marathi classical language sakal
एज्युकेशन जॉब्स

अभिजात 'मराठी'चा राजकोश

भाषाशुद्धीचा आग्रह छत्रपती शिवाजी महाराजांनी धरला होता आणि त्यातून राज्यव्यवहार कोश या अप्रतिम ग्रंथाची निर्मिती झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नुकताच आपल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आणि जगाच्या पाठीवरील सर्व मराठी भाषिक सुखावले, परंतु मराठी जनांनी केवळ आनंद साजरा करून चालणार नाही, तर आपल्या दैनंदिन संभाषणामध्ये, व्यवहारामध्ये आणि शिक्षणामध्ये मराठीचा अंतर्भाव करायला हवा, असा आग्रह भाषा अभ्यासकांकडून धरला जात आहे; आणि तो योग्यही आहे.

मात्र, आपल्याला माहीत आहे का की, असाच भाषाशुद्धीचा आग्रह छत्रपती शिवाजी महाराजांनी धरला होता आणि त्यातून राज्यव्यवहार कोश या अप्रतिम ग्रंथाची निर्मिती झाली आहे.

सुमारे साडेतीनशे-चारशे वर्षांपूर्वीचा तो गुलामगिरीचा काळ. भारतावर आणि महाराष्ट्रावर चालून आलेल्या या आक्रमकांनी आपल्या भूभागाप्रमाणे आपल्या भाषेवरीही आक्रमण केले होते. दैनंदिन व्यवहारात आणि राजदरबारात त्यांच्या भाषेचा प्रचंड भरणा झाला होता. छत्रपती शिवरायांनी परकीय शब्दांच्या आक्रमणातून मातृभाषेला मुक्त करण्यासाठी रघुनाथ पंडित या आपल्या पदरी असलेल्या एका विद्वानाला राज्यव्यवहार कोशाची निर्मिती करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार रघुनाथ पंडित आणि धुंडीराज व्यास या दोघांनी या कोशाची निर्मिती केली.

त्या काळात परस्परांना होणारे राजकीय पत्रव्यवहार, त्याचप्रमाणे सरकार दरबारी काम करणाऱ्या नोकर-चाकरांची पदे, शस्त्रास्त्रे, विविध अवजारे इथपासून ते सर्वसामान्यांच्या दैनंदिन बोलल्या जाणाऱ्या भाषेमध्ये परकीय शब्दांचा फार मोठा भरणा होता. त्या शब्दांना मराठी प्राकृत आणि आवश्यक तेथे संस्कृत भाषेतील अचूक पर्याय शोधून ते एका ग्रंथामध्ये संग्रहित करून ते प्रचलित करण्याचे काम या दोघांनी केले.

राज्यव्यवहार कोशामध्ये अरबी, फारसी, तुर्की या शब्दांना प्राकृत आणि संस्कृत अशा दोन्ही भाषांत मिळून प्रतिशब्द देण्यात आले आहेत. यापैकी काही शब्द आपण आजदेखील वापरतो. आपल्याकडे रूढ झालेले कित्येक मराठी शब्द हे मूळचे मराठी नसून परकीय भाषेतील आहेत हे आपल्यालाही माहीत नाही. जसे की, रुमाल या शब्दाला प्राकृत आणि संस्कृतमध्ये करवस्त्र असा शब्द वापरला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे वजीर, पागा, साहेब यांसारख्या शब्दांना प्रधान, अमात्य, अश्वशाळा आणि स्वामी यांसारखे आपल्या भाषेतील प्रतिशब्द या कोशात देण्यात आले आहेत. आपल्या दैनंदिन वापरातील गरम या शब्दाला उष्ण, गुलाम या शब्दाला दास अनेक शब्दही या कोशाने आपल्याला दिले आहेत.

अलीकडील काळात काशिनाथ क्षत्री, अ. द. मराठे यांसारख्या अभ्यासकांनी या राज्यव्यवहारकोशाला सुलभ स्वरूपात आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी संपादित केलेल्या या कोशात आजच्या संदर्भात शब्दांची नेमकी वर्गवारीही देण्यात आली आहे. त्यामुळे हा कोश वाचत असताना आपल्या शब्दज्ञानात नक्कीच भर पडणार आहे. मराठी भाषेच्या अभिजाततेचा अभिमान बाळगत असताना तिच्या अस्सल मराठमोळ्या स्वरूपाला टिकवण्यासाठी प्रयत्न करणेही तितकेच आवश्यक असून त्या दृष्टीने हा ग्रंथ अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावत आहे.

(संकलन : रोहित वाळिंबे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT