NCC_Exam 
एज्युकेशन जॉब्स

NCC 'सी' सर्टिफिकेट परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होणार

सकाळ वृत्तसेवा

NCC C Certificate exam: पुणे : राष्ट्रीय छात्र सेनेची (एनसीसी) ‘सी सर्टिफिकेट परीक्षा येत्या शनिवारी आणि रविवारी पुण्यात होणार आहे. पुण्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा होईल की नाही अशी चर्चा सुरू आहे, पण सर्व नियोजित परीक्षा ठरल्याप्रमाणे होणार आहेत, असे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. ही परीक्षा सोलापूर आणि पुणे येथील आर्मी, नेव्हल आणि एअरफोर्स विंगमधील एकूण एक हजार ५९७ कॅडेट्ससाठी घेण्यात येणार आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व खबरदारी घेत ही परीक्षा फर्ग्युसन महाविद्यालय, आबासाहेब गरवारे महाविद्यालय आणि गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स येथे सकाळी साडेआठ वाजता घेण्यात येणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षा शनिवारी (ता.३) आणि लेखी परीक्षा रविवारी (ता. ४) यापद्धतीने पुणे एनसीसी ग्रुप कमांडर ब्रिगेडिअर सुनील लिमये यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे, अशी माहिती कर्नल विनायक चव्हाण यांनी दिली आहे.

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT