Aluminum Die Casting sakal
एज्युकेशन जॉब्स

विशेष : ॲल्युमिनियम डाय कास्टिंगमधील संधी

सकाळ वृत्तसेवा

- राजेश अग्रवाल

ॲल्युमिनियम हा धातू वजनाने हलका आहे. कास्ट आयर्नच्या केवळ एकतृतीयांश वजन अल्युमिनियमचे असते. त्यामुळे या धातूपासून बनविलेली उत्पादने वजनाने अत्यंत हलकी असतात. त्यामुळे त्यावर आधारित पुढील खर्चदेखील कमी येतात. वजन कमी असणे हा अनेक उत्पादनांसाठी सकारात्मक मानले जाते.

या धातूच्या अनेक गुणवैशिष्ट्यांमुळे टेंसाईल स्ट्रेंथ, स्टॅबिलिटी, रिजिडिटी, ईलॉंगेशन स्ट्रेंग्थ यांमुळे हा धातू कास्टिंगच्या माध्यमातून उत्पादने करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. भारतात आणि जगभरात ॲल्युमिनियमची उपलब्धता विपुल आहे. त्यामुळे ॲल्युमिनियम धातूचे महत्त्व कास्टिंग उत्पादनांत जास्त आहे.

करिअरच्या संधी

मेकॅनिकल शाखेतून डिप्लोमा अथवा डिग्री (बीई /बीटेक ) झाल्यानंतर कास्टिंग क्षेत्रात व्यापक संधी आहेत. त्यातही सध्या ॲल्युमिनियम डाय कास्टिंग या सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात कुशल अभियंत्यांची गरज आहे. प्रॉडक्ट डिझाईन, टूल डिझाईन, टूल मॅन्युफॅक्चरिंग आणि (डाय कास्टिंगद्वारे) वस्तू उत्पादन यामध्ये मोठ्या प्रमाणात गरज आहे.

क्वालिटी कंट्रोल म्हणजेच गुणवत्तापूर्ण वस्तू उत्पादन हे क्षेत्र अनेकांना खुणावते आहे. कास्टिंगसाठी लागणारी डाय आणि त्यासंदर्भातील मशिन्स यांचे मेंटेनन्स हे देखील महत्त्वाचे काम आहे. नवनवीन प्रॉडक्ट्सच्या संकल्पना आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट हे तर आव्हानात्मक काम अनेकांना करिअर संधी देऊ शकते. यांत सर्वांत महत्त्वाचे समजले जाते ते म्हणजे डाय डिझाईनचे काम.

प्रॉडक्ट डिझाईन हे सध्याच्या अनेक तरुणांचे आवडीचे क्षेत्र आहे. मेकॅनिकल क्षेत्रात दाखल झाला असाल, तर यातील डाय डिझाईनसाठीचे तंत्र आपण हस्तगत केल्यास आता थेट प्रॉडक्ट डिझाईनमध्ये जाणे अगदी सोपे होईल. अल्युमिनियम डाय कास्टिंगमध्ये सध्या आणि आगामी काळात करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत, हे नक्की.

उत्पादने कुठे वापरली जातात?

सध्या बहुतांशी ठिकाणी ॲल्युमिनियमची कास्टिंग केलेली उत्पादने वापरली जातात. ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठ्या प्रमाणात ॲल्युमिनियम कास्टिंग्स वापरले जाते. चासी, गिअर केसिंग, इंजिन केसिंग, ब्रॅकेट्स, क्लच प्लेट्स आदी असंख्य पार्टस सध्या ॲल्युमिनियमचे असतात, जे कास्टिंग पद्धतीने बनविले असतात. ऐरोस्पेस इंडस्ट्रीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ॲल्युमिनियम असतेच असते.

बांधकाम क्षेत्र आणि फर्निचरसाठी हल्ली ॲल्युमिनियम महत्त्वाचे मानले जाते. खुर्च्या, किचन, इंटेरिअरमध्ये तर ॲल्युमिनियमचाच बोलबाला आहे. टीव्ही, लॅपटॉपसह अनेक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने, घरातील इलेक्ट्रिकलच्या वस्तू, खेळणी, पॅकेजिंग सिस्टिम्स, शेती क्षेत्रातील पंप, वॉल्व्हज अशा अनेक ठिकाणी ॲल्युमिनियम वापरले जाते. यातील बहुतांशी ॲल्युमिनियम प्रॉडक्ट्स कास्टिंगच्या माध्यमातून तयार होतात.

