पुणे- नामांकित प्रशिक्षण संस्था एसआयआयएलसी आणि दूध व्यवसायातील यांत्रिकीकरणात अग्रेसर जागतिक पातळीवरील कंपनी द-लवाल यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC) आणि ॲग्रिकल्चर स्किल काऊन्सिल ऑफ इंडिया (ASCI) मान्यताप्राप्त २०० तासांचा (सुमारे एक महिना) पूर्णवेळ शासकीय प्रमाणपत्र प्रशिक्षण कार्यक्रम २२ मार्चपासून पुण्यात सुरू होत आहे. याद्वारे कमर्शिअल डेअरी फार्म सुपरवायझर बनण्याची संधी तसेच प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना नोकरीसाठी सहाय्य केले जाणार आहे.या प्रशिक्षणात ४० टक्के क्लासरूम ट्रेनिंग तर ६० टक्के प्रात्यक्षिक थेट अद्ययावत डेअरी फार्मवर घेतले जाणार आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यातूनही प्रशिक्षणार्थी यात सहभागी होणार असून हे प्रशिक्षण मराठी तसेच हिंदी भाषेतून खास गव्हर्नमेंट सर्टिफाईड मास्टर ट्रेनरद्वारे दिले जाणार आहे.
प्रशिक्षणात काय शिकणारः
१) कमर्शिअल डेअरी फार्म व्यवस्थापनाचे मार्गदर्शन.
२) आधुनिक तंत्राने डेअरी फार्म बिझनेस यशस्वी करण्याचे कौशल्य.
३) स्वतःचा डेअरीफार्म योग्यरीत्या हाताळण्याचे कसब.
४) अद्ययावत डेअरी फार्मवर ६० टक्के प्रात्यक्षिक
५) नोकरी मिळविण्यासाठी सहकार्य.
पुणे शहरात लसीकरणाला वेग; ज्येष्ठ नागरिकांकडून चांगला प्रतिसाद
प्रशिक्षणाविषयी.....
प्रशिक्षणात शेतकरी, डेअरी फार्म व्यावसायिक, ॲग्री/डेअरी डिप्लोमाधारक, पदवीधारक सहभागी होऊ शकतात. प्रति व्यक्ती ३५ हजार रुपये (अनिवासी) तर ५० हजार रुपये (निवासी) शुल्क आहे. प्रशिक्षणाचे ठिकाण ः एसआयआयएलसी, सकाळनगर, बाणेर रोड, पुणे.
नावनोंदणीसाठी संपर्क ़ ७२१९६११३०६/७२१९६११३०७/ ९८८१०९९७५७
संकेतस्थळ ः www.siilc.edu.in
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.