NEET Re-exam sakal
एज्युकेशन जॉब्स

NEET Re-exam : वाढीव गुणांवर फुली;‘नीट’ची २३ जूनला फेरपरीक्षा,३० पूर्वी निकाल

वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीच्या ‘राष्ट्रीय पात्रता-कम-प्रवेश’ (नीट) परीक्षेत काही विद्यार्थ्यांना दिलेले वाढीव गुण रद्द करण्यात आले असून, आता या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्यात येईल. तसा पर्याय त्यांना उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती केंद्र सरकारकडून गुरुवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये देण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीच्या ‘राष्ट्रीय पात्रता-कम-प्रवेश’ (नीट) परीक्षेत काही विद्यार्थ्यांना दिलेले वाढीव गुण रद्द करण्यात आले असून, आता या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्यात येईल. तसा पर्याय त्यांना उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती केंद्र सरकारकडून गुरुवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये देण्यात आली.

पुढे काय?

  • विद्यार्थ्यांसमोर फेरपरीक्षेचा पर्याय

  • समुपदेशनास ब्रेक नाही

  • मेरिट लिस्टमध्ये बदल होणार

  • ऑल इंडिया रँकमध्ये बदल होईल

केंद्राच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे मात्र समाधान होऊ शकलेले नाही. अनेक राज्यांत त्यांचे आंदोलन सुरूच आहे. संसदेच्या आगामी अधिवेशनात देखील विरोधकांकडून हा मुद्दा मांडला जाऊ शकतो. काँग्रेसने ‘नीट’ मधील कथित गैरव्यवहाराची ‘सीबीआय’च्या माध्यमातून चौकशी केली जावी अशी मागणी केली आहे. ‘नीट’ परीक्षेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असल्याचा दावा करत सर्वोच्च न्यायालयात असंख्य याचिका दाखल झाल्या आहेत. या याचिकांवर सुनावणी सुरू असताना आज केंद्राकडून उपरोक्त माहिती देण्यात आली. देशातील १ हजार ५६३ विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स (वाढीव गुण) देण्यात आले होते. या विद्यार्थ्यांची गुणपत्रिका रद्द करत त्यांना पुन्हा परीक्षा देण्याचा पर्याय देण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांची २३ जून रोजी फेरपरीक्षा घेतली जाईल तर ३० जूनपूर्वी त्याचा निकालही जाहीर होईल.

मेरिट लिस्ट बदलणार

पंधराशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची गुणपत्रिका रद्द करण्यात आल्यामुळे यंदाच्या ‘नीट-यूजी’ परीक्षेच्या मेरिट लिस्टमध्ये बदल होईल. याचा लाखो विद्यार्थ्यांच्या ऑल इंडिया रॅंकिंगवर परिणाम होणार आहे. १ हजार ५६३ पैकी जे विद्यार्थी फेरपरीक्षेत सामील होणार नाहीत त्यांना ग्रेस मार्क्सशिवायचे गुण दिले जातील. याचा अर्थ एखाद्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्ससहित ७१५ गुण मिळाले असतील आणि ग्रेस मार्क्सशिवाय ६४० गुण मिळालेले असतील तर ६४० गुण ग्राह्य धरले जाणार आहेत.

‘एनटीए’च्या निर्णयाला आक्षेप

‘नीट’ परीक्षा तसेच जुलै महिन्यात होणारे समुपदेशन रद्द करण्याची याचिकाकर्त्यांची विनंती अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. न्या. विक्रम सेठ आणि न्या. संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी ज्या तीन याचिकांवर सुनावणी झाली, त्यात ‘फिजिक्सवाला’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी अलख पांडे यांनी दाखल केलेल्या याचिकेचाही समावेश होता. ग्रेस मार्क देण्याचा ‘एनटीए’चा निर्णय मनमानीपणाचा असल्याचा आक्षेप पांडे यांनी याचिकेत घेतला होता. पंधराशे विद्यार्थ्यांना ७० ते ८० ग्रेस मार्क मिळाल्याची तक्रार वीस हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आपल्याकडे केली असल्याचे पांडे यांनी सांगितले होते.

‘नीट’ परीक्षेच्या पेपर फुटीच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसून यात अनियमितता आढळली तर दोषींविरोधात कठोर कारवाई केली जाईल. चोवीस लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी ‘नीट’ परीक्षेला बसले होते. ‘एनटीए’ ने नियमानुसार ही परीक्षा घेतली आहे. पंधराशे विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या वाढीव गुणांच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यासंदर्भात न्यायालयात सर्व उत्तरे देण्यास सरकार तयार आहे.

- धर्मेंद्र प्रधान, शिक्षणमंत्री

‘नीट’ परीक्षेसाठी २४ लाख विद्यार्थ्यांनी कष्ट घेतले होते. ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ (एनटीए)मधील काही अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या संगनमताने झालेल्या यासंबंधीच्या गैरव्यवहाराची सीबीआय किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील समितीने चौकशी करावी.

- गौरव गोगोई, काँग्रेसचे खासदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT