Engineering Education sakal
एज्युकेशन जॉब्स

बहुआयामी अभियांत्रिकी शिक्षण

दहावी-बारावीनंतर विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षण हा पर्याय नेहमीच कुतूहलाचा व हवाहवासा वाटत आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. डी. एस. बोरमाने

दहावी-बारावीनंतर विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षण हा पर्याय नेहमीच कुतूहलाचा व हवाहवासा वाटत आला आहे. दिवसेंदिवस अभियांत्रिकी शिक्षण बहुआयामी होत असून ज्ञान, कौशल्ये व व्यावसायिक मूल्ये यांवर या शिक्षणाची इमारत उभी आहे. आगामी काळात अभियांत्रिकी शिक्षण बदलत्या परिस्थितींमधील आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारेल, परंतु त्यासाठी काही गोष्टींची अंमलबजावणी होणे तितकेच आवश्यक आहे.

बहुविद्याशाखीय दृष्टिकोन : रासायनिक, यांत्रिक, विद्युत यांसारख्या विविध शाखांमधील विभागीय रेषा धूसर होत जातील. दैनंदिन जीवनातील अडचणी, प्रश्न सोडविण्यासाठी बहुविद्याशाखीय दृष्टिकोनाचा वापर केला जाईल. उपलब्ध माहितीचा महापूर आणि उद्योगांवर पडणारा आंतरराष्ट्रीय दबाव ही अभियांत्रिकी क्षेत्रासमोरील प्रमुख आव्हाने असतील.

शाश्वत विकास : शाश्वत विकास साधून पर्यावरणाचा ऱ्हास व नैसर्गिक संसाधनांच्या अतिवापरावर आळा आणला पाहिजे. भविष्यात शाश्वत विकासाच्या क्षेत्रात अभियंत्यांना प्राधान्य असेल.

सामाजिक जबाबदारी : समाजातील विविध घटकांमधील दरी कमी करण्यासाठी विकसित तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. आरोग्य, वाहतूक, गृहनिर्माण आणि एकूण राहणीमानाचा दर्जा समाजातील सर्व घटकांसाठी परवडणारा असावा. विद्यार्थ्यांमधील सामाजिक बांधिलकी हाही अभियांत्रिकी शिक्षणाचा प्रमुख घटक आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२० नुसार अभियांत्रिकी महाविद्यालये व विद्यापीठे ज्ञान, कौशल्ये, व्यावसायिक मूल्ये या प्रमुख घटकांसह परिपूर्ण शिक्षण देण्यावर अधिक भर देत आहे. झपाट्याने बदलणाऱ्या ज्ञानाच्या परिप्रेक्ष्यात अभियांत्रिकी शिक्षणक्षेत्रात अनेकानेक बदल होताना दिसत आहेत. आर्टिफिशिअल इंटेलिजेंस (कृत्रिम बुद्धिमत्ता), बिग डेटा, मशिन लर्निंग अशा विविध आधुनिक तंत्रज्ञानांची भर पडत असताना त्यानुसार महाविद्यालये आपल्या अभ्यासक्रमांमध्ये बदल करत आहेत. काही महत्त्वाच्या अभियांत्रिकी शाखांचा घेतलेला आढावा खालीलप्रमाणे -

१) यांत्रिक अभियांत्रिकी : यांत्रिक अभियांत्रिकी ही पारंपरिक आणि बहुअंगी अभियांत्रिकी शाखांपैकी एक आहे. यात यांत्रिक प्रणालीचे डिझाइन, विश्लेषण, उत्पादन आणि देखभाल यांचा समावेश होतो. यांत्रिक अभियंत्यांना ऑटोमोटिव्ह, एरोस्पेस, ऊर्जा, उत्पादन आणि रोबोटिक्स उद्योगांमध्ये विपुल प्रमाणात संधी आहेत.

२) स्थापत्य : स्थापत्य अभियांत्रिकी रस्ते, पूल, धरणे आणि इमारती यांसारख्या पायाभूत सुविधांचे डिझाइन, बांधकाम आणि देखभाल यांसाठी उपयुक्त आहे. बांधकाम व्यवस्थापन, शहर नियोजन, पर्यावरण अभियांत्रिकी आणि भू-तंत्र अभियांत्रिकी या क्षेत्रांतील करिअर मार्गांसह, सार्वजनिक आणि खासगी अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये स्थापत्य अभियंत्यांना (सिव्हिल इंजिनिअर्स) खूप मागणी आहे.

