education  sakal
एज्युकेशन जॉब्स

संवाद : कलात्मक गणित; भारतीय ज्ञानवृक्षाच्या संकल्पनेचे पुनरुज्जीवन

या आराखड्याचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये एकविसाव्या शतकातील स्किल्स आणि बहुशाखीय

सकाळ वृत्तसेवा

मृदुला अडावदकर

वेगवेगळ्या ज्ञानशाखांचा एकत्रित उपयोग करून नवीन ज्ञानाची निर्मिती करणे किंवा एखाद्या क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी त्याचा उपयोग करणे म्हणजे बहुशाखीय दृष्टिकोन. माहितीचा महापूर आलेल्या आजच्या जगात बहुशाखीय दृष्टिकोनाला महत्त्व प्राप्त झालेले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक आराखड्याला पूरक असा राज्य शैक्षणिक आराखडा तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे.

या आराखड्याचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये एकविसाव्या शतकातील स्किल्स आणि बहुशाखीय दृष्टिकोन यासाठी स्वतंत्र तज्ज्ञांची समिती गठित केलेली आहे. आतापर्यंत विज्ञान, कला, वाणिज्य, अभियांत्रिकी, वैद्यकीय तसेच विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र जीवशास्त्र, रसायनशास्त्र अशी अभ्यासक्रमांची सरधोपट विषय मांडणी दिसत होती. काळानुसार आणि उद्योगांच्या गरजेनुसार जीवशास्त्र, रसायनशास्त्र यांच्याशी संबंधित विषय अभियांत्रिकीमध्ये येऊ लागले. वैद्यकीय क्षेत्रात लागणाऱ्या उपकरण निर्मितीमध्ये त्याचा मोठा वाटा आहे. वाणिज्य, कला अशा विभाजित शाखाही काही वर्षांनी कदाचित दिसणार नाहीत. कारण विषय निवडीचे स्वातंत्र्य असल्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक पर्याय निर्माण झालेले आहेत.

काळानुसार उद्योगांचे स्वरूप बदलले आणि त्यात समस्या निराकरणासाठी आपल्या मूळ क्षेत्राबरोबर इतर ज्ञानशाखांचे आवश्यक तेवढे ज्ञान असणे महत्त्वाचे ठरेल. पर्यावरण आणि डिझाइन क्षेत्रातील तसेच सॉफ्ट स्किल्स शिकवणाऱ्य तज्ज्ञ व्यक्तींची गरज निर्माण झाली आहे. एका क्षेत्रात मिळवलेल्या ज्ञानाचे उपयोजन दुसऱ्या क्षेत्रात करता येईल, अशा व्यक्तींची गरज सर्वच क्षेत्रात निर्माण झाली आहे. स्टार्टअप कल्चरही समस्या निराकरण आणि नवनिर्मिती क्षमता या पायावरच उभे राहत आहे, परंतु ही क्षमता सरसकट सर्वांकडे नसते.

दुसरीकडे सर्वच उद्योग म्हणत आहेत की, मुलाखतीला येणाऱ्या उमेदवारांकडे कागदावर चमकदार करिअर दिसते, परंतु प्रत्यक्ष मुलाखतीत मात्र ते प्रभावहीन ठरतात. स्वतःचा विचार न करणे आणि ‘सांगकाम्या हो नाम्या’प्रमाणे काम करणे ही व्यवस्थापनाची तक्रार आहे. काहीजण टीममध्ये काम करू शकत नाहीत. आजकाल अनेक अभ्यासक्रमाविषयी बहुशाखीय अभ्यासक्रम असे विशेष नमूद केलेले असते. भरमसाट फी भरून या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणे प्रत्येकाला शक्य होत नाही. अशावेळी शालेय वयापासूनच आपल्या क्षमता सतत घासून पुसून ठेवणे महत्त्वाचे आहे. कलात्मक गणिताच्या माध्यमातून या क्षमतेचे विकसन करणे सहज शक्य आहे.

कोणतेही क्षेत्र असो वा शाखा असो गणित विषय सगळीकडे पुरून उरलेला आहे. गणिताचे उपयोजन होत नाही अशी एकही ज्ञानशाखा नाही. तरीही गणित विषयाचा अभ्यास केवळ परीक्षेपुरता करण्याची विद्यार्थ्यांची प्रवृत्ती दिसते. गणित विषय एकविसाव्या शतकातील स्किल्स शिकविण्याचे एक उत्तम साधन म्हणून उपयुक्त ठरणारा आहे. त्या दृष्टिकोनातून गणिताचा अभ्यासक्रम आखण्याची आवश्यकता आहे. संगणक, डेटा सायन्स, अभियांत्रिकी या क्षेत्रात गणिताचे महत्त्व सर्वांना माहीत आहे.

परंतु प्राचीन ग्रंथात उल्लेख केल्याप्रमाणे अनेक भारतीय कला, भाषा आणि गणित यांचेही सख्य दिसून येते. कलेच्या आविष्काराने मुग्ध होऊन गणिताच्या साहाय्याने मांडलेले कलेच्या निर्मितीचे शास्त्र आणि त्या शास्त्रातून नित्यनूतन मूर्त रूप घेऊन उभी राहिलेली विलक्षण भारतीय संगीतकला, स्थापत्यकला, मूर्तिकला. प्राचीन भारतीय संकल्पनेमध्ये विषयांचे प्रचलित पद्धतीसारखे सरधोपट कप्पे मांडलेले नव्हते. हे तत्त्व जगातील बहुसंख्य उत्तम म्हणविल्या जाणाऱ्या शिक्षण पद्धतीत पाळलेले दिसून येते. कलात्मक गणित या मालेत गणिताच्या याच नवनिर्मितीच्या तत्त्वांचा आपण पुढील भागात अधिक परिचय करून घेऊ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT