बोर्डाच्या परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना त्यांची शैक्षणिक प्रगती समजावी, बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी त्यांची पूर्ण तयारी व्हावी, या हेतूने मुख्याध्यापक संघातर्फे ही परीक्षा घेतली जाणार आहे. 1 ते 10 फेब्रुवारी या काळात ही परीक्षा होईल.
सोलापूर : बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जाताना दहावी-बारावीतील विद्यार्थ्यांना स्वत:च्या गुणवत्तेचा तथा शैक्षणिक प्रगतीचा अंदाज यावा आणि परिपूर्णरित्या बोर्डाची परीक्षा देता यावी, या हेतूने दरवर्षी मुख्याध्यापक संघाच्या माध्यमातून दरवर्षी सराव व पूर्व परीक्षा घेतली जाते. मात्र, यंदा कोरोनामुळे (Corona) शाळा-कॉलेज (School-college) उशिराने सुरु झाले आणि बहुतेक शाळांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही. त्यामुळे यावर्षी केवळ दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची पूर्व परीक्षाच (Pre examination) घेतली जाणार आहे. 1 ते 10 फेब्रुवारी या काळात त्याचे नियोजन करण्यात आले आहे.
शहर-जिल्ह्यातील जवळपास 675 शाळा आणि 125 ज्युनिअर कॉलेज मुख्याध्यापक संघाचे सभासद आहेत. पाचवी ते बारावीपर्यंतच्या जवळपास साडेतीन लाख विद्यार्थ्यांची दरवर्षी चाचणी परीक्षा (Test examination) आणि सराव व पूर्व परीक्षा (Practice and pre-exam) मुख्याध्यापक संघाच्या माध्यमातून घेतल्या जातात. प्रत्येक विषयातील तज्ज्ञांची विषय संघटना स्थापन करून जवळपास 100 शिक्षकांच्या माध्यमातून दर्जेदार प्रश्नपत्रिका (Question paper) काढल्या जातात. त्याचा आजवर विद्यार्थ्यांना विशेषत: दहावी-बारावीतील विद्यार्थ्यांना मोठा फायदा झाला आहे. त्यातून संबंधित शाळांना स्वत:च्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या दृष्टीने तयारी करणेही सोयीस्कर झाले आहे. दरम्यान, कोरोनामुळे सोलापूर (Solapur) जिल्ह्यासह राज्यभरातील शाळा 4 ऑक्टोबरपासून ऑफलाइन (Offline) सुरु झाल्या. तत्पूर्वी, ऑनलाइन शिक्षण सुरु होते, परंतु त्यात सर्वांनाच सहभागी होता आले नाही. त्यामुळे बहुतेक शाळांनी शिकवून पूर्ण झालेल्या अभ्यासक्रमाचा पुन्हा सराव घेतला. तर काही शाळांनी त्यांचा अपूर्ण राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे नियोजन केले. त्यामुळे मुख्याध्यापक संघाच्या परीक्षांचे नियोजन पुढे गेले. 1 जानेवारीपासून सुरु होणारी सराव परीक्षा झाली नाही. आता 1 फेब्रुवारीपासून दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची पूर्व परीक्षा तर पाचवी ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची द्वितीय चाचणी परीक्षा घेतली जाणार आहे.
द्वितीय चाचणी, पूर्व परीक्षांचे वेळापत्रक
- पाचवी ते नववी- 1 ते 4 फेब्रुवारी
- अकरावी- 1 ते 6 फेब्रुवारी
- दहावी- 1 ते 9 फेब्रुवारी
- बारावी- 1 ते 6 फेब्रुवारी
मुख्याध्यापक संघातर्फे जिल्ह्यातील पाचवी ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची द्वितीय घटक चाचणी आणि दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची पूर्व परीक्षा 1 फेब्रुवारीपासून घेण्याचे नियोजन केले आहे. दहावीची बोर्डाची परीक्षा 15 मार्च तर बारावीची 4 मार्चपासून सुरु होणार आहे. तत्पूर्वी, विद्यार्थ्यांची पूर्व परीक्षा घेऊन त्यांचा निकाल जाहीर केला जाईल.
- तानाजी माने, अध्यक्ष, जिल्हा मुख्याध्यापक संघ, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.