CBSE 12th syllabus esakal
एज्युकेशन जॉब्स

NCERT चा मोठा निर्णय; बारावीच्या अभ्यासक्रमातून 'गुजरात दंगली'चा विषय हटवला

सकाळ डिजिटल टीम

तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं विधानही पाठ्यपुस्तकातून काढून टाकण्यात आलंय.

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं (National Council of Educational Research and Training, NCERT) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. या निर्णयानुसार, NCERT नं 12 वीच्या अभ्यासक्रमातून गुजरात दंगलीशी संबंधित मजकूर काढून टाकलाय. आत्तापर्यंत बारावीच्या राज्यशास्त्र विषयाच्या (Political Science Subject) पुस्तकात हे मजकूर पान क्र. १८७ ते १८९ वर होते. या संदर्भात एनसीईआरटीनं गुरुवारी एक नोटिसही जारी केलीय.

खरं तर, NCERT नं कोरोना (Coronavirus) महामारीच्या पार्श्वभूमीवर पाठ्यपुस्तक तर्कशुद्धीकरण योजनेअंतर्गत इयत्ता 12 वीच्या अभ्यासक्रमात सुधारणा करून हा निर्णय घेतलाय. या संदर्भात एनसीईआरटीनं गुरुवारी एक नोटीस जारी केलीय. त्यानुसार या वर्षाच्या सुरुवातीला CBSE च्या 2022-23 शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत काढून टाकलेली सामग्री आता अभ्यासक्रमात असणार नाहीय.

अभ्यासक्रमात नेमकं काय होतं?

इंडियन एक्स्प्रेसनं NCERT द्वारे 12 वीच्या राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमात केलेल्या सुधारणांबाबत एक अहवाल प्रकाशित केलाय. ज्याच्या अनुषंगानं गुजरात दंगलीच्या मजकुरावरून सरकारी यंत्रणाही जातीय भावनांबाबत संवेदनशील झाल्याचं दिसून येतंय. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं विधानही मजकुरातून काढून टाकण्यात आलंय. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना संदेश आहे की, त्यांनी 'राजधर्म' पाळावा. राज्यकर्त्यानं आपल्या प्रजेमध्ये जात, पंथ आणि धर्माच्या आधारावर भेदभाव करू नये, असं त्यांनी म्हटलं होतं.

'हा' मजकूर काढून टाकला

द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, NCERT नं 12 वीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकातून गुजरात दंगली, तसेच इतर विषय काढून टाकण्याचा निर्णय घेतलाय. ज्यामध्ये नक्षलवादी चळवळीचा इतिहास आणि आणीबाणीच्या काळातील वादग्रस्त विषयांचा समावेश करण्यात आला आहे. पुस्तकात पान क्रमांक १०५ मध्ये "नक्षलवादी चळवळीचा इतिहास" आणि पान क्रमांक ११३-११७ मध्ये "आपत्कालीन काळात वाद" समाविष्ट आहे. एनसीईआरटीनं आपल्या नोटिसीत म्हटलंय की, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांवरील विषयाचा भार कमी करणं अत्यावश्यक आहे. त्याच हेतूनं विषय काढून टाकण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Mohammad Shami ने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ठोकली दावेदारी; गोलंदाजीनंतर फलंदाजीतही दाखवली चमक

Goa Tourism : जाऊ फुलपाखरांच्या गावा! गोव्यात बटरफ्लाय कंझर्व्हेटरीला नक्की भेट द्या, फि,वेळ आणि ठिकाण जाणून घ्या सर्वकाही

Vinod Tawde : अजित पवारांना सोबत घेतल्याचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्टच सांगितले कारण...

Vinod Tawde: पुन्हा शरद पवार पावसात भिजले; भाजपचे तावडे म्हणाले, हा जिंकण्याचा 'भ्रम'...

SCROLL FOR NEXT