • नागपूर : १,४९,८९७ :  १,४२,००५ : ९४.७३ टक्के

  • औरंगाबाद : १,८२,८४४ : १,७४,०५६ : ९५.१९ टक्के

  • मुंबई : ३,३९,२६९ : ३,२५,१४२: ९५.१९ टक्के

  • कोल्हापूर : १,२७,८१८ : १,२४,५६७ : ९७.४५ टक्के

  • अमरावती : १,५९,६८४: १,५२,६३१: ९५.५८ टक्के

  • नाशिक : १,९५,५८२ : १,८६,३५२ : ९५.२८टक्के

  • लातूर : १,०४,५०३ : ९९,५१७ : ९५.२७ टक्के

  • कोकण : २६,७८०: २६,५१७ : ९९.०१टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

"Fake Narrative फार काळ टिकत नाही"; पंतप्रधान मोदींनी केलं विक्रांत मेस्सीच्या द साबरमती रिपोर्टचं कौतुक

Vikramgad Assembly constituency 2024 : स्थलांतरीत मजुरांमुळे मतदानाची टक्केवारी घटण्याची शक्यता, उमेदवारांपुढे आव्हान.

Sharad Pawar: बारामतीत शरद पवारांच्या सभेपूर्वी नाट्यमय घडामोडी, प्रतिभा पवारांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून अडवले, पहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT