School Uniform Sakal
एज्युकेशन जॉब्स

पायात नवे बूट अन् अंगात जुना ! गणवेश विद्यार्थ्यांना आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार?

शाळा सुरू होऊन एक महिना उलटून गेला, तरी गणवेशाचे कापड अजूनपर्यंत शाळांना मिळाले नाही, बूट मात्र मिळाले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

शाळा सुरू होऊन एक महिना उलटून गेला, तरी गणवेशाचे कापड अजूनपर्यंत शाळांना मिळाले नाही, बूट मात्र मिळाले आहेत. पायात नवीन बूट अन् अंगात मात्र जुनाच गणवेश, अशी अवस्था विद्यार्थ्यांची आहे. जुन्याच गणवेशावर विद्यार्थ्यांनी अजून किती दिवस शाळेत जायचे, असे प्रश्न पालकांकडून विचारले जात आहे.

समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, बूट व पुस्तके उपलब्ध करून दिली जातात. शाळा सुरू होण्याच्या १५ दिवस आगोदरच शाळेत पुस्तके दाखल झाली. या पुस्तकांचे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले.

बुटाचे पैसे शाळा समितीच्या खात्यात जमा केले, त्यातून बुटांची खरेदी झाली. मात्र, अजून गणवेशाचा पत्ता नाही. पूर्वी गणवेशाचे पैसे शाळा समितीच्या खात्यावर जमा केले जात होते. त्यातून शाळा गणवेशाचे कापड खरेदी करून गावातील एखाद्या टेलरकडून कपडे शिवून घेत होते. शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांना गणवेश मिळतील अशी तरतूद केली जात होती. यावर्षी शासनाने पहिल्यांदाच राज्यातील सर्वच शाळांना गणवेशाच्या कापडाचा पुरवठा करण्याचे कंत्राट एकाच व्यक्तीला दिले आहे.

सदर कंत्राटदाराकडून अद्यापपर्यंत शाळांना कापड उपलब्ध झालेले नाही. पालक, विद्यार्थी सतत मुख्याध्यापकांकडे गणवेशाबाबत विचारणा करीत आहेत. मात्र, गणवेश कधी मिळणार याचे उत्तर मुख्याध्यापकांकडे सुद्धा नाही. याबाबत शिक्षणाधिकारी यांना विचारले ते देखील निरुत्तर दिसून आले.

कुणाकडेच उत्तर मिळेना

शाळा सुरू होऊन एक महिना झाला आहे. तरी देखील गणवेशाचे कापड मिळालेले नाही. पुढील महिन्यात स्वातंत्र्य दिन आहे. आता गणवेशाचे कापड मिळाले तरी ते संबंधित महिला मंडळाकडे जाणार कधी, नंतर ते शिवणार कधी, असा प्रश्न आहे. कापड नेमके कधी उपलब्ध होणार याचे उत्तर शिक्षण विभाग आणि शिक्षणाधिकाऱ्यांकडे सुद्धा नाही. त्यामुळे यंदाचा स्वातंत्र्य दिन मुलांना जुन्याच गणवेशावर साजरा करावा लागणार का, असा सवाल पालकांकडून विचारला जात आहे.

स्वखर्चातून खरेदी

एक महिना झाला तरी मुलांना गणवेश मिळत नसल्याने मुलांचा हिरमोड होत आहे. त्यामुळे अनेक पालकांनी आता स्वखर्चातून मुलांना गणवेश घ्यायला सुरवात केली आहे.

पहिली ४७,३७८

दुसरी ५१,७०४

तिसरी ६१,९५५

चौथी ६९,२४७

पाचवी ६०,५६७

सहावी ६७,१२८

सातवी ६७,४३४

आठवी ६६,६३५

महिना झाला शाळा सुरू होऊन अजूनही मुलांना गणवेश मिळाले नाहीत. अजून किती दिवस वाट पाहायची? अनेक पालकांनी स्वखर्चाने आता गणवेश घ्यायला सुरवात केली आहे. येत्या स्वातंत्र्य दिनाला तरी गणवेश मिळतील का?

— रवींद्र पगारे, पालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT