DATA SCIENCE Sakal
एज्युकेशन जॉब्स

आता ‘नॉन-टेक्निकल’ विद्यार्थीही होऊ शकतात डेटा सायंटिस्ट!

केवळ आयटी प्रोफेशनल्सच नव्हे, तर इतर क्षेत्रांतील लोकही डेटा सायंटिस्ट म्हणून उत्तम करिअर घडवू शकतात.

सकाळ डिजिटल टीम

सध्या डेटा सायन्समधील करिअर हे जगभरातील आघाडीच्या बुमिंग करिअर ऑप्शन्सपैकी एक आहे. दिवसागणिक संकलित होणारा प्रचंड डेटा अभ्यासून त्यावरून कंपनी वाढीसाठी तसेच भविष्यातील संधींसाठी योग्य अनुमान काढण्यासाठी डेटा सायंटिस्टची (Data Scientist) गरज असते. ही एक सलग प्रक्रिया असली, तरी त्यात विविध क्षेत्रांतील लोकांची, त्यांच्या कौशल्यांची गरज असते. त्यामुळे केवळ आयटी प्रोफेशनल्सच नव्हे, तर इतर क्षेत्रांतील लोकही यात उत्तम करिअर घडवू शकतात. नॉन-टेक्निकल बॅकग्राऊंडमधून आलेल्या युवक-युवतींनाही थोडा अभ्यास करून या क्षेत्रात करिअर (Career) करता येणे सहज शक्य आहे. हा अभ्यास कशा प्रकारचा असावा, त्याची सुरुवात कुठून करावी याविषयी...(Now even non-technical students can become data scientists!)

  • नॉन टेक्निकल बॅकग्राऊंडमधून आलेल्या उमेदवारांनी अभ्यासाची सुरुवात एक्सेलपासून करावी. डेटा संकलन किंवा संकलित डेटाचे ॲनालिसीस या दोन्हींसाठी आधी डेटा सुयोग्य पद्धतीने संकलित केलेला असावा लागतो. यासाठी उमेदवारांना एक्सेलचे ज्ञान आवश्यक आहे.

  • एक्सेल नंतरचा टप्पा आहे, तो पॉवर बीआयचा ! पॉवर बीआय डेटा ॲनालिसीस आणि डिस्प्लेसाठी एक्सेलपेक्षा कैक पटींनी सरस आहे. या तंत्रातल्या मूलभूत संकल्पना समजून घेत पॉवर बीआय रिपोर्ट कसे तयार करावेत, इथपर्यंत शिकणे महत्त्वाचे आहे.

  • तिसऱ्या टप्प्यावर सर्वांत सोपी अशी ‘पायथन’ ही प्रोग्रॅमिंग लँग्वेज शिकून घ्यावी. ही लँग्वेज इतकी सोपी आहे की याआधी कोणत्याही प्रकारच्या कोडींगचा अनुभव नसलेले, कोणत्याही शाखेचे विद्यार्थी ही लँग्वेज पटकन शिकू शकतात. डेटा ॲनालिसीस दरम्यान कॉम्प्युटरला द्याव्या लागणाऱ्या सूचना-उपसूचना या लँग्वेजमधून द्याव्या लागतात. त्यामुळे पायथन शिकणे ही मूलभूत गरज आहे.

  • वरील टप्प्यांवरून उपलब्ध डेटाचे स्टॅटिस्टिकल ॲनालिसीस, पॅटर्न, ग्राफ अशा प्राथमिक टप्प्यांवरील ॲनालिसीस करता येते. यानंतर खोलवर ॲनालिसीस करण्यासाठी एसक्यूएल हे तंत्र शिकून घ्यावे. नव्याने पदार्पण करणाऱ्यांनी पोस्टग्रे एसक्यूएल आणि माय एसक्यूएल हे सॉफ्टवेअर शिकून घ्यावे.

  • डेटा सायन्समध्ये डेटा ॲनालिसीस करून निष्कर्ष काढण्याबरोबरच ती माहिती शेअर करणे, तसेच विविध गटांबरोबर काम करण्यालाही महत्त्व आहे. त्यासाठी माहिती शेअर करण्याचे तंत्रज्ञान; गीट, गीट हब व क्लाऊड कम्प्युटिंगमधील मायक्रोसॉफ्ट अझ्यूअर, ॲमेझॉन वेब सर्व्हिस आदींचे ज्ञान आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT