जे उमेदवार या परीक्षेला बसणार आहेत, ते आवश्यक तपशील प्रविष्ट करून हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात.
सोलापूर : महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेचे (Maharashtra State Eligibility Test - Maharashtra SET) प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (Savitribai Phule Pune University) अधिकृत वेबसाइट setexam.unipune.ac.in वर हे प्रवेशपत्र जारी केले आहे. जे उमेदवार या परीक्षेला बसणार आहेत, ते आवश्यक तपशील प्रविष्ट करून हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात. याव्यतिरिक्त, खाली दिलेल्या थेट स्टेप्सचे अनुसरण करून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता.
असे करा चाचणी प्रवेशपत्र डाउनलोड
अधिकृत वेबसाइट setexam.unipune.ac.in ला भेट द्या. त्यानंतर लॉगइन करा. ऍप्लिकेशन नंबर व विद्यार्थ्यांच्या नावाद्वारे प्रवेशपत्र डाउनलोड करा असे दर्शवणाऱ्या लिंकवर क्लिक करा. स्क्रीनवर एक नवीन विंडो दिसेल. उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे, की प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी त्यांना त्यांचा लॉगइन जसे की अर्ज क्रमांक, जन्मतारीख यासह लॉगइन करावे लागेल. प्रवेशपत्र डाउनलोड झाल्यानंतर उमेदवारांनी भविष्यातील वापरासाठी त्याची एक प्रत प्रिंट काढून जवळ ठेवावी.
26 सप्टेंबरला होईल परीक्षा
सहाय्यक प्राध्यापक पदासाठी महाराष्ट्र SET परीक्षा 26 सप्टेंबर 2021 रोजी घेतली जाईल. उमेदवारांनी लक्षात घ्यावे, की परीक्षा मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, सोलापूर, अमरावती, नागपूर आणि इतर महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रांवर घेतली जाईल. ही परीक्षा कोरोना नियमांच्या प्रोटोकॉलसह आयोजित केली जाईल. त्यानुसार विद्यार्थ्यांना मास्क घालून, सोशल डिस्टन्स पाळून हॅंड सॅनिटायझरचाही वापर करावा लागेल. महाराष्ट्र राज्यात ही 37 वी SET परीक्षा असेल. या परीक्षेशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
98360 विद्यार्थ्यांनी केली नोंदणी
या वर्षी 98360 विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र SET परीक्षा 2021 मध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी केली आहे. उमेदवारांनी परीक्षेला जाण्यापूर्वी यादी व त्यांचे नाव तपासून घ्यावे. महाराष्ट्र SET 2021 परीक्षा पेपर 2 साठी घेतली जाईल आणि ती ऑब्जेक्टिव्ह मोडमध्ये असेल. पेपर 1 साठी एक तासाची वेळ देण्यात येईल. तर पेपर 2 साठी दोन तासांची अवधी देण्यात येईल. प्रश्न MCQ आधारित असतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.