डिझाईनमध्ये करिअरच्या संधी

मेकॅनिकल अभियांत्रिकीमधील ॲल्युमिनियम डाय कास्टिंग हे अत्यंत व्यापक क्षेत्र आहे. त्यातील डिझाईनचे काम अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. ज्या अभियंत्यांना या क्षेत्रात करिअर करायचे आहे, त्यांना फक्त जाणीवपूर्वक निर्णय घ्यायचा आहे. कारण संधी खूप आहेत आणि स्पर्धा कमी आहे. कंपन्यांना कौशल्य असलेले मनुष्यबळ हवे आहे. एकदा कौशल्य हस्तगत केल्यावर प्रगती आणि यश साध्य होणार आहे.

ज्यांना CAD / CAM/ CAE ही संगणक प्रणाली वापरता येते किंवा त्याविषयी तोंडओळख आहे, त्याचबरोबर मटेरिअल सायन्स, मेटॅलर्जी, थर्मोडायन्यामिक्स, हिट ट्रान्स्फर, फ्लुइड मेकॅनिक्स आदी विषयांचा अभ्यास आहे त्यांना काही महत्त्वाच्या प्रशिक्षणानंतर अल्युमिनियम डाय कास्टिंग डिझाईन या क्षेत्रात पारंगत होता येईल.

अशा प्रशिक्षणानंतर हे अभियंते राष्ट्रीय तसेच ग्लोबल संधींसाठी पात्र ठरतील. प्रॉडक्ट डिझाईनसारख्या अत्यंत महत्त्वाच्या कामाची जबाबदारी त्यांना मिळू शकते. त्यांना डाय डिझाईनची जबाबदारी फाउंड्री, टूल रूमपासून डायची निर्मिती, ‘ओईएम’मधील डिझाईनसाठीच्या मोठ्या कामाची संधी प्राप्त होऊ शकते. अर्थातच, फाऊंड्रीपासून आंतरराष्ट्रीय महत्त्व असणाऱ्या कंपन्या, त्याचबरोबर टाटा, बजाज, महिंद्रा, हिरोपासून जनरल मोटर्स, मर्सिडिजपर्यंतच्या कंपन्यांमधील दर्जेदार संधी मिळू शकतात.

भारतातील संधी

भारतामध्ये ५ हजारपेक्षा जास्त फाउंड्री आहेत. त्यापैकी ८५ टक्क्यांपेक्षा जास्त छोट्या फाउंड्री आहेत. (वार्षिक १०० कोटींपेक्षा कमी उलाढाल), १० टक्के मध्यम स्वरूपाच्या आहेत (१०० कोटी ते ५०० कोटींची वार्षिक उलाढाल), आणि ५ टक्के मोठ्या फाउंड्री आहेत (५०० कोटींपेक्षा जास्त वार्षिक उलाढाल). विशेष म्हणजे, ॲल्युमिनियम धातूचा वापर सर्व क्षेत्रांमध्ये वाढला आहे.

ऑटोमोटिव्ह क्षेत्रांत हा वापर जसा वाढत आहे, तसाच नॉन ऑटोमोटिव्ह क्षेत्रांत देखील ॲल्युमिनियमचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे. पर्यायाने ॲल्युमिनियमच्या उत्पादनाची आणि त्यासाठीच्या डाय कास्टिंग डिझाईनसंदर्भात काम करणाऱ्यांची गरज वाढत आहे. दरवर्षी सुमारे १० टक्के या दराने या कार्यक्षेत्राची वाढ आहे, असे म्हणावे लागेल.

या कार्यक्षेत्राला आजमितीस अनेक मेकॅनिकल अभियंते ज्यांचे डाय कास्टिंग डिझाईनमधील प्रशिक्षण झाले आहे, त्यांची मोठी गरज आहे. मेकॅनिकल झालेल्या अभियंत्यांना या कार्यक्षेत्रात आयटी किंवा सॉफ्टवेअर क्षेत्राप्रमाणेच जीवनशैली, कार्यप्रणाली, पगार, वर्क कल्चर यांचा लाभ मिळत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Fire: मुंबईतील इंडस्ट्रियल इस्टेट परिसर स्फोटांच्या आवाजाने हादरला, आगीचा भयानक व्हिडिओ व्हायरल

Amravati Stone Pelting: अमरावतीत भयंकर प्रकार! पोलीस स्टेशनवरच हजारो लोकांकडून दगडफेक, 21 पोलीस जखमी

Latest Maharashtra News Updates: आमदार सतेज पाटील यांनी धरला ठेका

Monsoon : महाराष्ट्रातून मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू

Today Navratri Colour: नवरात्रीचा चौथा रंग केशरी, 'या' मराठी अभिनेत्रींच्या लूकवरून घ्या आउटफिट आयडिया, दिसाल सुंदर

SCROLL FOR NEXT