Jobs esakal
एज्युकेशन जॉब्स

NBCC India करतेय विविध कंत्राटी आणि नियमित पदांची भरती!

NBCC India करतेय विविध कंत्राटी आणि नियमित पदांची भरती!

सकाळ वृत्तसेवा

एनबीसीसी, दिल्ली येथे सरकारी नोकरी शोधत असलेल्या इच्छुकांसाठी नोकरीची संधी आहे.

सोलापूर : एनबीसीसी, दिल्ली (Delhi) येथे सरकारी नोकरी (Government Jobs) शोधत असलेल्या इच्छुकांसाठी नोकरीची संधी आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या (Union Ministry of Housing and Urban Affairs) अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी (Public Sector Company - PSU) NBCC (इंडिया) लिमिटेडने दोन स्वतंत्र भरती (Recruitment) जाहिरातींद्वारे एकूण 82 पदांसाठी अर्ज मागविले आहेत. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक उमेदवार NBCC च्या nbccindia.com या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या फॉर्मद्वारे अर्ज करू शकतात. उमेदवारांनी नोंद घ्यावी, की जाहिरात केलेल्या दोन भरतींपैकी एक कंत्राटी पद्धतीने करावयाची आहे, तर दुसरी जाहिरातीखाली घोषित केलेल्या पदांसाठी नियमितपणे निवडली जाणार आहे. (NBCC India recruits for various contract and regular posts)

12 मार्केटिंग एक्‍झिक्‍युटिव्ह पदांची भरती (जाहिरात क्र. 21/2021)

NBCC इंडियाने मार्केटिंग एक्‍झिक्‍युटिव्हच्या (Marketing Executive) 12 पदांसाठी भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे. बुधवार, 15 डिसेंबर 2021 रोजी कंपनीने जारी केलेल्या जाहिरातीनुसार, मार्केटिंग एक्‍झिक्‍युटिव्हच्या पदांवर कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार आहे आणि कराराचा कालावधी सुरुवातीला दोन वर्षांचा असेल. तथापि, उमेदवाराच्या कामगिरीवर आणि कंपनीच्या गरजेनुसार हा कालावधी आणखी वाढविला जाऊ शकतो. स्वारस्य असलेले आणि पात्र उमेदवार कंपनीच्या वेबसाइटवरील करिअर विभागात दिलेल्या लिंकवरून भरतीची जाहिरात डाउनलोड करू शकतात. अर्जाचा फॉर्म भरतीच्या जाहिरातीतच दिला आहे. हा फॉर्म पूर्णपणे भरा आणि आवश्‍यक कागदपत्रे आणि अर्ज शुल्काचा 500 रुपयांचा डिमांड ड्राफ्ट संलग्न करा आणि 13 जानेवारी 2022 पर्यंत मुख्य महाव्यवस्थापक (HRM), NBCC (इंडिया) लिमिटेड, NBCC भवन, दुसरा मजला, लोधी हॉटेल जवळ, लोधी रोड, नवी दिल्ली - 110003 कॉर्पोरेट कार्यालय यांना सबमिट करा.

70 व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी आणि इतर पदांची भरती (जाहिरात क्र. 17/2021)

यापूर्वी, NBCC ने विविध विभागांमध्ये व्यवस्थापन (Management) प्रशिक्षणार्थी आणि इतर पदांच्या एकूण 70 पदांच्या भरतीसाठी 24 नोव्हेंबर रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. या पदांची नियमित भरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवार कंपनीच्या वेबसाइटवरील करिअर विभागात दिलेल्या लिंकवरून अर्जाच्या पेजला भेट देऊ शकतात. उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की, ऑनलाइन अर्जादरम्यान त्यांना प्रकल्प व्यवस्थापक (Project Manager) पदासाठी 1000 रुपये आणि व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदासाठी 500 रुपये ऑनलाइन पद्धतीने भरावे लागतील. अर्ज करण्याची आणि फी भरण्याची अंतिम तारीख 8 जानेवारी 2022 निश्‍चित करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT