National Defence Academy esakal
एज्युकेशन जॉब्स

NDA म्हणजे काय, भरतीसाठी योग्यता आणि निकष काय आहेत?

बाळकृष्ण मधाळे

National Defence Academy : जर तुम्हाला देशासाठी लढाऊ विमान उडवायचं असेल अथवा तुमचं स्वप्न असेल, की देशाच्या सैन्यात स्थान मिळवायचं आहे, तर तुम्हाला NDA कडून प्रशिक्षण घ्यावचं लागेल. तिथं तुम्ही अशा प्रकारे तयार व्हाल, की देशाच्या सुरक्षिततेसाठी तुम्हाला मरणाची कधीच भीती वाटणार नाही. आपण जर देशाच्या सैन्यात सामील होण्यास तयार असाल, तर NDA तुमच्या स्वप्नांची दरवाजे खुली करत आहे.

NDA ही एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. ज्याच्या अंतर्गत भारतीय आर्म फोर्सेससाठी ज्युनिअर ऑफिसला ट्रेनिंग दिली जाते.

NDA म्हणजे काय?

एनडीए म्हणजे (National Defence Academy) : NDA ही एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. ज्याच्या अंतर्गत भारतीय आर्म फोर्सेससाठी ज्युनिअर ऑफिसला ट्रेनिंग दिली जाते. NDA मध्ये विज्ञान, गणित, टेक्नॉलॉजी आणि कला अशा विविध विषयांवर आधारित परीक्षा घेतली जाते. एनडीएची परीक्षाही यूपीएससीच्या (UPSC) परीक्षेद्वारे घेण्यात येते, जी परीक्षा संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांकरिता आहे. एनडीएची परीक्षा ही वर्षातून दोन वेळा घेतली जाते. भारतीय भूदल, नौदल आणि वायुदल यांच्या पदांकरिता प्रशिक्षण हे एनडीएद्वारे दिले जाते. महाराष्ट्रात एनडीएचे प्रशिक्षण केंद्र पुण्याजवळील खडकवास (Pune Khadakwas) याठिकाणी आहे. खडकवास येथे एनडीएचे राष्ट्रीय संरक्षण अॅकॅडमी आहे, ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना तीन वर्षांसाठी प्रशिक्षण देऊन एक वर्षाचे ट्रेनिंग दिली जाते. NDA भारतीय सशस्त्र दलांसाठी म्हणजेच, भारतीय लष्कर (Army), नौदल (Navy) आणि हवाई दलासाठी (Air Force) विद्यार्थ्यांना शिक्षण देते. ही जगातील पहिली त्रिकोणी अकादमी आहे.

NDA मध्ये सामील होण्यासाठी एक परीक्षा द्यावी लागते, जी UPSC द्वारे वर्षातून दोनदा घेतली जाते आणि या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना सेवा निवड मंडळ Service Selection Board (SSB) द्वारे आयोजित मुलाखत द्यावी लागते. या दोन्हीमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना एनडीएमध्ये प्रवेश मिळतो व तिथे त्यांचे तीन वर्षे प्रशिक्षण होते. एनडीए हे कोणत्याही विद्यार्थ्यांसाठी भारतीय सुरक्षा संघात प्रवेश करण्यासाठी प्रवेशद्वार आहे. ही अकादमी फक्त पुरुषांसाठी आहे. लष्कर, नौदल किंवा हवाई दलात अधिकारी होऊ इच्छित असलेल्या कोणत्याही पुरुष विद्यार्थ्याला एनडीएकडूनच प्रशिक्षण घ्यावे लागेल. तर, इच्छुक उमेदवार http://www.upsconline.nic.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात.

यासाठी राष्ट्रीय स्तरावर वर्षातून दोनदा परीक्षा होतात, ज्याचे आयोजन संघ लोक सेवा आयोग (UPSC – Union Public Service Commission) करते. जेव्हा एखादा विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण होतो, तेव्हा त्याला मुलाखतीसाठी बोलावले जाते. ती मुलाखत उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी तीन वर्षे पुण्यात प्रशिक्षण घेतात. तीन वर्षांच्या प्रशिक्षणानंतर, विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीनुसार किंवा तीन वर्षांची कामगिरी पाहून लष्कर, नौदल आणि हवाई दलापैकी एकात संधी मिळते. त्यानंतर, जे विद्यार्थी लष्कर निवडतात, ते IMA देहरादूनला जातात, तर नौदलाचे विद्यार्थी Indian Naval Academy केरेला आणि हवाई दलाचे विद्यार्थी AFA हैदराबादला जातात. जिथं ते दुसऱ्या वर्षासाठी प्रशिक्षण घेतात. त्यानंतर एक वर्षानंतर ते भारतीय सैन्याचा एक भाग बनतात.

बारावीनंतर NDA परीक्षा देऊ शकता?

  • तुमच्याकडे बारावीत मुख्य विषय म्हणून भौतिकशास्त्र (Physics) आणि गणित (Mathematics) असावे.

  • ही चाचणी केवळ 16.5 ते 19 वयोगटातील अविवाहित पुरुषांसाठी आहे.

  • व्यक्ती भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.

  • एनडीएचा उमेदवार शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे.

  • हवाई दलासाठी डोळ्यांवर गॉगल नसावा. म्हणजेच, चष्मा लागलेला नसावा.

  • NDA साठी अर्ज करणाऱ्या परीक्षार्थीची लांबी ही 157.5 cm असली पाहिजे.

  • जो परीक्षार्थी एनडीएसाठी अर्ज करत आहे, त्याची छाती 81 cm असली पाहिजे.

  • एनडीएमध्ये 418 जागा आहेत, त्यापैकी 208 आर्मीसाठी, 42 नेव्ही, 120 एअर कोर्स आणि 50 नेव्हल अकादमीसाठी आहेत.

  • तुम्ही UPSC च्या वेबसाइटला भेट देऊन NDA अर्ज भरू शकता. तुम्हाला त्यामध्ये तुमचा स्कॅन केलेला फोटो आणि सही सबमिट करावी लागेल.

  • अर्ज करू इच्छिणारे उमेदवार भारत, नेपाळ किंवा भूतानचे नागरिक असणं आवश्यक आहे.

  • 1 जानेवारी 1962 पूर्वी भारतात आलेला एक तिबेटी शरणार्थी जर भारताचा अँग्रिक होऊ इच्छित असेल तर पात्र आहे.

  • भारतात स्थायिक होण्याच्या उद्देशाने बर्मा, श्रीलंका, पाकिस्तान आणि पूर्व आफ्रिकन देश केनिया, युगांडा, युनायटेड रिपब्लिक ऑफ टांझानिया, झांबिया, मलावी, झैरे आणि इथियोपिया किंवा व्हिएतनाममधून स्थलांतरित झालेली भारतीय वंशाची व्यक्ती देखील यासाठी पात्र आहेत.

कोरोना महामारीमुळे NDA परीक्षा 2021 मध्ये काही बदल करण्यात आले आहेत. वर्षाची पहिली परीक्षा जी एप्रिलमध्ये घेतली जाते, तर दुसऱ्या परीक्षेबरोबरच पहिली परीक्षाही घेतली जाऊ शकते. त्यामुळे ही परीक्षा आता सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला दृढनिश्चय आणि लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. कारण, हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, ज्यासाठी तुम्ही सक्षम असणं आवश्यक आहे.

NDA अंतर्गत असलेली पदं

  • कॅप्टन

  • लेफ्टनंट

  • मेजर

  • लेफ्टनंट कर्नल

  • मेजर जनरल

  • सीओएएस

  • एच.ए.जी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT