PUNE SAKAL
एज्युकेशन जॉब्स

'फॅशन अँड एपॅरल डिझाईन' क्षेत्रातील आश्वासक संधी

सकाळ वृत्तसेवा

डॉक्टर विश्वनाथ कऱ्हाड एमआयटी विश्वशांती विद्यालय कोथरूड, पुणे, सादर करीत आहोत, चार वर्षीय बॅचलर ऑफ डिझाईन (B.Des) डिग्री कोर्स

वस्त्र आणि वस्त्रोद्योगाची गाथा ही भारतीय स्वातंत्र्याची निगडित आहे. एक कापूस उत्पादक देश ज्याने सिंथेटिक (कृत्रिम) धागे आणि संबंधित उत्पादन प्रक्रिया आत्मसात केल्या, स्थानिक गरजा आणि विणकाम; हस्त कौशल्याच्या समृद्ध परंपरेची वीण घातली, केवळ आर्थिक गरज म्हणून नव्हे तर भारतातील एक सांस्कृतिक परंपरा असा या क्षेत्राला न्याय दिला. ही नीतिमत्ता आपल्या संस्कृतीत खोलवर रुजलेली आहे.

हस्तशिल्प हा सर्वात विकेंद्रीत तळागाळातील राष्ट्रनिर्माण उद्योग आहे. भारतीय हस्तकलेचा वाटा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये दर वर्षी 20 टक्के या दराने वाढत आहे. वर्ष 2021 ते 2025 या काळात जागतिक हस्तकला उद्योगाचा वाढीचा दर हा 14% असण्याचं भाकीत आहे. सन 2025 अंती हस्तकला उद्योगा संबंधित मालाची मागणी ही 515 मिलियन अमेरिकन डॉलर्स च्या आसपास पोहोचणे अपेक्षित आहे.

अमेरिका जो भारतीय हस्तकला उद्योग संबंधित वस्तूंचा सर्वात मोठा आयातदार देश आहे, त्यांची एकट्याची एकट्या गृह सजावट क्षेत्राशी निगडीत वस्तूंची मागणी साल २०२७ अंती 150 मिलियन अमेरिकन डॉलर्स (निर्यात महसुलाच्या 35%) इतकी इतकी अपेक्षित आहे.

अनेक अनैसर्गिक /कृत्रिम सामग्री द्वारे तयार केल्या जाणाऱ्या उत्पादनांचा समावेश देखील फॅशन अँड एपॅरल डिझाईन उद्योग जगतात मध्ये होतो. म्हणूनच फॅशन अँड एपॅरल डिझाईन उद्योग क्षेत्राचा आवाका हा हस्तशिल्प व्यतिरिक्त अनेक मोठ्या प्रमाणावर निर्मित होणाऱ्या वस्त्रप्रावरणे आणि वस्तूं पर्यंत पसरला आहे. सन २०२० मध्ये जागतिक फॅशन अँड एपॅरल उद्योग जवळपास ५२७.१ अब्ज डॉलरच्या मुल्यावर पोहोचला असून, सन २०१५ पासून यामध्ये -०.६% च्या चक्रवाढ वार्षिक गतीने घसरण नोंदवली गेली आहे. या अपरोक्ष, सन २०२० पासून परिस्थितीची वाटचाल आश्वासक मूळ पदाकडे होऊन ९.८% वाढ अपेक्षित आहे. ही वाढ, या उद्योगाचा आवाका सन २०२५ पर्यंत ८४२.५ अब्ज डॉलर मुल्य आणि सन २०३० पर्यंत ११३८.८ अब्ज डॉलर मुल्यापर्यंत पोहोचेल. भारतीय हस्तकला उद्योगाची निर्यात ही सातत्याने चढ्या दराने वाढते आहे आणि सरकारी यंत्रणेच्या आर्थिक मदतीच्या जोरावर ती वाढतच जाणार आहे.

जरी भारतीय हस्तकलेचे उत्पादन प्रकार जवळपास 35 हजार असले तरी त्यातील महत्त्वपूर्ण भाग हा 'फॅशन अँड एपॅरल' डिझाइन संबंधित उत्पादनांशी निगडित आहे. यामध्ये शिलाई नक्षीकाम, दागिने, हाताने छाप काम केलेली वस्त्रे इत्यादींचा समावेश होतो. तरीसुद्धा मनुष्य व प्रशिक्षण क्षेत्रात अत्यल्प वाढ झाल्यामुळे टिकवणे अवघड आहे. फॅशन अँड एपॅरल डिझाईन क्षेत्रासंबंधी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या ची संख्या दरवर्षी साधारण 20000 (वीस हजार) च्या आसपास असते, त्याउलट असे शिक्षण देणाऱ्या सरकारी आणि खाजगी शिक्षण संस्थांमध्ये उपलब्ध असलेल्या शिक्षण संधी या साधारणतः 3000 (तीन हजारच) आहेत. यामुळेच भारतात मोठ्या प्रमाणावर असणारी फॅशन अँड एपॅरल डिझाईन संबंधित क्षेत्रातील शिक्षणाची मागणी अपूर्णच राहते आहे. संबंधित क्षेत्राशी निगडित कच्चामाल (नैसर्गिक आणि कृत्रिम) पैदा करणाऱ्या ठिकाणांच्या आसपास ही मागणी ठळकपणे जाणवणारा आहे.

फॅशन अँड एपॅरल डिझाईन संबंधित शिक्षण हे भारतामध्ये काही ठराविक ठिकाणीच उपलब्ध आहे जसं की एन आय एफ टी NIFT / एन आय डी.NID यांच्याकडील शैक्षणिक अभ्यासक्रम बॅचलर ऑफ डिझाईन, बॅचलर ऑफ ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, फॅशन कम्युनिकेशन फॅशन डिझाईन, लाइफस्टाइल अंड ॲक्सेसरीज डिझाईन टेक्स्टाईल डिझाईन अशा पद्धतीचे आहेत. कुशल मनुष्यबळाची मागणी विचारात घेता संबंधित शिक्षणामध्ये खाजगी शैक्षणिक संस्थांचे प्रमाण महाराष्ट्रात नगण्य आहे. परिणामी फॅशन अँड एपॅरल डिझाईन क्षेत्रातील व्यावसायिकांची वाढती आणि प्रक्षेपित मागणी पूर्ण करण्यासाठी , या क्षेत्राशी संबंधित इच्छुक विद्यार्थ्यांना 'बॅचलर पास डिझाईन इन फॅशन डिझाईन' अभ्यासक्रमाद्वारे अधिक संधी प्राप्त करून देणे योग्य ठरेल. संबंधित क्षेत्रातील तंत्रकुशल मनुष्यबळाची गरज भागविण्याकरिता, आणि भौगोलिक तथा सांस्कृतिक दृष्ट्या अनुकूल परिस्थितीत असलेल्या डॉक्टर विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी कोथरूड पुणे, शैक्षणिक वर्ष 2021 22 पासून बॅचलर ऑफ डिझाईन प्रोग्रॅम इन फॅशन अँड डिझाईन सुरू करीत आहे.

विश्वशांती आणि सौहार्द ची भूमिका घेतलेल्या वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी च्या तत्वांना अनुसरून हा शैक्षणिक कार्यक्रम वस्त्रप्रावरणे यांचे डिझाईन आणि निर्मिती यांची सांगड घालणारा आहे. या कार्यक्रमाच्या अभ्यासक्रम वर्षांमध्ये विद्यार्थ्यांना औद्योगिक/व्यावसायिक प्रवृत्ती देखील शिकवल्या जातात जेणेकरून हे विद्यार्थी भविष्यात खरे नेते म्हणून सन्मानित होतील. फॅशन उद्योग जगतात ओळखल्या जाणाऱ्या पर्यावरणीय आणि सामाजिक परिणामांचा संग टिकवण्याच्या हेतूने या अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना पर्यावरण वादाचे, दीर्घकाळ पर्यंतच्या उपयोगितेचे, फॅशन मधील मंद गतीने घडून आणता येणार्या बदलाचे शिक्षण दिले जाते. टिकाऊपणा चे हे परिमाण अर्थपूर्ण आणि चिरस्थायी प्रभाव निर्माण करण्यासाठी तयार केलेल्या या अभ्यासक्रमाद्वारे हाताळले जातात.

या अभ्यासक्रमाद्वारे पदवीधर होणाऱ्या विद्यार्थ्यांकडे अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध असणार आहेत. संधींच्या, या न संपणाऱ्या यादी पैकी काही निवडक संधी मी इथे नमूद करू इच्छितो. फॅशन/ एपॅरल डिझाईनर, टेक्‍स्टाईल डिझाइनर, फॅशन डाटा ॲनालिस्ट, एपॅरल प्रॉडक्शन मॅनेजर, कॉलिटी मॅनेजर, वेअर हाऊस मॅनेजर, गारमेंट मर्चंटायझर, संपलींग रूम कॉर्डिनेटर, फीट ऍनालिस्ट, प्रॉडक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर शॉप फ्लोर मॅनेजर.एमआयटी वर्ल्ड पीस विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर कार्यक्रमांसाठी प्रवेश खुले आहेत.

अर्ज करण्यासाठी येथे संपर्क साधा : WhatsApp : +91 9881492848 Phone : +91 20 – 7117 7137 or +91 20 – 7117 7142 किंवा ह्या संकेतस्थळावर भेट द्या: admissions.mitwpu.edu.in/bdes/

सुमन देवदुला

प्रमुख, स्कूल ऑफ डिझाइन

एमआयटी-डब्ल्यूपीयू, कोथरूड पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: ‘महाराष्ट्र नायक’ फडणवीसांनाच मुख्यमंत्री करा, भाजपची जोरदार Lobbying

Utpanna Ekadashi 2024: 26 कि 27 नोव्हेंबर कधी साजरी केली जाणार उत्पन्न एकादशी? जाणून घ्या काय करावे अन् काय नाही

Beed Voter Assembly Polls : तीन हजार मतदारांची एकाही उमेदवाराला पसंती नाही

IND vs AUS 1st Test: नाद खुळा... जसप्रीत बुमराहच्या नेतृत्त्वाखाली भारताने इतिहास रचला, ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला

Latest Maharashtra News Updates : उद्धव ठाकरे आमदारांकडून घेणार प्रतिज्ञापत्र; पुन्हा पक्ष फुटीची भीती

SCROLL FOR NEXT