पुण्यात मेट्रो रेल्वे सुरू होणार असून तेथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी अधिसूचना काढण्यात आली असून पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने २१ मार्चपर्यंत अर्ज करायचा आहे. या भरती मोहिमेद्वारे एकूण ४० पदे भरली जाणार आहेत. (महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड भर्ती २०२२). त्याअंतर्गत मुख्य प्रकल्प अभियंता, महाव्यवस्थापक, सहमहाव्यवस्थापक, अतिरिक्त महाव्यवस्थापक, अग्निशमन अधिकारी आदी पदे भरण्यात येणार आहेत. ही पदे पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी आहेत. विविध पदांसाठी वयोमर्यादा वेगवेगळी असून ३० ते ५५ वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात.(Pune Metro Job Updates)
- मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, अतिरिक्त मुख्य महाव्यवस्थापक, वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक, सहमहाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक या पदांच्या उमेदवारांचे B.E. / B. Tech. पर्यंत शिक्षण होणे आवश्यक आहे. तसेच पदांनुसार योग्य अनुभव असणे आवश्यक आहे.
- महाव्यवस्थापक, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक या पदाच्या उमेदवारांनी CA / ICWA. पर्यंत शिक्षण आवश्यक आहे. तसेच पदांनुसार अनुभव असणे आवश्यक आहे.
- अग्निशमन अधिकारी - उमेदवारांनी Diploma in Fire चे शिक्षण घेतले असणे गरजेचे आहे. त्याचा योग्य अनुभव असणे आवश्यक आहे.
अशी होईल निवड - या पदांसाठी उमेदवारांची वैयक्तिक मुलाखत घेतली जाणार आहे. तसेच कागदपत्र तपासणी आणि वैद्यकीय तपासणीनंतर निवड करायची का ते ठरवले जाणार आहे. वैद्यकीय तपासणीचे तपशील अधिकृत वेबसाइटवर पाहू शकता.
मिळेल आकर्षक पगार - या पदांसाठी 400 रुपये अर्ज शुल्क घेण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च आहे. नोकरीसाठी तुमची निवड झाली तर तुम्हाला दर महिन्याला 2 लाख 80 हजार रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. हे वेतन मुख्य प्रकल्प व्यवस्थापक पदासाठी आहे. याशिवाय इतर पदांसाठी चांगला पगार देण्यात येणार आहे.
असा करा अर्ज - महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या या पदांवर नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी www.punemetrorail.org या महामेट्रोच्या वेबसाईटवर जावून अर्ज करता येईल. अन्य कुठल्याही मार्गाने अर्ज स्विकारला जाणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.