Increase your vocabulary sakal
एज्युकेशन जॉब्स

वाढवा तुमचा शब्दसंग्रह!

जिम रॉन यांचं एक वाक्य असे आहे की, ‘उत्तम शब्दसंग्रहामुळे तुम्ही स्वत-ला अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकता.

सकाळ वृत्तसेवा

- प्रांजल गुंदेशा, संस्थापक, द इंटेलिजन्स प्लस

दोस्तांनो, अशी कल्पना करा की, तुमच्या आईने काही तास राबून एखादा छान पदार्थ केला आणि तुम्हाला खायला दिला. आता तुम्ही तो पदार्थ खाल्‍ल्यावर ‘खूप छान’ असं म्हणू शकता किंवा ‘खूपच स्वादिष्ट झाला आहे. तोंडाला पाणी सुटलं आणि बोटं चाटत-चाटतच संपवला’, असेही म्हणू शकता. या दोन्ही उत्तरांपैकी आईला अधिक आनंद कशाने होईल? तर, अर्थातच दुसऱ्या उत्तराने! कारण, त्यात तुमच्या भावना अधिक तंतोततपणे उतरल्या आहेत. मात्र, यासाठी आवश्‍यक असतो तो शब्दसंग्रह.

जिम रॉन यांचं एक वाक्य असे आहे की, ‘उत्तम शब्दसंग्रहामुळे तुम्ही स्वत-ला अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकता. मर्यादित शब्दसंग्रहामुळे तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि तुमचे भविष्य दोन्हीही मर्यादित होते.’ शब्दसंग्रहाकडे एक उत्तम ‘पॉवरहाऊस टूलकिट’ म्हणून पाहा. त्याचा उत्तम प्रकारे वापर केला, तर तुम्ही तुमच्या भावना, विचार, कल्पना अधिक अचूकपणे व्यक्त करू शकाल. शब्दसंग्रहामुळे प्रभावी संवाद होण्यास मदत होते.

व्यावसायिक जीवनात शब्दसंग्रहाचा खूप उपयोग होतो. अहवाललेखन करण्यासाठी, उत्पादनाची माहिती देण्यासाठी, संकल्पनांची मांडणी करण्यासाठी किंवा अगदी टीममध्ये चर्चा करण्यासाठीही उत्तम शब्दसंग्रह असल्यास तुमची वेगळी छाप पडते. शब्दसंग्रहामुळे लेखन, अनुवाद, रेडिओ जॉकी, जनसंपर्क, निवेदन, शिक्षक असे करिअरचे अनेक पर्याय खुले होतात. विद्यार्थ्यांनादेखील निबंधलेखनासाठी किंवा नवीन गोष्ट मांडण्यासाठी शब्दसंग्रहाचा फायदा होतोच.

इतकंच नाही, शब्दसाठा चांगला असेल, तर तुम्ही आत्मविश्‍वासाने सामाजिक क्षेत्रांत वावरू शकता. व्यासपीठावर बोलताना, नोकरीसाठी मुलाखत देताना किंवा अगदी साध्या घरगुती गप्पा मारतानाही तुम्ही अधिक प्रभावीपणे बोलू लागता.

शब्दसंग्रह वाढवण्याच्या काही सोप्या टिप्स -

  • स्क्रॅबलसारखे खेळ खेळा - ‘स्क्रॅबल’सारखे शब्द तयार करणारे किंवा स्पेलिंग पक्के करणारे विविध खेळ मित्रांसोबत किंवा भावंडांसोबत खेळा.

  • शब्दकोडे, ॲप - फावल्या वेळात शब्दकोडे सोडवा. शब्दसंग्रह वाढवणारे विविध ॲप वापरा. त्यामुळे शब्दसाठा निश्‍चित वाढेल.

  • रोजचा एक शब्द - रोज एक नवीन शब्द शिका. नवे शब्द वहीत लिहून ठेवा किंवा त्यांचा तक्ता तयार करा.

  • कथालेखन - नवीन शब्दांचा वापर करून छोट्या गोष्टी लिहिण्याचा किंवा एखाद्या विषयावर उतारा लिहिण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे शब्दसंग्रह वाढेल आणि कल्पकतेलाही चालना मिळेल.

  • शब्दबांधणीचा खेळ - समोरच्याने एक शब्द उच्चारल्यावर आपण त्याच विषयाशी जुळणारा दुसरा शब्द उच्चारायचा हा खेळ खेळून पाहा. त्यामुळे तुम्हाला शब्दयोजना करणे जमू लागते.

  • वाचन - वाचनामुळे नवीन शब्द आणि त्यांचा वापर कळतो.

  • शब्दकोश - शब्दकोश समानार्थी शब्द आणि अचूक उच्चार कळण्यासाठी उपयुक्त ठरतो.

  • संकल्पनांवर आधारित शब्दसंग्रह - तंत्रज्ञान, निसर्ग, भावभावना अशी एखादी संकल्पना घेऊन तिच्याशी संबंधित अधिकाधिक वाचन करा. त्यामुळे तुमचा शब्दसाठा वाढेल.

  • ऑडिओ बुक, पॉडकास्ट, व्हिडिओ - ऐकण्यामुळे शब्दांचे अचूक उच्चार कळतात. तसेच, नवनवीन म्हणी, वाक्प्रचारदेखील व त्यांचा वापर कळतो.

कोणाशीही संवाद साधायचा असेल, तर त्यासाठी शब्द लागतात. तुमच्याकडे प्रभावी शब्द असतील, तर तुम्ही अनेक गोष्टी सहजपणे करू शकता. शब्दसंग्रह करण्याची सुरुवात एका शब्दापासून होते. मात्र, त्याचा दीर्घकालीन परिणाम संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. शब्दसंग्रह आणि त्याचा नावीन्यपूर्ण वापर यांबाबत अधिक जाणून घेण्यासाठी ‘द इंटेलिजन्स प्लस’च्या यू-ट्यूब चॅनलवरील व्हिडिओ अवश्‍य पाहा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT