NEET UG 2022 Sakal
एज्युकेशन जॉब्स

Postpone NEET UG 2022 : परीक्षा पुढे ढकलणार? सोशल मीडियावर विद्यार्थ्यांचे अजब तर्क

गेल्या आठवड्यातच NEET UG 2022 परीक्षा आयोजित करण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Postpone NEET UG 2022 : काही दिवसांपूर्वीपर्यंत NEET UG 2022 च्या तारखा जाहीर न झाल्यामुळे आणि त्यात होणारा विलंब यामुळे नाराज झालेल्या विद्यार्थ्यांकडून (Student) आता NEET UG परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने गेल्या आठवड्यातच NEET UG 2022 परीक्षा आयोजित करण्याची तारीख जाहीर केली आहे. त्यानुसार परीक्षा 17 जुलै रोजी होणार आहे आणि अर्ज नोंदणी प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे. दरम्यान, परिक्षा पुढे ढकलण्याला पाठिंबा एकत्रित करण्यासाठी change.org द्वारे केलेल्या याचिकेत सामील होण्यास सांगण्यात आले आहे. यामध्ये या परीक्षा ऑगस्ट 2020 पर्यंत स्थगित करण्याची मागणी करण्यात आली आहे. (Postpone Neet UG 2022 Trends On Social Media)

मात्र, परीक्षेच्या जाहीर झालेल्या तारखेबाबत अनेक उमेदवारांनी आक्षेप व्यक्त केले आहेत. परीक्षेची अधिसूचना जाहीर होणे आणि परीक्षेची तारीख यात अवघ्या दोन महिन्यांचे अंतर असल्याचे मत अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे. तसेच अनेकांनी सोशल मीडियावर (Social Media) नाराजी व्यक्त केली असून, परीक्षा जाहीर केल्यानंतरचा दोन महिन्यांचा वेळ परिक्षेच्या तयारीसाठी खूप कमी असल्याचे विद्यार्थ्यांचे मत आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांकडून अधिकाऱ्यांकडे NEET UG 2022 पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येत आहेत. (NEET UG Exam 2022 News In Marathi)

इतकेच नाही तर, अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या युक्तिवादाचे समर्थन करण्यासाठी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, NTA ने आधीच अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा जेईई मेन पुढे ढकलली आहे. तसेच, अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना जेईई मेनसाठी दोन संधी आहेत. दुसरीकडे NTA NEET विद्यार्थ्यांना फक्त एकच संधी दिली जात आहे आणि त्यासाठीही फक्त दोन महिन्यांचा वेळ दिला जात आहे. तसेच यादरम्यान CBSE परीक्षा, CUET आणि JEE या महत्त्वाच्या परीक्षाही होणार आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत, NEET UG साठी चांगली तयारी करणे कठीण आहे. त्यामुळे वैद्यकीय प्रवेश परीक्षेत बसण्याची एकच संधी असल्याने NEET UG 2022 ची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी असून, ही परीक्षा ऑगस्ट 2022 पर्यंत पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT