Railway Jobs 2021 : भारतीय रेल्वेमध्ये नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी ही महत्वाची बातमी! कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये सध्या रिक्त जागा शिल्लक असून त्या लवकरच भरण्यात येणार आहेत. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडला जम्मू-काश्मीरमध्ये चालवल्या जाणाऱ्या USBRL प्रकल्पासाठी तांत्रिक सहाय्यकाची गरज आहे. यासाठी कोकण रेल्वेने अधिसूचना जारी केलीय. दरम्यान, तांत्रिक सहाय्यक पदावरील भरतीसाठी कोणतीही परीक्षा होणार नसल्याचेही अधिसूचनेत स्पष्ट केलेय. या नोकरीशी संबंधित आवश्यक माहिती कोकण रेल्वेच्या वेबसाइटवरही konkanrailway.com उपलब्ध करण्यात आलीय.
भारतीय रेल्वेमध्ये नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी ही महत्वाची बातमी आहे.
अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक नागरी पदासाठी सात रिक्त जागा, तर कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक सिव्हिल पदासाठी देखील सात रिक्त जागा आहेत. या दोन पदांच्या रिक्त जागेत पाच जागा ओबीसी आणि दोन एसटी प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, यात सामान्य श्रेणीसाठी कोणतीही जागा रिक्त ठेवण्यात आलेली नाही.
वयोमर्यादा
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदासाठी कमाल वय 30 वर्षे असावे, तर कनिष्ठ तांत्रिक सहाय्यकासाठी कमाल वय 25 वर्षे असायला हवे. या दोन्ही पदांसाठी उमेदवारांचे वय 1 सप्टेंबर 2021 पासून मोजले जाणार आहे.
वेतन
निवड झालेल्या उमेदवारांना वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (नागरी) पदांवर दरमहा 35,000 दिले जातील, तर दुसरीकडे कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक (नागरी) पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 30 हजार रुपये मिळणार आहेत.
भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ आणि कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक - BE/B.Tech सिव्हिल पदवी व किमान 60% गुणांसह उत्तीर्ण असणेही आवश्यक आहे.
वॉक इन इंटरव्ह्यू कधी होईल?
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक - 20 ते 22 सप्टेंबर, सकाळी 9:30 ते दुपारी 1.30 पर्यंत
कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक - 3 ते 25 सप्टेंबर, सकाळी 9:30 ते दुपारी 1.30 पर्यंत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.