Mindset sakal
एज्युकेशन जॉब्स

मॅनेजमेंट स्किलिंग : व्यावसायिक मानसिकता

बहुसंख्य मराठी जनता सात दशकांपूर्वी नोकरी करण्यात गुंग होती अन् त्यामुळे इंग्रज गेल्यावरही अमहाराष्ट्रीय लोकांनी महाराष्ट्रात व्यवसाय थाटले आणि मराठी लोक त्यांच्याकडे नोकरी करू लागले.

राजेश मंडलिक rmandlik87@gmail.com

बहुसंख्य मराठी जनता सात दशकांपूर्वी नोकरी करण्यात गुंग होती अन् त्यामुळे इंग्रज गेल्यावरही अमहाराष्ट्रीय लोकांनी महाराष्ट्रात व्यवसाय थाटले आणि मराठी लोक त्यांच्याकडे नोकरी करू लागले.

बहुसंख्य मराठी जनता सात दशकांपूर्वी नोकरी करण्यात गुंग होती अन् त्यामुळे इंग्रज गेल्यावरही अमहाराष्ट्रीय लोकांनी महाराष्ट्रात व्यवसाय थाटले आणि मराठी लोक त्यांच्याकडे नोकरी करू लागले. काळ बदलला आणि व्यवसायाचं वारं मराठी लोकांच्या मनात वाहू लागलं. परंतु पिंड नोकरीचा अन् व्यवसाय खुणावतो हे द्वंद्व मराठी माणसाच्या मनात सुरू झालं. काही लोकांनी धाडस करत व्यवसायात आलेही मात्र आयुष्य सरली तरी चुकलं कुठं हे अनेक वर्षे काही लोकांना कळलंच नाही. आणि कसं कळणार. त्यांच्या वयाची पहिली सात वर्षे त्यांनी घरातल्या मोठ्या माणसांना सरकारी खाते, बँक किंवा खासगी क्षेत्रात नोकरी करतानाच बघितलं होतं. त्यामुळे मेंदूत नोकरीचा प्रोग्रॅम घट्ट बसला होता. अमहाराष्ट्रीय लोकांची तिसरी, चौथी पिढी जेव्हा व्यवसायात स्थिरावत होती, तेव्हा मराठी लोक व्यवसायाची बाराखडी शिकत होते. अर्थात काही मराठी लोकांनी मात्र व्यावसायिक म्हणून अटकेपार झेंडे रोवले.

एक व्यावसायिक म्हणून प्रस्थापित व्हायचं असेल तर काय मानसिकता हवी हे थोडं स्वानुभव आणि काही परिचित उद्योजकांचे विचार सांगतो.

  • व्यवसाय म्हणजे काहीतरी भपकेदार प्रकरण आहे असं काहीही नसतं. ‘नोकरीत काही दम नाही’ किंवा ‘दुसऱ्यांची काय भांडी घासायची’ असल्या काहीतरी टाळ्याखाऊ वाक्यावर फिदा होऊन व्यवसाय सुरू करण्यात काही मतलब नाही. लौकिकार्थाने बहुतेक यशस्वी व्यवसाय हे नावीन्यपूर्ण कल्पनेवर सुरू झाले आहेत. यातील मेख अशी आहे की फक्त कल्पना ही नावीन्यपूर्ण असून चालत नाही, तर त्यानंतर व्यवसाय उभा करताना काम करण्याची पद्धती यात नावीन्यता, सातत्याने सुधारणा, व्यवसायाप्रती कमालीची निष्ठा आणि वचनबद्धता आणि सगळ्यात मुख्य म्हणजे वृद्धिधिष्ठित मानसिकता या सगळ्यांचा मिलाफ व्हावा लागतो. आणि हा एक प्रवास आहे. सातत्याने अशा पद्धतीचे मूळ सिद्धांत अंगात बाणवत वर्षानुवर्षे व्यावसायिक प्रवास केला जातो, तेव्हा कुठे देशावर आणि जगावर सकारात्मक परिणाम करणारे व्यवसाय उभे राहतात.

  • व्यवसायात यशस्वी व्हाल असे कोणतेही प्रस्थापित सूत्र, नियम नाहीत. बरं एका यशस्वी व्यवसायाचा फॉर्म्युला दुसऱ्याला लागू होईल याची सुद्धा खात्री नाही. परंतु, मार्गदर्शक तत्त्वे नक्की आहेत. त्यांचं अनुसरण केलं तर टिकून राहण्याची शक्यता तयार होते. खात्री नाहीच.

  • माणूस हा आयुष्यभराचा विद्यार्थी असतो हा शाळेत वाचलेल्या सुविचाराचा अंगीकार व्यावसायिक म्हणून पदोपदी करावा लागतो. ‘अनलर्निंग’ हा यशस्वी उद्योगाचा गाभा आहे.

  • योग्य निर्णय घेण्याची सवय लागावी लागते. पण गंमत अशी आहे की ती लागण्याआधी खूप चुकीचे निर्णय घेतले असतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे आधी निर्णय घ्यायला शिकावं लागतं.

  • कृती हीच संस्कृती. कृतीची जोड नसेल तर कल्पनेचे इमले चढवण्यात काहीच मतलब नाही.

  • एखादं काम हातात घेतलं, की ते पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागतो. हा गुण अनुभवाने अंगात भिनवावा लागतो.

  • स्वप्न पहायचं. ते सोडायचं नाही. ते स्वप्न प्रत्यक्षात यायला कदाचित दिवस लागतील, महिने लागतील किंवा वर्षे लागतील पण ती पूर्ण होतात यावर विश्वास ठेवावा लागतो.

  • यातील काही मुद्द्यावर आपण येणाऱ्या आठवड्यात सविस्तर चर्चा करू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूर आणि स्नेहा दुबेंमध्ये काट्याची टक्कर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

SCROLL FOR NEXT