मुंबई : ‘म्हाडा’तर्फे ५६५ पदांच्या भरतीसाठी (Mhada Recruitment) आज रविवारी पहिल्या टप्प्यातील परीक्षा (Mhada Exam) घेण्यात येणार होत्या. मात्र, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Maharashtra Minister Jitendra Awhad) यांनी वेळेवर परीक्षा रद्द झाल्याची घोषणा केली. त्यांनी रात्री उशिरा ट्विटरवरून ही माहिती दिली. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांची माफी देखील मागितली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
आज कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), सहायक अभियंता (स्थापत्य) आणि सहाय्यक विधी सल्लागार या पदांसाठी सकाळच्या सत्रात, तर दुपारच्या सत्रात कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदाची सरळसेवा पद्धतीने परीक्षा होणार होती. मात्र, ही परीक्षा रद्द झाल्याचे आव्हाड यांनी सांगितले. काही तांत्रिक अडचणीमुळे आजच्या म्हाडाच्या परीक्षा आणि त्यानंतर होणाऱ्या सर्व परीक्षा जानेवारी महिन्यात घेणार आहेत. विद्यार्थ्यांनी सकाळी घराच्या बाहेर पडू नये, परीक्षा केंद्रावर जाऊ नये, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. त्यांनी विद्यार्थ्यांची माफी देखील मागितली.
परीक्षा रद्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. कुणाल सूर्यवंशी या तरुणानं ट्विटरवर जितेंद्र आव्हाड यांना टॅग करत म्हटलंय, की ''बस बंद आहेत आणि सकाळ ची परीक्षा होती. त्यामुळे खासगी गाडी करून परीक्षा केंद्रावर पोहोचलो आणि रात्री २ वाजता तुम्ही सांगताय की परीक्षा रद्द झाली. आता आर्थिक भुर्दंड कसा सहन करायचा? परीक्षा रद्द करायची होती तर कालच सांगायचं होतं. ऐनवेळी विद्यार्थ्यांचे हाल का करता?''
''मी परराज्यात शिकायला असतो. केवळ पेपर साठी ३००-४०० किमीचा प्रवास करून आलोय. बरेच जण अर्ध्या वाटेत असतील हो. निदान राजस्थान सरकारसारखा येण्याजाण्याचा खर्च तरी पुढील वेळेस परीक्षा रद्द करताना देण्यात यावा ही विनंती'', असं प्रणव नावाच्या एका विद्यार्थ्याने म्हटले आहे.
विद्यार्थ्यांना शुल्क परत मिळणार -
दरम्यान, MPSC समन्वय समितीने जितेंद्र आव्हाडांसोबत चर्चा केली. म्हाडाच्या परीक्षा यापुढे म्हाडा विभागातर्फेच घेण्यात येतील. परीक्षेला दिलेले सर्व परीक्षा शुल्क विद्यार्थांनी परत करण्यात येतील. तरीही आम्ही विभागा मार्फत परीक्षा घेण्यास संतुष्ट नाही, सर्व सरळसेवा परीक्षा MPSC मार्फतच घेण्यात याव्या या मागणीवर समन्वय समिती कायम, असल्याचं समन्वय समितीने सांगितले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.