NHAI Recruitment esakal
एज्युकेशन जॉब्स

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामध्ये उपव्यवस्थापक पदांची भरती !

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामध्ये उपव्यवस्थापक पदांची होणार भरती

श्रीनिवास दुध्याल

भारत सरकार, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयांतर्गत 29 एप्रिल 2021 रोजी उपव्यवस्थापक (तांत्रिक)च्या 41 जागांवर गेट 2021 स्कोअरद्वारे थेट भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

सोलापूर : nhai application 2021 : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) मध्ये सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अखत्यारीत भारत सरकारने 29 एप्रिल 2021 रोजी गेट 2021 स्कोअरद्वारे उपव्यवस्थापकच्या (डेप्युटी मॅनेजर) (nhai deputy manager vacancy) (टेक्‍निकल) पदांवर थेट भरतीसाठी अधिसूचना जारी केली होती. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आज (28 मे) संपणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांनी अद्याप अर्ज केलेले नाही ते प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाइट nhai.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. (nhai-application-2021-closing-tomorrow-for-41-deputy-manager-technical-posts-apply-online-at-nhai-gov-in)

असा करा अर्ज

एनएचएआय उपव्यवस्थापक भरतीकरिता (nhai deputy manager vacancy 2021) अर्ज करण्यासाठी उमेदवारांना प्राधिकरणाच्या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर व्हेकेन्सी सेक्‍शनडे जावे लागेल आणि संबंधित भरती जाहिरात (अनुक्रमांक 4) सह उपलब्ध करून दिलेल्या अर्जाच्या "अप्लाय नाऊ' लिंकवर क्‍लिक करून किंवा http://vacancy.nhai.org/vacancy/DMApplicationForm.aspx

या थेट लिंकद्वारे ऍप्लिकेशन पेजवर जाऊ शकता. पेजवरील आवश्‍यक तपशील भरून आणि इच्छित कागदपत्रांची स्कॅन प्रत अपलोड करून अर्ज सादर करू शकता. आज (28 मे) सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज सादर करता येईल, हे उमेदवारांनी लक्षात घ्यावे.

कोण अर्ज करू शकेल?

एनएचएआयच्या उपव्यवस्थापक भरती 2021 साठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी एखाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा उच्च शिक्षण संस्थेमधून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी उत्तीर्ण केलेली असावी. अंतिम वर्ष / सेमिस्टरचे विद्यार्थीदेखील अर्ज करू शकतात; परंतु या उमेदवारांना त्यांचे उत्तीर्ण प्रमाणपत्र 31 डिसेंबर 2021 पर्यंत सादर करावे लागेल. तसेच जाहिरात जाहीर होण्याच्या तारखेपासून उमेदवारांचे वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

निवड प्रक्रिया

एनएचएआय उपव्यवस्थापक भरती 2021 साठी गेट 2021 परीक्षेच्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. गेट स्कोअरच्या आधारे तयार केलेल्या गुणवत्ता यादीनुसार निवड प्रक्रियेच्या पुढील टप्प्यासाठी उमेदवारांना एनएचएआयकडून आमंत्रित केले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohammad Shami पुनरागमनाच्या सामन्यातच ठरला मॅचविनर! ७ विकेट्सह फलंदाजीतही पाडली छाप; पाहा Video

Winter Health Tips : हवामानातील बदलामुळे होणाऱ्या सर्दी-खोकल्याला वैतागला आहात, औषधांपेक्षा हे घरगुती उपाय ठरतील फायद्याचे

Healthy Food : मुलांसाठी पोषक आहेत हे लाडू, घरीच बनवा अन् नैसर्गिकरित्या मुलांची उंची वाढवा

Cherry Blossom Festival : चेरी ब्लॉसम फेस्टिव्हल पहायला जपान,चीनला कशाला जायचं? भारतात आहेत ही खास ठिकाणं

Latest Maharashtra News Updates live : नागपूरमध्ये शहा, खर्गे एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी

SCROLL FOR NEXT