new names BBA BCA Course out of ambit of AICTE education  Sakal
एज्युकेशन जॉब्स

बीबीए, बीसीएचे नामकरण कुणाच्या पथ्यावर? विद्यापीठाच्या नव्या नावांमुळे अभ्यासक्रम ‘एआयसीटीई’च्या कक्षेबाहेर

अखेरिस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने निर्णय घेत या तिन्ही अभ्यासक्रमांचे नामकरण केले आहे.

सम्राट कदम

पुणे : वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील बीबीए, बीसीए (आयबी), बीबीए (सीए) या अभ्यासक्रमांचे नियमन अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडे (एआयसीटीई) सोपविण्यात आले आहे.

मात्र त्याच आशयाच्या अभ्यासक्रमांचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नामकरण करत पुन्हा एकदा अभ्यासक्रमांना विद्यापीठ अनुदान आयोगाची (यूजीसी) छत्रछाया प्राप्त करून दिली आहे. यामुळे हे नामकरण विद्यार्थ्यांच्या पथ्यावर पडणार का, हा मोठा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे.

व्यवस्थापन शास्त्र पदवी (बीबीए, बीएमएस), संगणक उपयोजन (बीसीए) हे अभ्यासक्रम एआयसीटीईने आपल्या अखत्यारित घेतल्यानंतर काही शिक्षण संस्थांनी नाराजी व्यक्त केली होती. यामुळे शैक्षणिक संस्था, विद्यार्थी, पालकांवर आर्थिक ताण येणार असल्याची भीती व्यक्त केली होती.

अखेरिस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने निर्णय घेत या तिन्ही अभ्यासक्रमांचे नामकरण केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना या नेहमीच्या अभ्यासक्रमांनादेखील वेगळ्या नावाने प्रवेश घेता येणार आहे. ‘एआयसीटीई’च्या अखत्यारितील अभ्यासक्रमांचा दर्जा आणि नियमन व्यावसायिक अभ्यासक्रमांप्रमाणे होणार, तर ‘यूजीसी’च्या अखत्यारितील या अभ्यासक्रमांचे नियमन पूर्वीप्रमाणेच असणार आहे.

‘सीईटी’ला प्रतिसाद कमी

‘एआयसीटीई’च्या नियमनात आलेल्या तिन्ही अभ्यासक्रमांसाठी यंदा प्रथमच सीईटी घेण्यात आली होती. एकूण एक लाख पाच हजार जागांसाठी फक्त ५५ हजार विद्यार्थ्यांनी सीईटीसाठी अर्ज केले होते. नव्या बदलांबद्दल जागृतीच्या अभावामुळे पहिल्याच सीईटीला अर्ज कमी आले. त्यामुळे बहुतेक विद्यार्थ्यांना विद्यापीठाने नामकरण केलेल्या अभ्यासक्रमांनाच प्रवेश घ्यावा लागेल, असे दिसते.

जुने नाव - नवीन नाव

१) बीबीए - बॅचलर ऑफ कॉमर्स बिझनेस मॅनेजमेंट- बीकॉम (बीएम.)

२) बीबीए (आयबी) - बॅचलर ऑफ कॉमर्स इन इंटरनॅशनल बिझनेस - बीकॉम (आयबी)

३) बीबीए (सीए) - बॅचलर ऑफ कॉमर्स इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स- बीकॉम (सीए)

निकष -एआयसीटीई -यूजीसी

प्रवेश- सीईटी परीक्षा अनिवार्य -सीईटीची गरज नाही

विद्यार्थ्यांची तुकडी-६० विद्यार्थी -८० विद्यार्थी

पायाभूत सुविधा-नियमांनुसार विस्तार होणार -नेहमीच्या सुविधा

शुल्काची रचना -निर्धारण समितीकडून- महाविद्यालयाकडून

शुल्क- वाढणार- तेवढेच राहील

शिष्यवृत्ती- तांत्रिक अभ्यासक्रमाला मिळणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी पात्र -नेहमीच्या

शिष्यवृत्ती

अभ्यासक्रम -एकसारखा- एकसारखा

नामकरणामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. परवडणारे शुल्क, तोच अभ्यासक्रम आणि पदव्युत्तर प्रवेशासाठी समान संधी असलेले हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या पथ्यावर पडणार आहेत. ‘एआयसीटीई’च्या निकषांची पूर्तता करणे छोट्या संस्थांना फार किचकट जात आहे.

- डॉ. गजानन एकबोटे, कार्याध्यक्ष, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी

व्यवस्थापनशास्त्रातील अभ्यासक्रम ‘एआयसीटीई’कडे असल्यास सुसूत्रता येईल. त्याचबरोबर अभ्यासक्रमाची गुणवत्ता आणि दर्जा वाढत विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिष्यवृत्तीची संधीही प्राप्त होईल. अभ्यासक्रम अधिक रोजगाराभिमुख होईल. नामकरणामुळे या सर्वांना मर्यादा येईल.

- प्रा. रामदास झोळ, अध्यक्ष, असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट ऑफ अनएडेड इन्स्टिट्यूट इन रुरल एरिया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Strike Rate: महायुतीचा जबरदस्त स्ट्राइक रेट! काय ठरले निर्णायक? विरोधकांचं झालं पानीपत

Latest Maharashtra News Updates : महायुतीचं निर्विवाद वर्चस्व! देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची शक्यता

IPL 2025 Mega Auction LIVE: आयपीएलचा मेगा लिलाव आज! ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, केएल राहुलसह मोठे स्टार आज रिंगणात!

Maharashtra Assembly Election Result: पुण्यातील 'या' मतदारसंघात अनेक वर्षांची परंपरा कायम; जनतेचा कौल नव्या आमदाराकडेच

Hemant Soren : झारखंडचा गड सोरेन यांनी राखला...इंडिया आघाडीला दोन तृतीयांश बहुमत; भाजपचा रथ रोखला

SCROLL FOR NEXT