dattatray bharne sakal media
एज्युकेशन जॉब्स

Education Update : 'या' विद्यार्थ्यांना 'MPSC'ची एक वाढीव संधी

संजीव भागवत

मुंबई : कोरोनामुळे (corona) मागील वर्षी ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही, त्यामुळे ज्यांची वयोमर्यादा संपली (Age limit end) होती, त्या विद्यार्थ्यांना लोकसेवा आयोगाच्या (MPSC Exam) परीक्षेसाठी एक वाढीव संधी (One more chance) दिली जाणार आहे. यासाठी लवकरच शासन निर्णय (Government Rule) काढला जाणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना आज दिली.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्याने वयोमर्यादा ओलांडलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांना एक वाढीव संधी देण्याबाबतचा शासन निर्णय रखडला आहे. मात्र कोविड परिस्थितीमुळे वयोमर्यादा ओलांडलेला एकही उमेदवार परीक्षा देण्यापासून वंचित राहणार नाही नसल्याचे भरणे यांनी सांगितले.

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून एमपीएससी आणि सरळसेवेच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना स्पर्धा परीक्षा देता येत नसल्याने राज्य सरकारने ११ नोव्हेंबर रोजी सर्व उमेदवारांना एमपीएससी परिक्षेकरिता एक वाढीव संधी देण्यासंदर्भातील निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र, त्यानंतर काही दिवसातच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच आचारसंहिता लागल्याने राज्य शासनाला यासंदर्बातील शासन निर्णय काढता आला नाही. परंतु, यासंदर्भात समाजमाध्यमांत चुकीची माहिती पसरविली जात होती. याबाबत सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज स्पष्टीकरण दिले.

मागील वर्षी राज्य सरकारने ५ मेच्या शासन निर्णयाने सरळसेवा भरतीवर बंदी आणली होती. दुसरीकडे, मराठा आरक्षणाच्या तिढ्यामुळे एमपीएससीची भरती प्रक्रिया दोन वर्षांपासून भरती प्रक्रिया रेंगाळली हेाती. त्यामुळे परिक्षेसाठी अर्ज केलेल्या हजारो उमेदवारांनी वयोमर्यादा ओलांडली. त्यामुळे राज्य सरकारने मागील महिन्यात सर्व उमेदवारांना एक वाढीव संधी देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, 'कोविड परिस्थितीमुळे वयोमर्यादा ओलांडलेला कुणीही उमेदवार परीक्षा देण्यापासून वंचित राहणार नाही.

येत्या १० डिसेंबरला स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी मतदान होत आहे त्यावेळी अंशत आचारसंहिता शिथिल होईल. तर, १४ डिसेंबरला निकाल लागल्यानंतर ती संपूर्णपणे उठेल. त्यानंतर तातडीने याबाबतचा शासन निर्णय काढेल. तसेच सदर बाबीची अंमलबजावणी करण्याचे निर्देश महाराष्ट्र लोकसेवा आयोगास दिले जातील, असे भरणे यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS W vs SA W: गतविजेता ऑस्ट्रेलिया 15 सामन्यानंतर मोक्याच्या क्षणी हरला; दक्षिण आफ्रिकेने इतिहास घडवला

Hamas Chief Death: हमास प्रमुख याह्या सिनवर इस्राईल लष्कराच्या हल्ल्यात ठार; पंतप्रधान नेत्यानाहूंची घोषणा

Baba Siddiqui Case: मुंबई पोलीस अॅक्शन मोडमध्ये, आरोपी शिवकुमार गौतम आणि जीशान अख्तरच्या विरोधात लुक आउट सर्कुलर जारी

Navi Mumbai Assembly Elections: नवी मुंबईत महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; शरद पवार गट नवा डाव खेळणार!

IND vs NZ: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्व बदलाचा फैसला झाला! न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघाची घोषणा

SCROLL FOR NEXT