मेडीकल क्षेत्रात करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशपूर्व परीक्षा घेणाऱ्या National Testing Agency (NTA) ने नुकताच ‘यूजी-नीट’ परीक्षेचा निकाल जाहीर केला असून, त्यात मोठ्या प्रमाणावर घोळ झालेला आहे. या घोळाच्या विरोधात आता वैद्यकीय क्षेत्रातील संघटना आक्रमक पवित्र्यात आहे.
या प्रकारामुळे NEET परीक्षा हा विषय चर्चेत आला आहे. त्यानिमित्तानेच आपण हि परीक्षा का घेतली जाते(), या परीक्षेचा इतिहास काय आहे, त्याची सुरूवात कधीपासून झाली याबद्दल अनेक गोष्टींचा अभ्यास करणार आहोत.
NEET परीक्षा काय आहे?
NEET ही केंद्रीय स्तरावरील परीक्षा आहे. जी NTA (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) मार्फत घेतली जाते. वैद्यकीय विभागात करीअर करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा महत्त्वाची आहे. एखाद्या विद्यार्थ्याला एमबीबीएस (बॅचलर ऑफ मेडिसिन, बॅचलर ऑफ सर्जरी), बीडीएस (बॅचलर ऑफ डेंटल) इत्यादींमध्ये प्रवेश घ्यायचा असेल, तर तुमच्यासाठी NEET परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.
NEET परीक्षेची सुरूवात कशी झाली
राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा ही परीक्षा 2012 पासून प्रथमच घेण्याचा प्रस्ताव होता. विविध कारणांमुळे CBSE आणि मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने एक वर्ष पुढे ढकलले होते. देशात प्रथमच 5 मे 2013 रोजी वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी NEET परीक्षा घेण्यात आली. ही पहिली वैद्यकीय परीक्षा होती ज्यामध्ये 10 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) ही एक प्रकारची राष्ट्रीय स्तरीय परीक्षा आहे. ही परीक्षा भारतीय मेडिकल आणि डेंटल काॅलेजांमध्ये एमबीबीएस आणि बीडीएस कोर्स मध्ये प्रवेश घेण्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजेंसी (NTA) द्वारा आयोजित केली जाते.
या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना केंद्र सरकार संचालित वैद्यकीय संस्थांमध्ये प्रवेश दिला जात होता. परंतु पारदर्शकता यावी, वैद्यकीय शिक्षणातील उच्च दर्जा निश्चित करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना अनेक परीक्षांच्या ओझ्यातून वाचवण्यासाठी सरकारने देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी एकच परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला.
NEET चा लॉंगफॉर्म काय आहे?
नॅशनल एलिजिबिलिटी आणि इंट्रान्स टेस्ट National Eligibility Entrance Test असा NEET चा फुलफॉर्म आहे.
NEET परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना काय फायदा झाला?
NEET चा उद्देश विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुनिश्चित करणे हा होता. NEET ला हे देखील सुनिश्चित करायचे होते की, कोणत्याही वैद्यकीय संस्थेत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याकडे समान मूलभूत कौशल्ये असावीत हा मुख्य उद्देश यातून साध्य झाला आहे.
NEET सह, विद्यार्थी 8-9 परीक्षा देण्याऐवजी प्रत्यक्षात साहित्य शिकण्यावर लक्ष केंद्रित करू शकतात. NEET ही केंद्रीकृत परीक्षा असल्याने यामध्ये होणारी फसवणूक कमी झाल्याचे सांगितले जाते.
NEET ला ठरवलं बेकायदेशीर
2013 मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने NEET ला बेकायदेशीर आणि असंवैधानिक घोषित केले होते. 11 एप्रिल 2016 रोजी, पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने पूर्वीचा निकाल मागे घेतला. तसेच, केंद्र सरकार आणि भारतीय वैद्यकीय परिषदेने (MCI) NEET परीक्षेला परवानगी दिली. त्यानंतर 11 एप्रिल 2016 रोजी NEET परीक्षा पुन्हा सुरू करण्यात आली.
NEET परीक्षा 25 वर्षाहून अधिक विद्यार्थीही देऊ शकतात?
काही काळापूर्वी UGC ने घोषणा केली होती की आता 25 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या उमेदवारांना NEET परीक्षेत बसण्याची संधी मिळणार नाही. इतकेच नाही तर NEET परीक्षेत तीनदा बसलेल्या उमेदवारांनाही संधी मिळणार नाही.
UGC, CBSE, MCI आणि HRD मंत्रालयाच्या संयुक्त बैठकीत आता NEET परीक्षेत बसण्यासाठी किमान वय 17 वर्षे आणि कमाल वय 25 वर्षे असेल असा निर्णय घेतला होता.
आतापर्यंत या परीक्षेसाठी कमाल वयोमर्यादा नव्हती. आता सर्वोच्च न्यायालयाने 25 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या उमेदवारांना NEET परीक्षेला बसण्याची परवानगी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.