scholarship sakal
एज्युकेशन जॉब्स

परदेशी शिकताना : इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना

महाराष्ट्रातील अनेक तरुण शिष्यवृत्तीच्या जोरावर पदवीपर्यंत शिक्षण घेतात. याच शिष्यवृत्तीच्या जोरावर परदेशातही शिक्षण घेऊन भरारी घेता येईल, याची अनेकांना कल्पनाही नसते.

सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्रातील अनेक तरुण शिष्यवृत्तीच्या जोरावर पदवीपर्यंत शिक्षण घेतात. याच शिष्यवृत्तीच्या जोरावर परदेशातही शिक्षण घेऊन भरारी घेता येईल, याची अनेकांना कल्पनाही नसते.

- ॲड. प्रवीण निकम

महाराष्ट्रातील अनेक तरुण शिष्यवृत्तीच्या जोरावर पदवीपर्यंत शिक्षण घेतात. याच शिष्यवृत्तीच्या जोरावर परदेशातही शिक्षण घेऊन भरारी घेता येईल, याची अनेकांना कल्पनाही नसते. परदेशी शिक्षणाचा सर्व खर्च पेलवत नसल्यामुळे त्यांना शिक्षणासाठी परदेशात जाता येत नाही. आपण आज विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असणाऱ्या परदेशी शिक्षणाबाबतच्या शिष्यवृत्ती संदर्भात जाणून घेऊयात.

शिष्यवृत्ती कोणाला लागू होते?

  • विद्यार्थी हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असावा.

  • महाराष्ट्रातील विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर पदवी आणि पीएचडीसाठी.

  • प्रवेश घेऊ इच्छित असणारे विद्यापीठ THE (Times Higher Education) किंवा QS (Quacquarelli Symonds) या पद्धतीच्या मानांकांमध्ये २०० नंबरच्या आत असावे.

योजनेचा उद्देश

विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना राबवण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाने २१ ऑगस्ट २०१८ रोजी घेतला होता.

अर्ज कसा करावा?

  • या संदर्भात विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गासाठी असणाऱ्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या संकेतस्थळावर जाहिरात उपलब्ध होते.

  • विद्यार्थ्याने जाहिरातीसोबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या विहित नमुन्यातील अर्ज विभागाच्या पुढील अधिकृत संकेतस्थळावरून डाऊनलोड करावा.

  • www.maharashtra.gov.in

  • https://mahaeschol.maharashtra.gov.in

  • https://sjsa.maharashtra.gov.in

  • प्रत्येक वर्षी जून महिन्यामध्ये या शिष्यवृत्ती अंतर्गत अर्ज मागविण्यात येतात.

कोणकोणत्या क्षेत्रासाठी लागू?

  • कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापन, विधी, अभियांत्रिकी/वास्तूकला शास्त्र आणि औषधनिर्माण शास्त्र.

  • शिष्यवृत्ती देण्याच्या एकूण जागांमध्ये ३० टक्के महिलांसाठी राखीव आहेत.

  • पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अर्ज करताना पदव्युत्तरसाठी किंवा पीएचडी अभ्यासक्रमासाठी अर्ज करताना, यापूर्वी इतर कोणत्याही राज्य शासनाची अथवा केंद्रशासनाची परदेशी शिष्यवृत्ती घेतलेली नसावी. अन्य प्रशासकीय विभागाच्या परदेशी शिष्यवृत्तीच्या योजनेसाठी अर्ज केलेला नसावा.

वयोमर्यादा

  • जाहिरात प्रसिद्ध झालेल्या महिन्याच्या पहिल्या तारखेस उमेदवारांचे वय ३५ वर्षापेक्षा जास्त नसावे. पीएचडीसाठी ४० वर्षे कमाल वयोमर्यादा आहे.

शिष्यवृत्तीसाठी अटी

  • विद्यार्थ्यांच्या पालकांचे/कुटुंबाचे व विद्यार्थी नोकरी करीत असल्यास एकूण स्वत:चे उत्पन्न धरून सर्व मार्गांनी मिळणारे मागील आर्थिक वर्षातील उत्पन्न रुपये ८ लाखापेक्षा जास्त नसावे.

  • विद्यार्थी किंवा पालक किंवा दोन्ही नोकरीत असल्यास आयकर विवरणपत्र, फॉर्म नं १६ व सक्षम प्राधिकारी यांच्याकडील मागील आर्थिक वर्षाचे कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणाऱ्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र.

  • भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किमान ६० टक्के गुणासंह पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. पीएचडीसाठी किमान ६० टक्के गुणासह पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका परीक्षा उत्तीर्ण असावी.

  • या योजनेचा लाभ एकाच कुटुंबातील एका विद्यार्थ्यास फक्त एकदाच घेता येतो.

  • शिक्षणासाठी आवश्यक असलेला कालावधी किंवा त्यापूर्वीचा कालावधीपर्यंतच परदेशात राहण्याचे हमीपत्र राज्य शासन व परदेशातील भारतीय दूतावासास लिहून द्यावे लागते.

  • परदेशी शैक्षणिक संस्थांकडून अनकंडिशनल ऑफर लेटर मिळालेले असेल, त्यांनाच ही शिष्यवृत्ती अनुज्ञेय आहे.

(लेखक हे ‘समता सेंटर’ या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुती शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विलास तरे 46,178 मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT