मुंबई : यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस २०२१ चा अंतिम निकाल येताच, अनेक उमेदवारांच्या मेहनतीच्या कथा समोर येऊ लागल्या आहेत. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही असे अनेक उमेदवार आहेत ज्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अनेक अडथळ्यांवर मात केली आहे.
६८५ यशस्वी उमेदवारांपैकी एक दिल्लीच्या रोहिणीमधील सम्यक एस जैन आहे, ज्याने अखिल भारतीय ७ वा क्रमांक मिळवला आहे. ज्यांना आपल्यातल्या कोणत्याही उणीवांची भीती वाटते त्यांच्यासाठी सम्यकचे यश खूप खास आहे. अंध असूनही सम्यकने इतकं मोठं यश मिळवून दाखवून दिलं आहे की, माणसाकडे जिद्द असेल तर काहीही अशक्य नाही.
सम्यकला त्याच्या इतक्या चांगल्या रँकची बातमी मिळाल्याने खूप आनंद झाला आहे. दिल्ली विद्यापीठाच्या SOL मधून इंग्रजी ऑनर्समध्ये पदवीधर असलेल्या सम्यकने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन (IIMC) मधून इंग्रजी पत्रकारितेचा अभ्यासक्रमही केला आहे. यासोबतच त्याने जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी (JNU) मधून इंटरनॅशनल रिलेशनमध्ये एमएची पदवीही मिळवली आहे.
याआधी सम्यक जैनने २०२०मध्ये पहिला प्रयत्न केला होता. पहिल्याच प्रयत्नात तो यशस्वी झाला नाही. तो UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला नाही. मात्र, सम्यकने हिंमत गमावली नाही. पुन्हा एकदा जोरदार तयारी करून त्याने २०२१ मध्ये यूपीएससीची परीक्षा दिली आणि यावेळी पूर्ण वर्चस्व गाजवले.
सम्यक आज खूश असेल पण या यशाचा प्रवास त्याच्यासाठी सोपा नव्हता. त्याने आपल्या मुलाखतीत प्रसारमाध्यमांना सांगितले की, "या खडतर प्रवासात त्याची आई आणि मित्राने त्याला साथ दिली. हे दोघे सम्यकचे डोळे आणि हात बनले. सम्यक हा PWD श्रेणीतील असून अंध आहे. त्याला परीक्षेत लिहिण्यासाठी लेखकाची गरज होती." अशा परिस्थितीत त्याची आई त्याच्या पूर्वपरीक्षेत लेखक बनली आणि त्याच्या मित्राने मुख्य परीक्षेत पेपर लिहिला.
सम्यक त्याच्या यशाचे श्रेय त्याच्या कुटुंबाला, विशेषतः त्याच्या आईला देतो. त्याच्या मते, त्याच्या आईने त्याला खूप साथ दिली आहे. त्याच्या मित्रांनीही त्याला खूप मदत केली. सम्यकला जेव्हा अभ्यासासाठी डिजिटल स्वरूपातील पुस्तकांची गरज होती तेव्हा त्याच्या मित्रांनीच त्याच्यासाठी अशा पुस्तकांची व्यवस्था केली. आज तो ज्या स्तरावर पोहोचला आहे, ते आई-वडील आणि मित्रांच्या पाठिंब्यामुळेच शक्य झाल्याचे तो सांगतो.
लॉकडाऊनचा फायदा
एकीकडे कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे बहुतांश लोकांना त्रास सहन करावा लागत असताना, सम्यक जैन यांना या लॉकडाऊनमुळे यूपीएससीच्या तयारीसाठी पूर्ण वेळ मिळाला. मार्च २०२० मध्ये त्याची तयारी सुरू झाली. या दरम्यान महाविद्यालये बंद होती आणि त्यामुळे ऑनलाइन क्लासेसमुळे सम्यकला यूपीएससीच्या तयारीसाठी दिवसाचे ७ ते ८ तास मिळत असत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.