३) विद्युत : भारतातील विद्युत अभियांत्रिकी पदवीधरांना वीज निर्मिती आणि वितरण, नवीकरणीय ऊर्जा, दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स उपभोक्ता, उत्पादन, रोबोटिक्स आणि ऑटोमेशन, आयटी, संशोधन, सार्वजनिक क्षेत्र अशा विविध क्षेत्रांमध्ये करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. सध्या ई-व्हेईकलचे क्षेत्र संधी उपलब्ध करून देत आहे.

४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन : ही शाखा इलेक्ट्रॉनिक उपकरणे, सर्किट्स आणि संवाद (संप्रेषण) उपकरणे जसे की ट्रान्समीटर, रिसीव्हर्स आणि इंटिग्रेटेड सर्किट्स (आयसी) इत्यादीमध्ये काम पाहते. या शाखेतील पदवीधर आयटी, इलेक्ट्रॉनिक्स उपभोक्ता, एरोस्पेस उद्योगांमध्ये करिअर करू शकतात. नेटवर्क अभियंता, दूरसंचार अभियंता आणि इलेक्ट्रॉनिक्स डिझाइन अभियंता म्हणून जबाबदाऱ्या पार पाडू शकतात.

५) रसायन (केमिकल) : रासायनिक अभियांत्रिकी शाखा भौतिक विज्ञान (भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र), जीवन विज्ञान (जीवशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र आणि जैव रसायनशास्त्र), गणित आणि अर्थशास्त्र यांच्यासोबतच रासायनिक उर्जेचे उत्पादन व परिवर्तन इ.मध्ये उपयुक्त ठरते. या शाखेतील पदवीधरांना फार्मास्युटिकल्स, पेट्रोकेमिकल्स, फूड प्रोसेसिंग, पर्यावरणीय आरोग्य, तसेच सुरक्षा क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.

सध्या माहिती व तंत्रज्ञान क्षेत्र वेगाने वाटचाल करत आहे. त्या अनुषंगाने अभियांत्रिकीमध्ये काही नवीन शाखांचा समावेश करण्यात आला आहे. जसे की,

कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) व मशिन लर्निंग : एआय व एमएल सध्याच्या उद्योगक्षेत्रांमध्ये क्रांती घडवत आहेत. संशोधन आणि विकास, डेटा विज्ञान, रोबोटिक्स आणि सॉफ्टवेअर अभियांत्रिकीमध्ये अनेक संधी निर्माण झाल्या आहेत.

रोबोटिक्स व ऑटोमेशन : रोबोटिक्स व ऑटोमेशन ही शाखा रोबोट्स आणि ऑटोमेटेड सीस्टिमची रचना, बांधणी तसेच ऑपरेट करण्यावर भर देतात. हे तंत्रज्ञान उत्पादन, आरोग्यसेवा, शेती, संरक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण आहे.

माहिती व तंत्रज्ञान : सध्याच्या काळात इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी हे प्रचंड वेगाने वाढणारे क्षेत्र असून संगणकीय तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, माहिती प्रणालीशी हे संबंधित आहे. वित्त, आरोग्यसेवा, शिक्षण यांसह अक्षरशः प्रत्येक उद्योगात आयटी पदवीधरांना मागणी आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपर, सीस्टिम ॲनालिस्ट, सायबर सुरक्षातज्ज्ञ, आयटी सल्लागार म्हणून या क्षेत्रात मुबलक प्रमाणात संधी उपलब्ध आहेत.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करत कौशल्यपूर्ण पदवीधर व कुशल मनुष्यबळ निर्माण करणे, हाच उद्देश सध्या यातून स्पष्ट होतो. भारत एक आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान केंद्र म्हणून उदयास येत असताना, अभियांत्रिकी पदवीधरांसाठी आशादायक चित्र आहे.

(लेखक एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Trending News : काॅंग्रेसचे दोन गट भररस्त्यात भिडले, तितक्यात अॅम्बुलन्स आली अन् पुढे जे घडलं...

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

SCROLL FOR NEXT