चॅटजीपीटी किंवा जनरेटीव्ह एआय किंवा ओपन एआय हे शब्द तुम्ही गेल्या महिनाभरातच ऐकले असतील. चॅटजीपीटी हे एक असं टूल आहे, की लाँच झाल्यावर पाच दिवसांतच लाखो युजरनी वापरून पाहिलं आहे.
- प्रशांत लिखिते
आपल्या पुराणातील भस्मासुराची कथा तुम्हाला माहीत असेलच. भस्मासुर हा महान शंकरभक्त होता. आपल्या तपश्चर्येनं त्यानं शंकराला प्रसन्न केलं आणि शंकरानं वर दिला, की तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील त्याचं भस्म होईल.
मग काय, भस्मासुर निघाला, अनिर्बंध, निरंकुश. जो भेटेल त्याच्या डोक्यावर हात ठेवत, त्यानं तीनही लोकांत हाहाकार माजण्यास सुरवात केली. भस्मासुराशी लढाई म्हणजे मृत्यू असा समीकरण झालं आणि एक दिवस भस्मासुरानं भगवान शंकराच्या शिरावर हात ठेवण्याचा प्रयत्न केला.
आता तुम्ही म्हणाल, भस्मासुराचा आणि मदत मागताक्षणी स्वतःची कल्पनाशक्ती वापरून हवी ती मदत देण्यासाठी धावून येणाऱ्या सच्च्या मित्रासारखा चॅटजीपीटीचा काय संबंध? चला पाहू या.
चॅटजीपीटी किंवा जनरेटीव्ह एआय किंवा ओपन एआय हे शब्द तुम्ही गेल्या महिनाभरातच ऐकले असतील. चॅटजीपीटी हे एक असं टूल आहे, की लाँच झाल्यावर पाच दिवसांतच लाखो युजरनी वापरून पाहिलं आहे.
चॅटजीपीटी ही एक जादूची कांडी आहे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून केलेलं हे सर्वात प्रगत रूप आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता ही भविष्यातील टेक्नॉलॉजी असं आपण म्हणत होतो; पण बघताबघता ती आपल्या हातातही आलेली आहे. ‘चॅटजीपीटी’ या ‘व्हर्चुअल रोबो’ किंवा ‘चॅटबॉट’ची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स - ‘एआय’) क्षेत्रातील ही प्रणाली बाजारात येऊन दोन महिनेही उलटले नाहीत, तोवर तिला ‘गुगल किलर’ असं संबोधलं जाऊ लागले आहे. तिच्या आगमनानं गुगलच्या शेअर्सच्या किंमतींवर यापूर्वीच परिणाम होऊ लागला आहे. भविष्यात मानवी जगतात आमूलाग्र आणि तुफान बदल घडवण्याची क्षमता तिच्यात आहे, असं मानलं जात आहे.
शाळा-कॉलेजात असताना माहितीसाठी त्या-त्या विषयांतले तज्ज्ञ, पुस्तके-विश्वकोश-ग्रंथालयांवर अवलंबून होतो. नंतर ती जागा गुगलनं घेतली. गुगल म्हणजे आपल्या स्मरणशक्तीचं ‘एक्स्टेंन्शन’च बनलं होतं.
त्यामुळे पूर्वी ज्या गोष्टी हमखास लक्षात असायच्या त्या साध्या-साध्या गोष्टी आता लक्षात ठेवल्या नाहीत तरी चालू शकेल. गरज भासेल तेव्हा गुगल ती माहिती क्षणार्धात सादर करत होतं.
मात्र गुगलची मर्यादा अशा होती, की ते केवळ उपलब्ध साठ्यातील माहिती काढून देऊ शकते. त्याच्याजवळ असलेल्या माहितीवर प्रक्रिया करून ती वेगवेगळ्या स्वरूपांत सादर करू शकत नाही.
म्हणजे, गुगलला निबंध लिही किंवा कविता कर, असं सांगितलं तर ते करू शकत नाही. त्यासाठी संगणकाकडे किंवा यंत्रमानवाकडे कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स - ‘एआय’) असणं गरजेचं होते.
नेमकं हेच काम ‘ओपनएआय’ या कंपनीनं ‘चॅटजीपीटी’च्या माध्यमातून केलं आहे. त्याला २०२१ सालापर्यंतचा डेटा फीड करण्यात आला आहे. त्या आधारावर ‘चॅटजीपीटी’ अनेक कामं करू शकतं.
(लेखक हे आयटी क्षेत्रात २५ वर्षे कार्यरत आहेत. हा लेख त्यांनी त्यांच्या वैयक्तिक मतानुसार लिहिला आहे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.