historical heritage sakal
एज्युकेशन जॉब्स

ऐतिहासिक वारसा संवर्धनातील संधी

भारतीय वारसा अभ्यास, भारतीय प्राच्यविद्या, भारतीय परंपरा-तत्त्वज्ञान, हस्तलिखिते, पुराभिलेख, नाणकशास्त्र यांबद्दल देश-विदेशांतील पर्यटकांमध्ये उत्सुकता वाढत आहे.

सकाळ वृत्तसेवा

- वर्षा कोटफोडे

देशात वेगाने वाढणारी संग्रहालयांची संख्या, पर्यटनाच्या दृष्टीने त्याचे वाढते महत्त्व, राष्ट्रीय आणि वैयक्तिक अशा स्वरूपाचा वारसा जतन करण्याबाबत वृद्धिंगत होत असलेली जागरूकता आदी बाबींचा विचार करता वारसा संवर्धन क्षेत्रात करिअर करण्याच्या चांगल्या संधी निर्माण होताना दिसत आहेत. गेल्या दोन दशकांमध्ये देशभरात ४०० हून अधिक नवीन संग्रहालये अस्तित्वात आली आहेत.

देशामधील एकूण संग्रहालयांची संख्या १२०० हून अधिक झाली आहे. तसेच, प्राचीन वारसा संवर्धन क्षेत्रात तब्बल ११०० कोटी रुपये इतकी गुंतवणूक करण्याचे सरकारने जाहीर केली आहे. यामध्ये प्राचीन स्मारके, पुरातत्त्वस्थळांचे उत्खनन, संरक्षण, जतन व संवर्धन, प्राचीन हस्तलिखिते, ग्रंथसंपदा, दुर्मीळ वस्तूंचे जतन आदींचा समावेश आहे.

विविध संधी

भारतीय वारसा अभ्यास, भारतीय प्राच्यविद्या, भारतीय परंपरा-तत्त्वज्ञान, हस्तलिखिते, पुराभिलेख, नाणकशास्त्र यांबद्दल देश-विदेशांतील पर्यटकांमध्ये उत्सुकता वाढत आहे. त्यामुळे या क्षेत्राचा विस्तार होत आहे, तर दुसरीकडे वारसा संवर्धन अर्थात ‘हेरिटेज कॉन्झरव्हेशन’ क्षेत्रात काम करण्यासाठी कुशल मनुष्यबळाची कमतरता, प्रशिक्षण सुविधांचा अभाव जाणवतो आहे.

पर्यटनाला चालना देण्यासाठी म्युझियम, आर्ट गॅलरी, लायब्ररी स्थापनेसाठी सरकार प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यात वारसा व संस्कृती प्रकल्पांच्या संवर्धनामध्ये वृद्धी होईल. या क्षेत्राशी संबंधित खासगी क्षेत्र, कॉर्पोरेट क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्र (सरकार) यांमध्येही इंटर्नशिप, करार किंवा कायमस्वरूपी नोकरी अशा प्रकारच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल असे दिसते.

पुरातत्त्वशास्त्रज्ञ, संवर्धनतज्ज्ञ, संशोधक-शास्त्रज्ञ, म्युझियम क्युरेटर, कलादालन साहाय्यक, प्रशिक्षित संरक्षक, अभिलेख शास्त्रज्ञ, संग्रह व्यवस्थापक यांसारखी कामे करण्यासाठी कुशल मनुष्यबळाची आवशयकता भासेल.

तसेच, सरकारी आणि खासगी संग्रहालये, ग्रंथालये, कलादालने, विद्यापीठे, धार्मिक संस्था, ऑक्शन हाऊसेस या ठिकाणी प्रशिक्षित संरक्षक, पुनर्संचयित करणारे व्यवस्थापक आणि संकलन व्यवस्थापक आदी संधीही या क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्यांसाठी उपलब्ध असतील. याचा अर्थ असा की, प्राचीन वारसा संवर्धन क्षेत्र अनेक नव्या संधी निर्माण करू शकेल.

प्रशिक्षण संस्था

या क्षेत्रासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण देशात बऱ्याच ठिकाणी दिले जाते. त्यात प्रामुख्याने उत्तर प्रदेशातील इंडिअन इन्स्टिट्यूट ऑफ हेरिटेज, नॅशनल म्युझियम इन्स्टिट्यूट, नॅशनल रिसर्च लॅबोरेटरी फॉर कॉन्झर्वेशन - लखनौ, आय.जी.एन.सी.ए. - दिल्ली, इनटॅक, एम. येस. युनिव्हर्सिटी ऑफ वडोदरा, अहमदाबाद विद्यापीठातील सेंटर फॉर हेरिटेज मॅनेजमेंट, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय - मुंबई यांचा टाटा ट्रस्ट-आर्ट कॉन्झर्वेशन इनिशिएटिव्ह, पुण्यातील डेक्कन कॉलेज अशा अनेक संस्थांचा समावेश आहे.

या वर्षीपासून केंद्र सरकारचे संस्कृती मंत्रालय आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र यांच्या सहकार्याने पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत प्रीव्हेंटिव्ह कॉन्झर्वेशन या विषयावर पदव्युत्तर पदविका हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.

एक वर्षाच्या या अभ्यासक्रमात प्राचीन वारसा संवर्धन व जतन हे शास्त्रीय व पारंपरिक पद्धतीने कसे करावे, याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाणार आहे. ५५% पेक्षा जास्त गुण असणाऱ्या कोणत्याही शाखेच्या पदवीधर विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल.

सरकारी दखल

केंद्र सरकारचे नॅशनल मॅन्युस्क्रिप्ट मिशन - २००३, नॅशनल मिशन फॉर मॉन्युमेंटस अँड अँटिक्युटीज – २००७, नॅशनल मिशन फॉर लायब्ररिज अँड अरकाईव्हज- २०२३ आणि जीएलएएम (गॅलरीज, लायब्ररिज, अरकाईव्हज, म्युझियम) विभाग २०२४ ची स्थापना इत्यादी या क्षेत्रातील पुढील संधीच्या नांदी आहेत.

२०२३ पासून केंद्र सरकारतर्फे केले जाणारे इंटरनॅशनल म्युझियम वीकचे आयोजन, तसेच युगे युगे भारत असे नॅशनल म्युझियमचे नामांकन करून त्या अंतर्गत नव्या आधुनिक पद्धतीने संग्रहालय उभारणीचे काम सुरू झाले आहे.

(लेखिका भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत संवर्धन विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

SCROLL FOR NEXT