UGC NET exam sakal
एज्युकेशन जॉब्स

Education : पीएच.डी. असल्यास सेट-नेटची गरज नाही; युजीसीकडून स्पष्टीकरण

तुमच्याकडे पीएच.डी. असेल तर सहाय्यक प्राध्यापक पदासाठी तुम्हाला सेट किंवा नेटची आवश्यकता नाही. विद्यापीठ अनुदान आयोगाने दिले स्पष्टीकरण.

सम्राट कदम

पुणे - तुमच्याकडे पीएच.डी. असेल तर सहाय्यक प्राध्यापक पदासाठी तुम्हाला सेट किंवा नेटची आवश्यकता नाही. विद्यापीठ अनुदान आयोगाने बुधवारी (ता.५) काढलेल्या नव्या आदेशासंबंधी आज पुन्हा स्पष्टीकरण दिले आहे.

ज्यात सहाय्यक प्राध्यापक पदासाठी एकतर तुम्ही सेट किंवा नेट पात्र असावेत, किंवा निदान पीएच.डी. धारक असणे गरजेचे असल्याचे, युजीसीचे अध्यक्ष प्रा. एम.जगदीश कुमार यांनी म्हटले आहे.

सहाय्यक प्राध्यापक पदासाठीच्या राज्य आणि केंद्रीय स्तरावरील पात्रता परीक्षांबरोबरच (सेट, नेट) पीएच.डी. असणे अनिवार्य करण्यात आले होते. आता हे सर्व निकष एकमेकांना पर्यायी गृहीत धरण्यात आले आहे. यासंबंधी युजीसीने ट्वीट करत अधिकचे स्पष्टीकरण दिले आहे.

प्रा. जगदीश कुमार म्हणतात, ‘पीएच.डी. धारक उमेदवाराला नेट किंवा सेट मधून सूट देण्यात आली आहे. ज्यामुळे ते थेट सहाय्यक प्राध्यापक पदाच्या भरतीसाठी पात्र ठरतील. सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्तीसाठी पीएचडीची पात्रता वैकल्पिक राहील. तसेच राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट), राज्य पात्रता परीक्षा (सेट) आणि राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (स्लेट) उत्तीर्ण उमेदवारांना भरती प्रक्रियेत सहभागी होता येईल.’

ज्यांच्याकडे पीएच.डी. पदवी नाही त्यांच्यासाठी सहाय्यक प्राध्यापकाच्या थेट भरतीसाठी नेट किंवा एसएलईटी किंवा सेट ही किमान अट आहे. परंतु यूजीसी नियमांनुसार प्रदान केलेल्या पीएच.डी.धारकांना यामधून सूट देण्यात आली असून, ते सहाय्यक प्राध्यापक पदाच्या भरतीसाठी पात्र आहे.

- युजीसीची नोटीस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या भावावर 10 लाखांचे बक्षिस; कोण आहे अनमोल बिश्नोई?

Diwali 2024: दिवाळीत घराची स्वच्छता करताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात, काम होईल सोपे

Nagpur East Assembly Election : भाजपच्या ‘कृष्णा’ला अजित पवार गटाच्या आभा यांचे आव्हान, आभा पांडेंकडून अर्ज दाखल

NCP Jalgaon Vidhansabha 2024 : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून देवकर, खोडपे, खडसेंना उमेदवारी!

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीला सुरुवात

SCROLL FOR NEXT